पाठ -12-स्वातंत्र्यप्राप्ती
इयत्ता-आठवी – इतिहास - Maharashtra Board
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
पार्श्वभूमी व ब्रिटिशांचे धोरण :
- दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतातील स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक व उग्र झाला. स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढल्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांना याची गंभीर दखल घेणे भाग पडले.
- राष्ट्रीय सभा ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर उभारलेली संघटना होती आणि त्यात सर्व धर्मीय सहभागी झाले होते.
- राष्ट्रीय चळवळ कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी 'फोड आणि राज्य करा' (Divide and Rule) या नीतीचा वापर केला. याचा परिणाम मुस्लीम लीगच्या स्थापनेत झाला.
स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी व द्विराष्ट्र सिद्धान्त :
मुस्लीम राष्ट्राच्या मागणीचा विकास पुढील टप्प्यांत झाला:
- १९३० - प्रसिद्ध कवी डॉ. मोहम्मद इक्बाल यांनी सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडला.
- चौधुरी रहमत अली यांनी पुढे 'पाकिस्तान' ही कल्पना व नाव मांडले.
- बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांनी 'द्विराष्ट्र सिद्धान्त' मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची आग्रहाने मागणी केली.
- राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूंची संघटना आहे आणि तिच्यापासून मुस्लिमांचा काहीही फायदा होणार नाही, असा प्रचार बॅ. जीना व मुस्लीम लीगने सुरू केला.
वेव्हेल योजना (जून १९४५) :
जून १९४५ मध्ये भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली, त्यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे होत्या:
- केन्द्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लीम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देणे.
- व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लीम सदस्यांची संख्या समान ठेवणे.
- योजनेवर चर्चा करण्यासाठी शिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची परिषद आयोजित केली गेली.
- योजनेचे अपयश: व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लीम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लीम लीगलाच असावा, असा अट्टहास बॅ. जीना यांनी धरला. राष्ट्रीय सभेने यास तीव्र विरोध केल्यामुळे वेव्हेल योजना अपयशी ठरली.
त्रिमंत्री योजना (मार्च १९४६) :
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये स्पष्ट केले की, भारतीय जनतेला स्वतःचे संविधान तयार करण्याचा अधिकार आहे आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न भारताच्या स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत. मार्च १९४६ मध्ये तीन ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ भारतात आले. याला 'त्रिमंत्री योजना' (Cabinet Mission) म्हणतात.
- त्रिमंत्री योजनेतील मंत्री: १. पॅथिक लॉरेन्स, २. स्टॅफर्ड क्रिप्स, ३. ए. व्ही. अलेक्झांडर.
- योजनेचा निकाल: या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य (पाकिस्तान) स्थापन करण्याची स्पष्ट तरतूद नसल्याने मुस्लीम लीगही असंतूष्ट होती. त्यामुळे ही योजना पूर्णतः मान्य झाली नाही.
प्रत्यक्ष कृती दिन (१६ ऑगस्ट १९४६)
पाकिस्तानची मागणी सनदशीर मार्गाने पूर्ण होत नाही हे पाहून मुस्लीम लीगने 'प्रत्यक्ष कृती' करण्याचे ठरवले. त्यानुसार १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस 'प्रत्यक्ष कृती दिन' (Direct Action Day) म्हणून पाळण्याचे जाहीर करण्यात आले.
- या दिवशी मुस्लीम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला.
- देशात विविध ठिकाणी भीषण हिंदू-मुस्लीम दंगली उसळल्या.
- बंगाल प्रांतातील नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या.
- गांधीजींचे प्रयत्न: हा हिंसाचार थांबवण्यासाठी महात्मा गांधीजी आपल्या प्राणाची पर्वा न करता नोआखाली येथे गेले आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
हंगामी सरकारची स्थापना :
- देशात हिंसाचाराचा डोम उसळलेला असताना व्हॉइसरॉय वेव्हेल यांनी हंगामी सरकार स्थापन केले.
- पं. जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते.
- सुरुवातीला मुस्लीम लीग यात सामील झाली नाही, पण नंतर सहभागी झाली.
- परंतु मुस्लीम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
माउंटबॅटन योजना (१९४७) :
- इंगलंडचे पंतप्रधान ॲटली यांनी जून १९४८ पूर्वी ब्रिटन भारतावरील आपली सत्ता सोडून देईल अशी घोषणा केली.
- भारताचे नवे व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती झाली.
- त्यांनी प्रमुख नेत्यांशी विचारविनिमय करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना तयार केली.
- राष्ट्रीय सभेचा फाळणीस विरोध होता; परंतु मुस्लीम लीगने पाकिस्तानचा अट्टहास धरल्यामुळे व दंगली भीषण झाल्यामुळे राष्ट्रीय सभेने अत्यंत नाइलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (१८ जुलै १९४७) :
माउंटबॅटन योजनेच्या आधारे १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. या कायद्यातील प्रमुख तरतुदी:
- १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील.
- त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार राहणार नाही.
- संस्थानावरील ब्रिटिशांचे स्वामित्व संपुष्टात येईल. संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होता येईल किंवा स्वतंत्र राहता येईल.
स्वातंत्र्यप्राप्ती आणि फाळणीचे दुःख :
- १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री दिल्ली येथील संसदभवनाच्या सभागृहात संविधानसभेची बैठक सुरू होती. मध्यरात्री १२ चे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा 'युनियन जॅक' खाली उतरवून त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. दीडशे वर्षांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झाला.
- गांधीजींची हत्या: स्वातंत्र्याचा आनंद निर्भेळ नव्हता. देशामधील भीषण जातीय हिंसाचारामुळे जनता दुःखी होती. गांधीजी स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी न होता शांतता प्रस्थापित करण्यासाठी बंगालमध्ये जिवाचे रान करत होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या ६ महिन्यांत, ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने गांधीजींची निघृण हत्या केली.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -12-स्वातंत्र्यप्राप्ती – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -12-स्वातंत्र्यप्राप्ती – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी- इतिहास व राज्यशास्त्र – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 11 : समतेचा लढा – Online Notes
Next Chapter : धडा 13 : स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती – Online Notes
