पाठ -13-स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
इयत्ता-आठवी – इतिहास - Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर ........... होती.
(अ) राज्ये
(ब) खेडी
(क) संस्थाने
(ड) शहरे
(क) संस्थाने
(२) जुनागड, .......... व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
(अ) औंध
(ब) झाशी
(क) वडोदरा
(ड) हैदराबाद
(ड) हैदराबाद
प्रश्न २. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) जुनागड भारतात विलीन झाले.
कारण: जुनागड हे सौराष्ट्रातील संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, परंतु तेथील नवाब पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता. नवाबाच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. प्रजेचा तीव्र विरोध पाहून नवाब पाकिस्तानात निघून गेला. त्यामुळे फेब्रुवारी १९४८ मध्ये जुनागड भारतात विलीन झाले.
(२) भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली.
कारण: हैदराबाद संस्थानातील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, परंतु निजामाने भारतविरोधी धोरण स्वीकारून पाकिस्तानात विलीन होण्याच्या हालचाली सुरू केल्या. निजामाचा सहकारी कासीम रझवी याने 'रझाकार' ही संघटना स्थापन करून प्रजेवर, हिंदूंवर व लोकशाहीवादी मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार केले. भारत सरकार सामोपचाराने बोलणी करत असूनही निजाम दाद देत नव्हता. अखेरीस प्रजेच्या संरक्षणासाठी भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध 'ऑपरेशन पोलो' ही पोलीस कारवाई सुरू केली.
(३) भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली.
कारण: काश्मीरचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्यासाठी ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. या आक्रमणापासून काश्मीरचे रक्षण करण्यासाठी हरिसिंग यांनी भारताकडे लष्करी मदत मागितली आणि भारतात सामील होण्याच्या 'सामीलनामा' करारावर स्वाक्षरी केली.
प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा.
- भारत स्वतंत्र झाल्यावर ६०० हून अधिक संस्थानांच्या विलीनीकरणाचा जटील प्रश्न गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे सोडवला.
- त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा 'सामीलनामा' तयार केला.
- भारतात सामील होणे हे संस्थानिक व प्रजा दोघांच्या कसे हिताचे आहे, हे त्यांनी पटवून दिले.
- पटेलांच्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद देऊन जुनागड, हैदराबाद व काश्मीर वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
- पटेलांच्या कणखर भूमिकेमुळे अखंड भारताचे स्वप्न साकार झाले.
(२) हैदराबाद मुक्ति संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा.
- स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे मुख्य व झुंजार नेते होते.
- त्यांनी १९३८ मध्ये 'हैदराबाद स्टेट काँग्रेस'ची स्थापना करून निजामाविरुद्ध लोकशाही हक्कांसाठी लढा पुकारला. निजामाने बंदी घातली तरी त्यांनी लढा सुरू ठेवला.
- जुलै १९४७ मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव त्यांनी पास केला.
- निजामाचे अत्याचार आणि कासीम रझवीच्या रझाकारांच्या हिंसेविरुद्ध त्यांनी जनतेचे संघटन केले व आंदोलनाचे नेतृत्व केले.
- त्यांच्या नेतृत्वामुळेच १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान मुक्त होऊन भारतात विलीन झाले.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -13-स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -13-स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
इयत्ता ८ वी– इतिहास PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता ८ वी– इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (14 PDF) Rs. 54
इयत्ता ८ वी– राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता ८ वी– राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 27
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-८ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व २0 धड्यांची नोट्स (20 PDF)-Rs.65
इयत्ता-८ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व २0 धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF)-Rs.61
इयत्ता-८ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व २0 धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (40 PDF)-Rs.104
इयत्ता-८ वी– समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल – सर्व 30 धड्यांची नोट्स (30 PDF)-Rs.90
इयत्ता-८ वी– इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व 30 धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (29 PDF)-Rs.81
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी- इतिहास व राज्यशास्त्र – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 12 : स्वातंत्र्यप्राप्ती – Online Solutions
Next Chapter : धडा 14 : महाराष्ट्र राज्याची निर्मिती – Online Solutions
