Solutions-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-५-भारत व अन्य देश-Maharashtra Board

भारत व अन्य देश

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-5

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश -

() पाकिस्तान

() बांगलादेश

() नेपाळ

() म्यानमार

उत्तर :

(क) नेपाळ

() भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश -

() पाकिस्तान चीन

() नेपाळ भूटान

() म्यानमार मालदीव

() अफगाणिस्तान अमेरिका

उत्तर :

(अ) पाकिस्तान व चीन

() भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी -

() दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक

() काश्मीर समस्या

() अण्वस्त्रविषयक संघर्ष

() वरील सर्व समस्या

उत्तर :

(ड) वरील सर्व समस्या

प्रश्न . पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

() दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण -

  • समानता आणि परस्पर सन्मान या मूल्यांचा आधार घेऊन भारत आपल्या शेजारील देशांशी संबंध प्रस्थापित करतो.
  • दक्षिण आशियातील देशांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा सर्वांत मोठा देश आहे.
  • आर्थिक व तांत्रिक प्रगतीच्या बाबतीत भारत शेजारील राष्ट्रांपेक्षा अधिक प्रगत आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील देशांमध्ये भारताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

() भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण -

  • भारत आणि चीन यांच्यात मॅक्मोहन सीमारेषेबाबत सुरुवातीपासूनच मतभेद सुरू आहेत.
  • तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे भारत-चीन संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला.
  • चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्र व अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवल्यामुळे भारताच्या सुरक्षेवर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारत-चीन संबंध तणावपूर्ण बनले आहेत.
  • गलवान खोऱ्यात 2020 मध्ये झालेल्या संघर्षामुळे विश्वासाचा तुटवडा वाढला.

() श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांति सेना पाठवली.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण -

  • श्रीलंकेत तमिळ अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायामुळे तेथील अंतर्गत संघर्ष वाढत होता.
  • या संघर्षामुळे श्रीलंकेतील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आले होते.
  • भारत आणि श्रीलंका यांच्यात १९८७ मध्ये झालेल्या करारानुसार श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारतावर आली.
  • शेजारील देशात अस्थिरता निर्माण होऊ नये आणि प्रादेशिक शांतता राखण्यासाठी श्रीलंका सरकारच्या विनंतीवरून भारताने शांती सेना पाठवली.

प्रश्न . दिलेल्या  सूचनेप्रमाणे कृती करा.

. पुढील तक्ता पूर्ण करा.

क्र. झालेले करार/देवाणघेवाण संबंधित देश
१. ---------- भारत-पाकिस्तान
२. मॅकमोहन रेषा -------------
३. ----------------- भारत-बांगलादेश
४. नैसर्गिक वायूची आयात --------------
५. ---------------- भारत-अमेरिका
६. पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य ------------
७. --------------------------- भारत-आफ्रिका
उत्तर :

क्र. झालेले करार/देवाणघेवाण संबंधित देश
१. सिमला करार भारत - पाकिस्तान
२. मॅक्मोहन रेषा भारत -चीन
३. पाणीवाटप व सीमारेषेसंबंधी करार भारत - बांग्लादेश
४. नैसर्गिक वायूची आयात भारत - म्यानमार
4. नागरी अणुसहकार्य करार भारत - अमेरिका
६. पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य भारत -मालदीव
७. शिखर परिषद - २०१५ भारत -आफ्रिका

प्रश्न . पुढील संकल्पना स्पष्ट करा.

() सिमला करार

उत्तर :

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ च्या युद्धानंतर २ जुलै १९७२ रोजी सिमला येथे सिमला करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही देशांनी आपापसातील वाद शांततामय मार्गाने व द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवण्याचे मान्य केले.
  • या करारानुसार काश्मीरमधील संघर्षविराम रेषेला नियंत्रण रेषा (Line of Control) असे नाव देण्यात आले. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा व प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे ठरवले.
  • परंतु पुढे पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही.

(२) भारत-नेपाळ मैत्री करार

उत्तर :

  • भारत आणि नेपाळ यांच्यात १९५० साली भारत–नेपाळ मैत्री करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही देशांनी परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध, सहकार्य आणि शांतता राखण्याचे मान्य केले.
  • या करारामुळे भारत व नेपाळच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात मुक्तपणे ये-जा, राहणे, व्यापार व रोजगार करण्याची मुभा मिळाली. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांच्या सुरक्षा हितसंबंधांचा आदर करण्याचे व परस्पर सल्लामसलत करून निर्णय घेण्याचे ठरवले.
  • नेपाळच्या पायाभूत सुविधा, अन्नधान्य आणि व्यापार याबाबत भारताने नेपाळला मदत करावी, असेही या मैत्री कराराने ठरवण्यात आले.
  • म्हणून भारत–नेपाळ मैत्री करारामुळे दोन्ही देशांतील ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक संबंध अधिक दृढ झाले.

