पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-९-महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
भारत व ब्राझील – पर्यटन व्यवसायाचा तुलनात्मक अभ्यास :
- आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या – भारतात ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे.
- पर्यटन क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी – भारतात तुलनेने जास्त लोकसंख्या पर्यटन क्षेत्रात गुंतलेली आहे.
- पर्यटन क्षेत्राचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान – ब्राझीलमध्ये भारताच्या तुलनेत पर्यटनाचा राष्ट्रीय उत्पन्नात अधिक वाटा आहे.
भारतात पर्यटकांची संख्या व पर्यटन क्षेत्रात गुंतलेली लोकसंख्या ब्राझीलपेक्षा जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये पर्यटनाचे राष्ट्रीय उत्पन्नात योगदान भारतापेक्षा अधिक आहे.
पर्यटन व्यवसाय :
ब्राझीलमधील पर्यटन व्यवसाय :
(१) वैशिष्ट्ये :
- पर्यटन हा महत्त्वाचा व्यवसाय
- पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
(२) प्रमुख आकर्षणे :
- पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अॅमेझॉन नदीखोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने.
- ब्राझीलचा कार्निव्हल हा सण जगप्रसिद्ध आहे. कार्निव्हल मधील सांबा नृत्य व संगीत यांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक ब्राझीलला भेट देतात.
(३) पर्यटनासाठी प्रसिद्ध शहरे :
- ब्राझीलिया, रिओ दी जनेरिओ, सावो पावलो इत्यादी.
- ब्राझीलमधील रिओ दी जनेरिओ शहरात कॉरकॉवडो हा मोठा डोंगर आहे. या डोंगरावर ख्रिस्त द रिडीमीर हा ३८ मीटर उंचीचा भव्य पुतळा आहे. हा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून तेथे जातात.
भारतातील पर्यटन व्यवसाय :
भारतातील पर्यटन व्यवसायाची माहिती पुढीलप्रमाणे आहे :
(१) वैशिष्ट्ये :
- पर्यटन हा महत्त्वाचा व्यवसाय.
- २०१० पासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत सातत्यपूर्ण लक्षणीय वाढ.
- ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेटी देणे, वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवणे, व्यवसाय करणे इत्यादी हेतूंनी आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येणे.
- पर्यावरणपूरक पर्यटनास देशात चालना.
(२) प्रमुख आकर्षणे :
- ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, मंदिरे, लेणी, स्वच्छ सागरी किनारे, प्राण्यांची व पक्ष्यांची अभयारण्ये व राष्ट्रीय उदयाने, थंड हवेची ठिकाणे इत्यादी.
वाहतुकीचे मार्ग :
वाहतूक मार्गाचे चार प्रमुख प्रकार : जलमार्ग, रस्ते मार्ग, लोहमार्ग व हवाई मार्ग हे आहेत.
- वाहतूक मार्गांचा वापर करून वस्तूंचे एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. यामुळे लोकांची हालचाल (गतिशीलता) सुलभ होते.
- वाहतूक मार्गांमुळे शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका अशा अनेक व्यवसायांना चालना मिळते.
- वाहतुकीच्या सुविधा वाढल्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारास प्रोत्साहन मिळते. त्यातून रोजगारनिर्मिती होते व देशाचे उत्पन्न वाढते.
- जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे. त्यामुळे खर्च कमी येतो. जलवाहतुकीत वाहतूक क्षमता जास्त असते, म्हणजेच अधिक प्रमाणात वस्तू एकाच वेळी वाहता येतात.
- आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे कमी खर्चात वस्तूंची आयात-निर्यात करणे शक्य होते.
ब्राझीलमधील वाहतुकीचे मार्ग :
(१) जलमार्ग :
- अॅमेझॉन नदीच्या मुखापासून ते पेरूतील इक्वीटॉस या ठिकाणापर्यंत व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक केली जाते. हा जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वांत लांब पल्ला मानला जातो.
- पॅराना नदी ही दक्षिणवाहिनी असून, ती जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे.
- ब्राझीलच्या किनारी भागांमध्येही जलवाहतूक होते.
- परंतु, ब्राझीलमधील बहुतेक नद्यांमध्ये विसर्गाचा वेग अधिक आहे. तसेच, नद्यांच्या खोर्यांमध्ये उंचसखल व दुर्गम भूभाग असल्यामुळे ब्राझीलमध्ये अंतर्गत जलवाहतुकीचा विकास मर्यादित राहिला आहे.
(२) रस्ते मार्ग :
- देशातील वाहतूक मार्गांमध्ये रस्ते मार्गांचा निम्म्याहून अधिक वाटा.
- पूर्व भागात रस्ते मार्गांचे दाट जाळे.
- पश्चिमेकडील व उत्तरेकडील अॅमेझॉन नदीखोऱ्याच्या दुर्गम भागात रस्ते मार्गांचा मर्यादित विकास.
(३) लोहमार्ग :
- लोहमा्गांचा मर्यादित विकास.
- लोहमार्ग वाहतूक स्वस्त दरात उपलब्ध.
- लोहमागांचा ठरावीक शहरांदरम्यान मर्यादित वापर.
(४) हवाई मार्ग :
- हवाई मार्गांचा मर्यादित वापर.
भारतातील वाहतुकीचे मार्ग :
भारतातील वाहतुकीच्या मार्गांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :
(१) जलमार्ग :
- भारतात नद्या, कालवे, खाड्या, जलसाठे इत्यादींचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर केला जातो.
- देशाचा मुख्य भूभाग आणि अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील बेटांदरम्यान वाहतुकीसाठीही जलमार्गांचा वापर केला जातो.
- देशाच्या एकूण वाहतूक मार्गांत अंतर्गत जलमार्गांचा केवळ १ टक्का वाटा आहे.
- देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे ९५ टक्के व्यापार सागरी मार्गे केला जातो.
(२) रस्ते मार्ग :
- भारतात अंतर्गत वाहतुकीसाठी रस्ते मार्गांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
- भारतातील सुमारे ८५ टक्के प्रवासी वाहतूक रस्ते मार्गांनी होते.
- देशातील सुमारे ७० टक्के मालवाहतूकही रस्ते मार्गाने होते.
- भारतात उत्तर-दक्षिण महामार्ग, पूर्व-पश्चिम महामार्ग, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व इतर रस्ते यांचे दाट जाळे पसरलेले आहे.
(३) लोहमार्ग :
भारतामध्ये भूआकार, लोकसंख्या वितरण व आर्थिक गरजांनुसार लोहमार्गांचे जाळे असमानपणे विकसित झाले आहे.
लोहमार्गांचे महत्त्व :
- लोहमार्ग हे देशाच्या आर्थिक, सामाजिक व औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.
- प्रवासी व मालवाहतुकीसाठी रेल्वे हा सर्वाधिक वापरला जाणारा व विश्वासार्ह पर्याय आहे.
भारतातील लोहमार्गांचे वितरण :
- दाट जाळे असलेले भाग : उत्तर भारतातील गंगा-सिंधू मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे अतिशय दाट आहे. याचे कारण म्हणजे सखल भूभाग, सुपीक जमीन आणि लोकसंख्येचे दाट वितरण.
- विरळ जाळे असलेले भाग : भारताचा मध्य भाग, ईशान्य भारतातील डोंगराळ राज्ये आणि राजस्थानसारखा वाळवंटी प्रदेश याठिकाणी लोहमार्गांचे जाळे विरळ आहे. यामागील कारणे म्हणजे उंचसखल भूप्रदेश, दुर्गम भाग व लोकसंख्येची विरळता.
(४) हवाई मार्ग :
- आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचा पुरेसा विकास.
- अंतर्गत हवाई मार्गांचाही वाढता वापर.
प्रमाणवेळ व संदेशवहन :
प्रमाणवेळेची उपयोगिता :
- ज्या देशाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार मोठा असतो, त्या देशात वेळेतील फरक जाणवतो. अशा वेळी एकसंध वेळ राखण्यासाठी प्रमाणवेळ अत्यंत उपयुक्त ठरते.
- प्रमाणवेळेमुळे देशातील सर्व भागांसाठी एकसमान स्थानिक वेळ निश्चित करता येते, ज्यामुळे वेळेतील गोंधळ टाळता येतो.
- प्रमाणवेळेचा उपयोग करून रेल्वे व हवाई वाहतुकीचे वेळापत्रक सुसंगत व अचूक ठेवता येते, जे प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीचे ठरते. देशभरातील बँका, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, इस्पितळे इत्यादी संस्थांमध्ये एकसंध वेळेनुसार कामकाज चालते, त्यामुळे कार्यक्षमता वाढते व सुसूत्रता राखता येते.
संदेशवहन उपयोगिता :
- माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे संदेशवहन केले जाते.
- आधुनिक संदेशवहन हे तुलनेने कमी खर्चीक व अधिक परिणामकारक असते.
ब्राझीलची प्रमाणवेळ व ब्राझीलमधील संदेशवहन :
(अ) ब्राझीलची प्रमाणवेळ :
- ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळेच्या (GMT) अनुक्रमे २, ३, ४ आणि ५ तासांनी मागे आहेत.
- (GMT-03) ही ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ मानली जाते. ती ग्रीनिच वेळेच्या तीन तास मागे आहे.
(ब) ब्राझीलमधील संदेशवहन :
ब्राझीलमध्ये संदेशवहन सेवा भौगोलिक अडचणी असूनही आधुनिक आणि गतिमान असून, देशाचे तंत्रज्ञान व संपर्कक्षमता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
संदेशवहन सेवा :
- ब्राझीलमध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी, संगणक व इंटरनेट यांसारख्या सेवा अत्यंत विकसित व कार्यक्षम स्वरूपात उपलब्ध आहेत.
- सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते, त्यामुळे देश डिजिटलदृष्ट्या प्रगत आहे.
क्षेत्रानुसार सेवा वितरण :
- दक्षिण व मध्य ब्राझील : येथे लोकसंख्येचे दाट वितरण असल्यामुळे अत्याधुनिक दूरसंचार सुविधा उपलब्ध आहेत.
- उत्तर ब्राझील : घनदाट वने व विरळ लोकवस्ती यांमुळे या भागात दूरसंचार सेवा मर्यादित स्वरूपात विकसित झाल्या आहेत.
अडथळ्यांवर मात :
- ब्राझीलने विस्तीर्ण आकार, घनदाट अरण्ये आणि अॅमेझॉन खोऱ्यातील कमी लोकसंख्या या अडथळ्यांवर मात करत संचार सेवा विस्तारल्या आहेत.
अवकाश क्षेत्रातील प्रगती :
- ब्राझीलने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रह सोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
- पूर्वी ब्राझील संयुक्त संस्थांवर (USA) अवलंबून होता. आता भारत, चीन, रशिया आणि युक्रेन यांच्याशी सहकार्य करत आहे.
भारताची प्रमाणवेळ व भारतातील संदेशवहन :
(अ) भारताची प्रमाणवेळ :
- भारतीय प्रमाणवेळेसाठी (IST) ८२°३०' पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे.
- भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे.
(ब) भारतातील संदेशवहन :
- संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वाढता प्रभाव हे माहिती तंत्रज्ञान व संदेशवहन युगाचे वैशिष्ट्य आहे.
- यामुळे दूरसंचार उद्योग हे भारतातील अतिवेगाने वाढणारे क्षेत्र ठरले आहे.
- भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन व इंटरनेट वापरणारा देश आहे.
- स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानाचा वापर करून भारत संदेशवहन क्षेत्रात प्रगतीपथावर आहे.
Click on below links to get PDF from store
PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-९ : पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - नोट्स
PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-९ : पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71
Main Page : – महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल– – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : प्रकरण-८ : अर्थव्यवस्था आणि व्यवसाय – Online Notes
