Solutions-Marathi Medium-इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-३-बाह्यप्रक्रिया भाग-१-Maharashtra Board

बाह्यप्रक्रिया भाग-१

इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-३-Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . थोडक्यात उत्तरे लिहा.

() कायिक विदारण म्हणजे काय ?

उत्तर :

कायिक विदारण ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात खडकांच्या रासायनिक गुणधर्मात कोणताही बदल होत नाही, परंतु खडक फाटतात, तुटतात किंवा त्यांच्या छोट्या तुकड्यांमध्ये विघटन होते.

  • उदा. उन्हामुळे, थंडीमुळे, पाण्याचे गोठणे यामुळे खडकाचे थर सुटतात.
  • अपपर्णन, कणात्मक विदारण व खंड-विखंडन या कायिक विदारणाच्या प्रक्रिया होत.

() रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते?

उत्तर :

जेव्हा पाणी आणि त्यामधील विरघळलेले द्रव्ये खडकांतील खनिजांशी रासायनिक क्रिया करतात, तेव्हा खडकांची रचना बदलते किंवा ते विरघळतात — यालाच रासायनिक विदारण म्हणतात.

रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार:

  • कार्बनन (Carbonation): पावसाचे पाणी हवेतून खाली येताना कार्बन डायऑक्साइड शोषून सौम्य कर्बाम्ल (H₂CO₃) बनते. हे आम्ल चुनखडीसारख्या खडकांना सहज विरघळवते.
  • द्रवीकरण (Solution): काही खनिजे (उदा. क्षार) पाण्यात विरघळतात व वाहून जातात. यामुळे खडक हलके व ठिसूळ होतात, आणि काही वेळेस चुनखडीसारखे अवक्षेप तयार होतात.
  • भस्मीकरण (Oxidation): लोह असलेल्या खडकांवर ऑक्सिजन व पाण्यामुळे गंज (rust) तयार होतो. त्यामुळे खडकांवर तपकिरी थर चढतो व खडक झिजतात.

() जैविक विदारण कसे घडून येते?

उत्तर :

  • जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते.
  • जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणांत ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात.
  • उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी-कीटक जमिनीत बिळे तयार करतात. मुंग्या वारूळ तयार करतात. या सर्व प्राण्यांना 'खनक प्राणी' म्हणतात. या प्राण्यांच्या खननामुळेही खडकांचे विदारण घडून येते.
  • अनेकदा खडकांवर शेवाळे / हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. या वनस्पतींमुळेही खडकांचे विदारण घडते.

() विदारण विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

विदारण विस्तृत झीज
नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे 'विदारण/अपक्षय' होय. विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल, म्हणजे 'विस्तृत झीज' होय.
कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार होत. तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे मुख्य प्रकार होत.

प्रश्न . चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.

() भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.

उत्तर :

चूक.

() आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.

उत्तर :

बरोबर.

() शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.

उत्तर :

बरोबर.

() खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.

उत्तर :

बरोबर.

() अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते.

उत्तर :

चूक.

प्रश्न . खालील ओघतक्ता पूर्ण करा.

उत्तर :

 

प्रश्न . पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.

() काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात.

उत्तर :

जैविक विदारण.

() खडकातील लोहावर गंज चढतो.

उत्तर :

रासायनिक विदारण.

() खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो.

उत्तर :

कायिक विदारण

() थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.

उत्तर :

कायिक विदारण

() ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे.

उत्तर :

कायिक विदारण

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-३-बाह्यप्रक्रिया भाग-१- नोट्स

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-३-बाह्यप्रक्रिया भाग-१-स्वाध्याय प्रश्नोत्तरे


महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 51

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (24 PDF) Rs. 86

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *