Solutions-Marathi Medium-इयत्ता-आठवी – नागरिकशास्त्र-पाठ -3-केंद्रीय कार्यकारी मंडळ-Maharashtra Board

पाठ -3-केंद्रीय कार्यकारी मंडळ

इयत्ता-आठवी – नागरिकशास्त्र- Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न १. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा.

(१) भारतातील कार्यकारी सत्ता ......... यांच्याकडे असते.

(राष्ट्रपती, प्रधानमंत्री , सभापती)

उत्तर :

प्रधानमंत्री

(२) राष्ट्रपतीचा कार्य काल ....... वर्षांचा असतो.

(तीन, चार, पाच)

उत्तर :

पाच

(३) मंत्रिमंडळाचे नेतृत्व .......... करतात.

(पक्षप्रमुख, प्रधानमंत्री , राष्ट्रपती)

उत्तर :

प्रधानमंत्री

प्रश्न २. ओळखा आणि लिहा.

(१) राष्ट्रपती, प्रधानमंत्री , मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव –

उत्तर :

केंद्रीय कार्यकारी मंडळ

(२) अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ हा या नावाने ओळखतात -

उत्तर :

शून्य प्रहर

प्रश्न ३. पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा.

(१) महाभियोग प्रक्रिया

उत्तर :

संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. परंतु राष्ट्रपतींचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा संसदेला अधिकार असतो. या प्रक्रियेला 'महाभियोग प्रक्रिया' म्हणतात.

महाभियोगाचे टप्पे:

  • आरोप ठेवणे: राष्ट्रपतींकडून संविधानाचा भंग झाला असल्यास संसदेचे कोणतेही एक सभागृह (लोकसभा किंवा राज्यसभा) तसा आरोप ठेवते.
  • चौकशी करणे: संसदेचे दुसरे सभागृह या आरोपांची सखोल चौकशी करते.
  • विशेष बहुमत: दोन्ही सभागृहांमध्ये २/३ (दोन-तृतीयंश) विशेष बहुमताने महाभियोगाचा ठराव संमत होणे आवश्यक असते. असा ठराव संमत झाल्यानंतरच राष्ट्रपती पदावरून दूर होतात.

(२) अविश्वास ठराव

उत्तर :

  • संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ लोकसभेच्या विश्वासावर अवलंबून असते. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार टिकते.
  • संसद सदस्यांना 'आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही' असे वाटल्यास ते अविश्वासाचा ठराव मांडू शकतात.
  • हा ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.

(३) जम्बो मंत्रिमंडळ

उत्तर :

  • पूर्वीच्या काळात खूप मोठे मंत्रिमंडळ नेमण्याचा कल होता, त्याला 'जम्बो मंत्रिमंडळ' म्हटले जाते.
  • परंतु प्रशासकीय कार्यक्षमता राखण्यासाठी संविधानात दुरुस्ती करून मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

प्रश्न ४. थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.

उत्तर :

  • कायद्यांची निर्मिती: शिक्षण, शेती, आरोग्य, उद्योग, परराष्ट्र व्यवहार यांसारख्या विषयांवर निश्चित धोरण ठरवून कायद्यांचा आराखडा तयार करणे.
  • संसदेची मंजुरी: तयार केलेले धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणणे व संसदेकडून मंजुरी मिळवणे.
  • अंमलबजावणी: संसदेने मंजूर केलेल्या धोरणांची व कायद्यांची प्रत्यक्ष देशात अंमलबजावणी करणे.

(२) संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते?

उत्तर :

संसदीय शासनपद्धतीत संसद ही कायद्यांची निर्मिती, अंमलबजावणी आणि त्यानंतरच्या काळातही मंत्रिमंडळावर विविध मार्गांनी नियंत्रण ठेवते.

संसदेकडून मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य मार्ग खालीलप्रमाणे आहेत:

  • चर्चा व विचारविनिमय: कायदेनिर्मितीच्या वेळी चर्चा करून धोरणातील त्रुटी दाखवून देणे.
  • प्रश्नोत्तरे: कामकाजाच्या सुरुवातीला प्रश्न विचारून मंत्र्यांकडून उत्तर मागवणे.
  • शून्य प्रहर: दुपारी १२ वाजता सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे.
  • अविश्वासाचा ठराव: सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करून मंत्रिमंडळाला

राजीनामा देण्यास भाग पाडणे.

प्रश्न ५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

  • संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे व विधेयकांवर स्वाक्षरी करणे.
  • पंतप्रधान, मंत्री, न्यायाधीश, राज्यपाल व निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणे.
  • तिन्ही संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख म्हणून युद्ध व शांततेचे निर्णय घेणे.
  • न्यायालयीन अधिकार (शिक्षा कमी करणे किंवा रद्द करणे).
  • राष्ट्रीय, घटक राज्य आणि आर्थिक आणीबाणी जाहीर करणे.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *