Notes-Marathi Medium-इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-६-सागरजलाचे गुणधर्म-Maharashtra Board

सागरजलाचे गुणधर्म

इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ- ६-महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :सागरजलाची वैशिष्टये :

  • तापमान
  • क्षारता
  • घनता.

सागरजलाची सर्वसाधारण वैशिष्टये :

  • पॅसिफिक महासागर हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे.
  • जमिनीवरील क्षार (मीठ) पाण्यात मिसळतात आणि नद्यांद्वारे सागरात पोहोचतात.
  • ही प्रक्रिया लाखो वर्षांपासून चालू आहे.
  • बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होते, पण क्षार सागरातच राहतात – त्यामुळे सागराचे पाणी खारट होते.
  • जमीन आणि पाणी यांचे तापमान बदलण्याची गती वेगळी असते:
    • जमीन लवकर गरम होते आणि लवकर थंड होते.
    • पाणी हळूहळू गरम होते आणि हळूहळू थंड होते.

त्यामुळे:

  • विषुववृत्ताजवळ (गरम भागात) जमिनीचे तापमान सुमारे ४५°C, तर पाण्याचे २५°C असते.
  • ध्रुवाजवळ (थंड भागात) जमिनीचे तापमान सुमारे -२५°C, तर पाण्याचे -२°C असते.

तापमान :

सागरजलाचे 'पृष्ठीय' तापमान आणि 'खोलीनुसार' तापमान अभ्यासले जाते.

सागरजलाचे पृष्ठीय तापमान :

  • सर्वत्र सारखे नसते.
  • अक्षवृत्तानुसार बदलते.
  • विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कमी होत जाते.
    • विषुववृत्ताजवळ : २५° से
    • मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात : १६° से
    • ध्रुवाजवळ : २° से
  • परिणाम करणारे घटक : स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, लाटा, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इ.

सागरजलाचे खोलीनुसार तापमान :

  • खोल जाताना तापमान कमी होते. पण हा बदल सर्वत्र सारखा नसतो.
  • विषुववृत्ताजवळ फरक सर्वाधिक, मध्य अक्षवृत्तात कमी, तर ध्रुवीय प्रदेशात पृष्ठीय व खोल तापमान सारखे (४° से).
  • जास्त खोलीवर तापमानात फारसा फरक पडत नाही. २००० मी नंतर तापमान स्थिर ४° से राहते.
  • जास्त खोल सागरजल कधीही गोठत नाही.
  • भूवेष्टीत समुद्रापेक्षा खुल्या सागराचे तापमान कमी असते.

विषुववृत्ताजवळ खोलीनुसार तापमान:

खोली (मीटर) तापमान (°C)
पृष्ठीय १८–२५°C
५०० मीटर १२°C
१००० मीटर ८°C
१५०० मीटर ५°C
२००० मीटर ४°C

सूर्यकिरणांचा प्रभाव:

  • सूर्यकिरण सागरपृष्ठावरून परावर्तित होतात. काही किरण खोलवर जातात, पण तीव्रता कमी असते.
  • २००० मीटरच्या खाली सूर्यकिरण पोहोचत नाहीत. त्यामुळे त्या खोलीवर तापमान सर्वत्र ४°C असते.

क्षारता :

  • सागरजलात मीठ (क्षार) असतो, पण सगळ्या सागरत त्याचे प्रमाण सारखे नसते.
  • सागरात मीठ (क्षार) साठल्यामुळे पाणी खारट होते.
  • नद्या जमिनीवरील क्षार सागरात आणतात.
  • बाष्पीभवन फक्त पाण्याची वाफ करते, क्षार सागरातच राहतात.