() मॅकमोहन रेषा

उत्तर :

  • मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन (तिबेट) यांच्यातील सीमारेषा आहे. १९१४ साली सिमला येथे झालेल्या परिषदेत ब्रिटिश भारताचे प्रतिनिधी सर हेन्री मॅकमोहन यांनी ही सीमारेषा निश्चित केली.
  • ही रेषा भारताच्या ईशान्य भागातील अरुणाचल प्रदेश आणि तिबेट यांच्यामधील सीमा दर्शवते. भारताने मॅकमोहन रेषेला अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून मान्यता दिली आहे; मात्र चीन या रेषेला मान्यता देत नाही.
  • यामुळेच मॅकमोहन रेषेबाबत भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.
  • या सीमारेषेच्या वादातून चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमणही केले होते.

() भारत-अफगाणिस्तान संबंध

उत्तर :

  • भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ऐतिहासिक, मैत्रीपूर्ण व सहकार्याचे संबंध आहेत.
  • दोन्ही देशांमधील संबंध राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानवीय मदतीच्या क्षेत्रात विकसित झालेले आहेत.
  • भारताने अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी रस्ते, धरणे, वीज प्रकल्प, शाळा व रुग्णालये उभारण्यात मदत केली आहे. तसेच अफगाण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारतात शिष्यवृत्ती दिल्या जातात.
  • दहशतवादाला विरोध, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य राखणे या मुद्द्यांवर भारत आणि अफगाणिस्तान यांचे समान मत आहे.
  • त्यामुळे भारत–अफगाणिस्तान संबंध दक्षिण आशियातील शांतता व सहकार्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.

प्रश्न . पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

() भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा.

उत्तर :

  • भारत आणि अमेरिका यांच्यातील समान दुवा म्हणजे दोन्ही देशांत असलेली लोकशाही.
  • नोकरी आणि शिक्षण या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांनी अमेरिकेशी सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले.
  • शीतयुद्धानंतर भारताचे अमेरिकेशी सुरक्षाविषयक संबंध अधिक वाढले.
  • सुरुवातीपासूनच अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर अधिक दृढ झाले. अशा रितीने भारत-अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध वाढत गेले.

() शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा.

उत्तर :

शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी भारताने सातत्याने प्रयत्न केले आहेत. भारत आपल्या परराष्ट्र धोरणात लोकशाही मूल्ये, शांतता आणि सहकार्य यांना महत्त्व देतो. यासंदर्भातील काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत :

१) नेपाळ : नेपाळमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताने राजकीय संवाद, मध्यस्थी आणि सहकार्य केले. राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही व्यवस्था निर्माण होण्यासाठी भारताने नेपाळमधील लोकशाही शक्तींना पाठिंबा दिला.

२) भूतान : भूतानमध्ये लोकशाही व्यवस्था विकसित व्हावी यासाठी भारताने आर्थिक व प्रशासकीय सहकार्य केले. भूतानने राजेशाहीतून लोकशाहीकडे वाटचाल करताना भारताचा सक्रिय पाठिंबा लाभला.

३) श्रीलंका : श्रीलंकेतील अंतर्गत संघर्ष शांततामय मार्गाने सोडवून लोकशाही टिकवण्यासाठी भारताने शांती प्रक्रिया आणि राजकीय तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना मदत केली.

४) मालदीव : मालदीवमध्ये लोकशाही संकटाच्या काळात भारताने तेथील लोकनियुक्त सरकारला मदत करून लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यास हातभार लावला.

अशा प्रकारे शेजारील राष्ट्रांमध्ये लोकशाही, स्थैर्य व शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारताने विविध मार्गांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.

() दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे?

उत्तर :

दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना ही दक्षिण आशियातील देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी कार्य करते. तिची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :

  • सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व तांत्रिक सहकार्य वाढवणे.
  • व्यापार वाढीस चालना देऊन प्रादेशिक विकास साधणे.
  • दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, शिक्षण व मानव संसाधन विकासासाठी संयुक्त कार्यक्रम राबवणे.
  • विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणे.
  • दक्षिण आशियातील देशांमध्ये शांतता, स्थैर्य व परस्पर समज वाढवणे.
  • संपूर्ण आशियाचे एक मुक्त व्यापारक्षेत्र निर्माण करणे.

या कार्यांमुळे दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये सहकार्य, विकास व सौहार्द निर्माण करण्यासाठी SAARC महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-५-भारत व अन्य देश- नोट्स

PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-५-भारत व अन्य देश- स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *