पृथ्वीचे अंतरंग
इयत्ता-आठवी – भूगोल-पाठ -2- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. अचूक पर्यायासमोरील चौकटीत ü अशी खूण करा.
(अ) भूकवचाचे हे दोन थर आहेत.
(i) बाह्य व अंतर्कवच
(ii) खंडीय व महासागरीय कवच
(iii) भूपृष्ठ व महासागरीय कवच
(iv) प्रावरण व गाभा
(ii) खंडीय व महासागरीय कवच
(आ) प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामाईक असतो.
(i) सिलिका
(ii) मॅग्नेशिअम
(iii) अॅल्युमिनिअम
(iv) लोह
(ii) मॅग्नेशिअम
(इ) पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?
(i) लोह-मॅग्नेशिअम
(ii) मॅग्नेशिअम-निकेल
(iii) ॲल्युमिनिअम-लोह
(iv) लोह-निकेल
(iv) लोह-निकेल
(ई) अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे?
(i) वायुरूप
(ii) घनरूप
(iii) द्रवरूप
(iv) अर्ध घनरूप
(ii) घनरूप
(उ) बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे?
(i) लोह
(ii) सोने
(iii) हायड्रोजन
(iv) ऑक्सिजन
(i) लोह
(ऊ) आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?
(i) प्रावरण
(ii) गाभा
(iii) भूकवच
(iv) खंडीय कवच
(iv) खंडीय कवच
(ए) कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात?
(i) प्राथमिक लहरी
(ii) द्वितीय लहरी
(iii) पृष्ठीय लहरी
(iv) सागरी लहरी
(i) प्राथमिक लहरी
प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.
(अ) पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.
बरोबर
(आ) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.
चूक.
दुरुस्त विधान: पृथ्वीचा अंतगायाभा हा प्रामुख्याने लोह व निकेल यांसारख्या धातूंपासून बनलेला असून तो घनरूप आहे, तर बाह्यगाभा हा द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात आहे.
(इ) बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.
बरोबर
(ई) खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशिअम यांचे बनले आहे.
चूक.
दुरुस्त विधान: खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनिअम यांचे बनले आहे. (सिलिका व मॅग्नेशियमपासून महासागरीय कवच बनलेले असते.)
प्रश्न ३. उत्तरे लिहा.
(अ) भूकवचाचे दोन भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा अधार काय?
भूकवचाचे खंडीय कवच (Continental Crust) आणि महासागरीय कवच (Oceanic Crust) हे दोन भाग आहेत.
वर्गीकरणाचा आधार:
हे वर्गीकरण प्रामुख्याने त्या थरांमध्ये आढळणारी मूलद्रव्ये आणि त्यांची घनता यावर आधारित आहे.
- खंडीय कवच प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनिअम (सियाल) पासून बनलेले असून त्याची सरासरी घनता २.६५ ते २.९० ग्रॅम/घसेमी आहे.
- याउलट, महासागरीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम (सायमा) पासून बनलेले असून त्याची घनता २.९ ते ३.३ ग्रॅम/घसेमी इतकी आहे.
(आ) प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात?
- प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे दोन उपविभाग आहेत.
- त्यापैकी उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळतात आणि ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस याच भागातून पृथ्वीपृष्ठावर येतो.
- या प्रवाही स्वरूपामुळे व या प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात.
(इ) पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे.
- पृथ्वीच्या बाह्यगाभ्यात लोहाचे प्रमाण अधिक असून तो द्रवरूप स्थितीत आहे.
- बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे या भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात.
- पृथ्वीच्या परिवलनामुळे (स्वतःभोवती फिरण्यामुळे) या प्रवाहाना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते.
- या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होऊन चुंबकीय क्षेत्र तयार होते, ज्याला 'भू-जनित्र' म्हणतात.
- हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या बाहेरही कार्यरत असते आणि त्यामुळे पृथ्वीच्या भोवती जे संरक्षक आवरण तयार होते, त्यास 'चुंबकावरण' म्हणतात.
- अशा प्रकारे, परिवलनामुळेच हे चुंबकीय क्षेत्र आणि पर्यायाने चुंबकावरण निर्माण होते.
स्पष्ट करा.
प्रश्न ४. सुबक आकृत्या काढून नावे द्या.
(अ) पृथ्वीचे अंतरंग

(आ) चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त

प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो
कारण:
- पृथ्वीच्या पृष्ठभागापासून गाभ्याकडे जाताना तापमान आणि घनता या दोन महत्त्वाच्या घटकांत सतत बदल होतो.
- सुरुवातीला पृथ्वी उष्णात उत्सर्जन प्रक्रियेमुळे बाहेरून थंड होत गेली, ज्यामुळे भूकवच घनरूप झाले, मात्र अंतरंगात आजही प्रचंड उष्णता आहे.
- पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच, प्रावरण आणि गाभा असे मुख्य विभाग असून त्यांची भौतिक अवस्था (घन, द्रव, अर्धद्रव) आणि त्यांमधील मूलद्रव्ये वेगवेगळी आहेत. उदा. भूकवच घनरूप आहे, तर बाह्यगाभा द्रवरूप आहे.
(आ) मुलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे.
कारण:
- पृथ्वीच्या अंतरंगातील थरांचा विचार केल्यास, जसे आपण खोल जाऊ तशी मूलद्रव्यांची घनता वाढत जाते.
- भूकवचासारख्या वरच्या थरात सिलिका, ॲल्युमिनिअम आणि मॅग्नेशियम यांसारखी कमी घनतेची मूलद्रव्ये आढळतात.
- याउलट, पृथ्वीच्या केंद्रापाशी (गाभ्यात) लोह आणि निकेल यांसारखी जास्त घनतेची वजनदार धातू-खनिजे एकवटलेली आहेत.
- गाभ्याची घनता (१३.३ ग्रॅम/घसेमी) भूकवचाच्या घनतेपेक्षा (२.६५ ते ३.३ ग्रॅम/घसेमी) कितीतरी जास्त आहे.
(इ) प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे.
कारण:
- प्रावरणाचा वरचा भाग, ज्याला 'दुर्बलावरण' म्हणतात, तो अत्यंत प्रवाही असतो.
- याच भागात शिलारस कोठी आढळतात, ज्यातून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो.
- प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींतून ऊर्जा उत्सर्जित होते, ज्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखी यांसारख्या प्रक्रिया घडतात.
- भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने याच भागात आढळतात.
(ई) भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.
कारण:
- भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नसते; खंडाखाली ती सुमारे १६ ते ४५ किमी असते, तर सागरपृष्ठाखाली ती केवळ १० किमीपेक्षा कमी (७ ते १० किमी) आढळते.
- खंडीय कवच हे प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनिअमचे (सियाल) बनलेले असून त्याची घनता कमी आहे, तर महासागरीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियमचे (सायमा) बनलेले असून ते जास्त घनतेचे व तुलनेने कमी जाडीचे असते.
(उ) चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते.
कारण:
पृथ्वीच्या बाह्यगाभ्यातील विद्युत प्रवाहामुळे पृथ्वीभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार होते.
हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या वातावरणाबाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते, ज्याला 'चुंबकावरण' म्हणतात.
- हे आवरण सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आणि 'सौरवातांपासून' (Solar winds) पृथ्वीचे रक्षण करते.
- जर हे चुंबकावरण नसते, तर सौरवातांमुळे पृथ्वीवरील वातावरण नष्ट झाले असते.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-आठवी – भूगोल-पाठ -2-पृथ्वीचे अंतरंग – नोट्स
PDF : इयत्ता-आठवी – भूगोल-पाठ -2-पृथ्वीचे अंतरंग – स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Main Page : – Maharashtra Board इयत्ता आठवी-भूगोल – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा 1 : स्थानिक वेळ व प्रमाण वेळ – Online Solutions
Next Chapter : धडा 3 : आर्द्रता व ढग – Online Solutions
