पाठ -1-संसदीय शासन पद्धतीची ओळख
इयत्ता-आठवी – नागरिकशास्त्र- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) संसदीय शासन पद्धती ......... येथे विकसित झाली.
(अ) इंग्लंड
(ब) फ्रान्स
(क) अमेरिका
(ड) नेपाळ
संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली.
(२) अध्यक्षीय शासन पद्धतीत ......... हे कार्यकारी प्रमुख असतात.
(अ) प्रधानमंत्री
(ब) लोकसभा अध्यक्ष
(क) राष्ट्राध्यक्ष
(ड) राज्यपाल
अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात.
प्रश्न २. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा.
| मंडळाचे नाव | प्रमुख कार्य |
| १. कायदेमंडळ | |
| २. कार्यकारी मंडळ | |
| ३. न्यायमंडळ |
| मंडळाचे नाव | प्रमुख कार्य |
| १. कायदेमंडळ | कायद्यांची निर्मिती करणे. |
| २. कार्यकारी मंडळ | कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. |
| ३. न्यायमंडळ | न्याय देण्याचे कार्य करणे. |
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
- ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती आणि इंग्रजांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती.
- त्यामुळे संसदीय शासनपद्धतीचा भारतीयांना परिचय व अनुभव झाला होता.
- संविधानसभेत या पद्धतीवर चर्चा होऊन भारतीय परिस्थितीनुसार त्यात बदल केले गेले. या सर्व कारणांमुळे भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला.
(२) संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते.
- संसदीय पद्धतीत सार्वजनिक हिताच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत व्यापक चर्चा आणि विचारविनिमय केला जातो.
- विरोधी पक्षाचे सदस्यही या चर्चेत भाग घेऊन धोरणातील किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात व अभ्यासपूर्ण मांडणी करतात.
- यामुळे संसदेला अधिक निर्दोष व लोकाभिमुख कायदे करणे शक्य होते. म्हणून संसदीय शासनपद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते.
प्रश्न ४. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय ?
- संसदीय पद्धतीतील पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी कायदेमंडळाला (संसदेला) जबाबदार असतात.
- मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊनच राज्यकारभार करावा लागतो.
- तसेच अविश्वासाच्या ठरावाद्वारे संसदेचे कार्यकारी मंडळावर नियंत्रण असते. म्हणून या पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात.
(२) अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
- अध्यक्षी्य शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे थेट एकमेकांवर अवलंबून नसतात.
- कार्यकारी प्रमुख असलेले राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून थेट निवडले जातात.
- राष्ट्राध्यक्षांकडे कायद्यांच्या अंमलबजावणीचे व इतर व्यापक अधिकार असतात.
- कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवून जबाबदारपणे काम करतात.
प्रश्न ५. विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते ? याबाबत तुमचे मत लिहा.
संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. विरोधी पक्ष पुढीलप्रमाणे कार्य करतात:
- शासनाच्या धोरणांवर आणि प्रस्तावित कायद्यांवर बारीक लक्ष ठेवून त्यातील चुका व त्रुटी दाखवून देणे.
- सार्वजनिक हिताचे प्रश्न संसदेत मांडून सरकारला उत्तरदायी बनवणे.
- सरकारच्या एकाधिकारशाहीला आळा घालणे.
- योग्य निर्णयांना सहकार्य करणे व योग्य पर्याय जनतेसमोर मांडणे.
यामुळे सरकार जबाबदारीने काम करते व लोकशाही मजबूत होते.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – नागरिकशास्त्र-पाठ -1-संसदीय शासन पद्धतीची ओळख – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – नागरिकशास्त्र-पाठ -1-संसदीय शासन पद्धतीची ओळख – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी- इतिहास व राज्यशास्त्र – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : नागरिकशास्त्र-धडा २ : भारताची संसद – Online Solutions
