इतिहासाची साधने
इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -1- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) इतिहासाच्या साधनांमधील .......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
(अ) लिखित (ब) मौखिक (क) भौतिक (ड) दृक् -श्राव्य
(ड) दृक् -श्राव्य
(२) पुण्यातील .......... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
(अ) आगाखान पॅलेस (ब) साबरमती आश्रम
(क) सेल्युलर जेल (ड) लक्ष्मी विलास पॅलेस
(अ) आगाखान पॅलेस
(३) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे .......... होय.
(अ) पोवाडा (ब) छायाचित्र (क) मुलाखती (ड) चित्रपट
(ड) चित्रपट
प्रश्न २. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.
- ब्रिटिश काळात वृत्तपत्रांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, बालविवाह, सतीप्रथा यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध जनजागृती केली.
- समाजसुधारकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्त्रीशिक्षण, विधवा पुनर्विवाह, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक समता यांचा प्रचार केला.
- तसेच लोकांमध्ये राष्ट्रीय भावना, हक्क आणि कर्तव्यांची जाणीव निर्माण केली.
- साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले.
त्यामुळे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची प्रभावी साधने म्हणून कार्य करत होती.
(२) चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात.
- चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार असून विसाव्या शतकात या तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकतात.
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या, जसे की दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह आणि चलेजाव आंदोलन, ध्वनी चित्रफिती (Newsreels) आज उपलब्ध आहेत
- चित्रफितींमध्ये ऐतिहासिक घटना, व्यक्ती आणि प्रसंगांचे प्रत्यक्ष दृश्य व ध्वनी स्वरूपात जतन केलेले पुरावे उपलब्ध असतात. त्यामुळे त्या काळातील घडामोडींची अचूक माहिती मिळते.
- स्वातंत्र्यलढा, महत्त्वाचे नेते, राष्ट्रीय कार्यक्रम आणि इतर ऐतिहासिक घटनांचा वास्तवदर्शी अभ्यास करता येतो.
म्हणून चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात.
प्रश्न ३. टीपा लिहा.
(१) छायाचित्रे
- छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक् (Visual) स्वरूपाची साधने आहेत.
- छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, वस्तू आणि वास्तू यांची छायाचित्रे उपलब्ध झाली.
- छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते; परंतु त्यात काल्पनिकता, व्यक्तिसापेक्षताही असे.
- छायाचित्रांमुळे एखादी व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता किंवा एखादी घटना नेमकी कशी घडली, याची दृश्य स्वरूपात तंतोतंत माहिती मिळते.
- तत्कालीन वास्तूंच्या छायाचित्रांवरून वास्तुप्रकार, वास्तू बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते.
- मध्ययुगीन काळातील चित्रांच्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात.
(२) वस्तु संग्रहालये आणि इतिहास
- वस्तुसंग्रहालये ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने आहेत.
- विविध कालखंडांतील पुरातन वस्तू, शस्त्रे, नाणी, शिल्पे, हस्तलिखिते, चित्रे, वस्त्रे आणि इतर ऐतिहासिक अवशेष येथे जतन करून ठेवले जातात.
- या वस्तूंमधून त्या काळातील लोकांचे जीवन, संस्कृती, कला, परंपरा आणि सामाजिक-आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते.
- त्यामुळे इतिहासाचा अभ्यास अधिक वास्तवदर्शी आणि रंजक होतो. तसेच ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही वस्तुसंग्रहालये करतात.
- पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू आणि कागदपत्रे पाहायला मिळतात.
(३) श्राव्य साधने
- श्राव्य साधने ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने आहेत.
- ध्वनिमुद्रिका, भाषणे, मुलाखती, लोकगीते, पोवाडे, रेडिओ कार्यक्रम इत्यादींचा यात समावेश होतो.
- उदाहरण, रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले 'जन गण मन' हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांची भाषणे यांचा वापर इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून केला जातो .
- स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील अनेक स्फूर्तीगीते ही देखील श्राव्य साधनांचा एक भाग आहेत
- या साधनांमधून ऐतिहासिक घटना, व्यक्ती आणि त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळते. तसेच त्या काळातील भाषा, उच्चार आणि लोकजीवन समजण्यास मदत होते.
- त्यामुळे इतिहासाचा अभ्यास अधिक प्रभावी, जिवंत आणि विश्वासार्ह बनतो.
प्रश्न ४. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.


Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -1-इतिहासाची साधने – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -1-इतिहासाची साधने – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board Class 8th Mathematics – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : धडा २ : युरोप आणि भारत – Online Solutions
