Solutions-Marathi Medium-इयत्ता-आठवी – नागरिकशास्त्र-पाठ -2-भारताची संसद-Maharashtra Board

पाठ -2-भारताची संसद

इयत्ता-आठवी – नागरिकशास्त्र- Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(१) लोकसभेवर ......... पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात.

(अ) भौगोलिक मतदार संघ

(ब) धार्मिक मतदार संघ

(क) स्थानिक शासन संस्था मतदार संघ

(ड) प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत

उत्तर :

लोकसभेवर भौगोलिक मतदारसंघ पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात.

(२) भारताचे .......... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

(अ) राष्ट्रपती

(ब) उपराष्ट्रपती

(क) प्रधानमंत्री

(ड) सरन्यायाधीश

उत्तर :

भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

प्रश्न २. शोधा आणि लिहा.

(१) लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात. ............

उत्तर :

खासदार

(२) कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे .............

उत्तर :

संसद

प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.

उत्तर :

  • राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही.
  • दर दोन वर्षांनी राज्यसभेतील ६ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले १/३ (एक-तृतीयांश) सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सदस्यांची निवड केली जाते.
  • टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते; म्हणूनच राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह मानले जाते.

(२) लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.

उत्तर :

  • भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा होय.
  • लोकसभा हे संसदेचे थेट जनतेकडून निवडून येणारे सभागृह आहे.
  • हे देशातील लोकांचे थेट प्रतिनिधित्व करते, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.

प्रश्न ४. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.

(१) लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात?

उत्तर :

  • लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशात भौगोलिक मतदारसंघ निर्माण केले जातात.
  • प्रत्येक भौगोलिक मतदारसंघातून एक प्रतिनिधी थेट जनतेद्वारे प्रौढ मतदान पद्धतीने निवडला जातो.
  • लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात, ज्यांना सार्वत्रिक निवडणुका म्हणतात.

(२) लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा.

उत्तर :

  • लोकसभेचे कामकाज अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार व नियंत्रणाखाली चालते.
  • सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे आणि कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार कामकाज चालवणे ही अध्यक्षांची मुख्य कामे असतात.
  • लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांचे हक्क आणि विशेषाधिकार यांची जपणूक करणे व संपूर्ण सभागृहाचे कामकाज निष्पक्षपातीपणे चालवणे ही अध्यक्षांची जबाबदारी असते.

प्रश्न ५. कायदानिर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा.

उत्तर :

कायद्याचा कच्चा मसुदा (विधेयक) कायद्यात रूपांतरित होण्यासाठी खालील टप्प्यांमधून जातो:

१. पहिले वाचन: संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सभागृहात सादर करतो व विधेयकाचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो.

२. दुसरे वाचन: या टप्प्याचे दोन भाग असतात. पहिल्या भागात विधेयकाच्या उद्दिष्टांवर चर्चा होते किंवा ते समितीकडे पाठवले जाते. दुसऱ्या भागात विधेयकावर कलमवार सविस्तर चर्चा होऊन दुरुस्त्यांवर मतदान होते.

३. तिसरे वाचन: विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होऊन विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान घेतले जाते.

४. दुसऱ्या सभागृहाची मंजुरी व राष्ट्रपतींची संमती: पहिल्या सभागृहाने मंजूर केलेले विधेयक दुसऱ्या सभागृहातही याच सर्व प्रक्रियेमधून जाते. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *