Solutions-Marathi Medium-इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -5-सामाजिक व धार्मिक प्रबोधन-Maharashtra Board

सामाजिक व धार्मिक प्रबोधन

इयत्ता-आठवी – इतिहास-पाठ -5- Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)

(१) रामकृष्ण मिशनची स्थापना .......... यांनी केली.

उत्तर :

रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली.

(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना .......... यांनी केली.

उत्तर :

मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली.

(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना .......... यांनी केली.

उत्तर :

डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे) यांनी केली.

प्रश्न २. पुढील तक्ता पूर्ण करा.

समाजसुधारकाचे नाव संस्था वृत्तपत्र/पुस्तक संस्थेची कार्ये
राजा राममोहन रॉय __________ संवादकौमुदी __________
__________ आर्यसमाज __________ __________
महात्मा फुले __________ गुलामगिरी __________

उत्तर :

समाजसुधारकाचे नाव संस्था वृत्तपत्र/पुस्तक संस्थेची कार्ये
राजा राममोहन रॉय ब्राह्मो समाज संवादकौमुदी सतीबंदी, स्त्रीशिक्षण, हिंदू कॉलेज स्थापना
स्वामी दयानंद सरस्वती आर्यसमाज सत्यार्थ प्रकाश वेदप्रामाण्य, जातिभेदास विरोध, शिक्षणसंस्था
महात्मा फुले सत्यशोधक समाज गुलामगिरी स्पृश्यास्पृश्यतेला विरोध, स्त्रीशिक्षण, मुलींची शाळा

प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.

उत्तर :

भारतात सामाजिक व धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू होण्याची कारणे :

  • इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांना पाश्चात्य विचार, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीची ओळख झाली.
  • पाश्चात्य विचारांमुळे सुशिक्षित भारतीयांमध्ये वैचारिक बदल घडले.
  • मानवता, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाहीवर आधारित आधुनिक समाजाची गरज जाणवू लागली.
  • अंधश्रद्धा, जातीभेद, रूढी आणि अनिष्ट प्रथा यांमुळे समाजाची प्रगती होत नसल्याची जाणीव झाली.

या सर्व कारणांमुळे समाजातील दोष नष्ट करून एक प्रगत समाज निर्माण करण्यासाठी एकोणिसाव्या शतकात भारतात सामाजिक व धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.

(२) महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.

उत्तर :

महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणण्यामागील कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • महात्मा फुले यांचा आग्रह समतेच्या तत्त्वावर आधारित समाजनिर्मिती व्हावी असा होता.
  • स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या जाचक चालिरीती, रूढी आणि परंपरांना त्यांनी नेहमीच कडाडून विरोध केला.
  • त्या काळात विधवा स्त्रियांचे 'केशवपन' करण्याची, म्हणजेच त्यांचे संपूर्ण केस काढून टाकण्याची एक क्रूर चाल समाजात अस्तित्वात होती.
  • ही अमानवीय प्रथा बंद व्हावी या उद्देशाने महात्मा फुले यांनी नाभिकांचे प्रबोधन केले आणि त्यांचा संप घडवून आणला.

प्रश्न ४. टीपा लिहा.

(१) रामकृष्ण मिशन

उत्तर :

  • स्थापना: रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी इ.स. १८९७ मध्ये केली. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते.
  • उद्देश: हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाज प्रबोधन करणे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली.
  • समाजसेवा: रामकृष्ण मिशनने लोकहितार्थ अनेक महत्त्वाची कामे केली आहेत आणि आजही ही संस्था सामाजिक कार्यात सक्रिय आहे. यामध्ये दुष्काळग्रस्तांना मदत करणे, रोगी व दीनदुबळ्यांना औषधोपचार देणे आणि स्त्री-शिक्षणाचा प्रसार करणे यांसारख्या कार्यांचा समावेश होतो.
  • आध्यात्मिक कार्य: ही संस्था लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्य करते.
  • स्वामी विवेकानंदांनी इ.स. १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील 'विश्वधर्म परिषदेत' हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी भारतीय तरुणांना 'उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा मोलाचा संदेश दिला.

(२) सावित्री बाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा

उत्तर :

सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीविषयक सुधारणेचे मोलाचे कार्य केले.

  • सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि प्रगतीची दारे उघडली.
  • इ.स. १८४८ मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात सुरू झालेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून कार्य केले.
  • समाजाचा विरोध, टीका आणि दगडफेक सहन करूनही त्यांनी मुलींचे शिक्षण सुरू ठेवले.
  • स्वतःच्या घरात स्थापन केलेल्या 'बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या' कार्यात त्यांनी महात्मा फुले यांना मोलाची साथ दिली.
  • स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करून अन्यायकारक रूढी-परंपरांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Useful Links

Main Page : – Maharashtra Board Class 8th Mathematics   – All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : धडा 3 : ब्रिटिश सत्तेचे परिणाम – Online Solutions

Next Chapter : धडा 5 : सामाजिक व धार्मिक प्रबोधनOnline Solutions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *