ब्रिटिश सत्तेचे परिणाम
इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -3- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) पोर्तुगीज, ........... , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले.
(अ) ऑस्ट्रियन (ब) डच (क) जर्मन (ड) स्वीडीश
(ब) डच
(२) १८०२ मध्ये ......... पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
(अ) थोरले बाजीराव (ब) सवाई माधवराव
(क) पेशवे नानासाहेब (ड) दुसरा बाजीराव
(ड) दुसरा बाजीराव
(३) जमशेदजी टाटा यांनी ........... येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
(अ) मुंबई (ब) कोलकाता (क) जमशेदपूर (ड) दिल्ली
(क) जमशेदपूर
प्रश्न २. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मुलकी नोकरशाही
- राज्यकारभारासाठी उभारलेल्या प्रशासकीय यंत्रणेला मुलकी नोकरशाही म्हणतात.
- भारतातील इंग्रजी सत्ता मजबूत करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवालिसने मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली.
- अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये म्हणून त्यांचे पगार वाढवण्यात आले.
- प्रशासनासाठी प्रदेशांची जिल्ह्यांमध्ये विभागणी करून जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
- मुलकी नोकरशाहीतील भरतीसाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (ICS) ही स्पर्धा परीक्षा सुरू करण्यात आली.
(२) शेतीचे व्यापारीकरण
- इंग्रजी राजवटीपूर्वी शेतकरी प्रामुख्याने कुटुंबाच्या व गावाच्या गरजांसाठी अन्नधान्य पिकवत असत.
- इंग्रजांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना कापूस, नीळ, तंबाखू व चहा यांसारखी नगदी पिके घेण्यास प्रोत्साहन दिले.
- अन्नधान्याऐवजी व्यापारी पिकांना महत्त्व देण्याच्या या प्रक्रियेला 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात.
परिणाम:
- नगदी पिकांना अधिक प्रोत्साहन मिळाल्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन व प्रमाण कमी झाले.
- शेतकऱ्यांना शेतसारा रोखीने आणि वेळेत भरण्यासाठी आपली पिके मिळेल त्या भावाने विकावी लागत, ज्याचा फायदा व्यापारी व दलाल घेत असत.
- या व्यापारीकरणामुळे भारतीय शेतीची पारंपारिक स्वयंपूर्णता नष्ट झाली आणि शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण वाढले.
(३) इंग्रजांची आर्थिक धोरणे
- इंग्रजांनी भारतात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीला पूरक अशी आर्थिक धोरणे राबवली.
- त्यांनी नवीन जमीन-महसूल धोरण लागू करून शेतसारा रोखीने आणि ठराविक वेळेत भरणे बंधनकारक केले; सारा न भरल्यास जमीन जप्त केली जात असे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले.
- इंग्रजांनी कापूस, नीळ, तंबाखू आणि चहा यांसारख्या नगदी पिकांना प्रोत्साहन देऊन शेतीचे व्यापारीकरण केले, ज्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी झाले.
- व्यापार धोरणात भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जास्त कर आणि इंग्लंडमधून येणाऱ्या मालावर कमी कर लावल्याने भारतीय उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. तसेच दुष्काळाच्या काळातही सरकारने पुरेशी मदत केली नाही.
या सर्व धोरणांमुळे भारताचे आर्थिक शोषण झाले आणि शेतकरी व कारागीर कफल्लक झाले.
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतातील शेतकरी कर्ज बाजारी झाले.
ब्रिटीश राजवटीत भारतातील शेतकरी कर्जबाजारी होण्याची मुख्य कारणे :
- शेतसारा रोखीने आणि ठराविक मुदतीत भरण्याची सक्ती होती.
- सारा भरण्यासाठी शेतकऱ्यांना पिके कमी भावात विकावी लागत असत.
- सारा भरता न आल्यास सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत असे.
- कर्जाची परतफेड न झाल्यामुळे जमिनी गहाण ठेवाव्या लागत किंवा जप्त होत असत.
- दुष्काळ, कमी उत्पन्न आणि इंग्रजांच्या अन्यायकारक आर्थिक धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कर्ज वाढत गेले.
इंग्रजांची नवीन जमीन-महसूल पद्धत आणि त्यातील जाचक अटींमुळे भारतीय शेतकरी कर्जबाजारी झाला.
(२) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.
भारतातील उद्योगधंद्यांचा ऱ्हास होण्याची कारणे :
- भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर जास्त कर, तर इंग्लंडहून येणाऱ्या मालावर कमी कर आकारला जात असे.
- इंग्लंडमधून स्वस्त यंत्रनिर्मित माल भारतात मोठ्या प्रमाणावर येत असे.
- भारतीय हस्तकला व पारंपरिक उद्योगांना या स्वस्त मालाशी स्पर्धा करता आली नाही.
- भारतीय उद्योजकांना सरकारचे पाठबळ, भांडवल व व्यवस्थापनाचा अनुभव कमी होता.
- त्यामुळे अनेक पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि कारागीर बेरोजगार झाले.
इंग्रजांच्या विषम आर्थिक धोरणांमुळे आणि यंत्रावर आधारित उत्पादनांच्या स्पर्धेमुळे भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला.
प्रश्न ४. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | कार्ये |
| लॉर्ड कॉर्नवालिस | ----------------- |
| ----------------- | सतीबंदीचा कायदा केला. |
| लॉर्ड डलहौसी | ----------------- |
| ----------------- | ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ ची स्थापना |
| व्यक्ती | कार्ये |
| लॉर्ड कॉर्नवालिस | भारतात नोकरशाहीची निर्मिती केली. |
| लॉर्ड बेंटिंक | सतीबंदीचा कायदा केला. |
| लॉर्ड डलहौसी | दत्तकविधान नामंजूर करून संस्थाने खालसा केली. |
| विल्यम जोन्स | ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ ची स्थापना |
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -3-ब्रिटिश सत्तेचे परिणाम – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -3-ब्रिटिश सत्तेचे परिणाम – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board Class 8th Mathematics – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 2 : युरोप आणि भारत – Online Solutions
Next Chapter : धडा 4 : १८५७ चा स्वातंत्र्यलढा – Online Solutions