क्षारतेवर परिणाम करणारे घटक:

  • तापमान आणि बाष्पीभवनाचा वेग
  • गोड्या पाण्याचा पुरवठा
  • समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित (चारही बाजूंनी जमिनीने वेढलेले) स्वरूप

क्षारतेचे फायदे:

  • क्षारतेमुळे पाण्याची उद्धरण क्षमता वाढते.
  • मोठी जहाजे पाण्यावर सहज तरंगतात – जलवाहतुकीसाठी उपयुक्त.
  • मिठागरांमधून मीठ मिळवता येते.
  • मीठाचा उपयोग:  अन्नात, औषधे व रसायने तयार करण्यासाठी, बर्फ बनवणे आणि अन्न टिकवणे

 भौगोलिक क्षेत्रानुसार क्षारतेतील फरक:

क्षेत्र क्षारता कारण
मध्य अक्षवृत्तीय (उष्ण कटिबंध) 36–37‰ जास्त तापमान, जास्त बाष्पीभवन
समशीतोष्ण कटिबंध कमी मध्यम तापमान, मध्यम बाष्पीभवन
ध्रुवीय प्रदेश 32‰ कमी तापमान, कमी बाष्पीभवन
विषुववृत्ताजवळ मध्यम ढगाळ हवामान, पाऊस, नद्यांचा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि जास्त तापमान यांचा संतुलन

समशीतोष्ण कटिबंधातील सागरजलक्षारता :

  • या कटिबंधात सूर्यकिरणे तिरपी पडतात. त्यामुळे तापमान कमी → बाष्पीभवनाचा वेगही कमी. पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी आणि वितळणाऱ्या बर्फामुळे गोड्या पाण्याचा मुबलक पुरवठा होतो. म्हणूनच समशीतोष्ण कटिबंधात अक्षांश वाढत जाईल तशी क्षारता कमी होत जाते.

काही ठळक उदाहरणे:

समुद्र / महासागर क्षारता (‰) वैशिष्ट्य
अटलांटिक महासागर 36‰ खुला महासागर
भूमध्य समुद्र 39‰ भूवेष्टित, बाष्पीभवन जास्त
मृत समुद्र 332‰ अतिशय खारट, पूर्णतः भूवेष्टित
बंगालचा उपसागर 32‰ ढगाळ हवामान, नद्यांचा गोड्या पाण्याचा पुरवठा
अरबी समुद्र 36‰ तुलनेत कमी गोड्या पाण्याचा पुरवठा

घनता :

  • सागरजलाचे तापमान आणि क्षारता हे दोन घटक सागरजलाची घनता ठरवतात.
  • तापमान कमी असल्यास घनता वाढते.
  • क्षारता कमी असल्यास घनता कमी होते.
  • मात्र, क्षारता कमी असूनही तापमान कमी असल्यास घनता वाढते.
  • तापमान व क्षारतेचा घनतेवरील प्रभाव ५०० मी खोलीवर विशेष दिसून येतो.
  • मात्र, १००० मी खोलीनंतर तापमान-क्षारता-बनता हे घटक फारसे बदलत नाहीत.
  • तापमान-क्षारता-घनता या सागरजलाच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे सागरी प्रवाहांची निर्मिती होते.
  • सागरी प्रवाहांमुळे सागरजलाच्या तापमानाचे नियंत्रण होते.
  • प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहांचा परिणाम होतो.

मृत समुद्र :

  • मृत समुद्र हे इस्राईल आणि जॉर्डन देशांच्या सीमेवर आहे.
  • या समुद्राचे पाणी खूपच खारट आहे – सामान्य समुद्राच्या तुलनेत १० पट जास्त.
  • या समुद्राच्या पाण्याची क्षारता ३३२‰ आहे. सर्वसाधारण महासागरी जलाची क्षारता ३५‰ असते.
  • जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्रात मिळते.
  • येथे पाऊस कमी, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी आणि बाष्पीभवन जास्त असल्यामुळे पाणी खूप खारट झाले आहे.
  • या पाण्यात मासे आणि इतर सजीव राहू शकत नाहीत. काही एकपेशीय जीव मात्र तग धरतात.
  • खारटपणामुळे पाण्यात क्षार साठतात आणि त्यातून क्षारस्तंभ तयार होतात. काही स्तंभ पाण्याच्या वर दिसतात.
  • पाण्याची घनता जास्त असल्यामुळे येथे बुडण्याची शक्यता नाही – आपण सहज तरंगू शकतो.
  • मृत समुद्राजवळचा भूभाग जगातील सर्वात कमी उंचीचा आहे – काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून ४०० मीटर खाली.

 

संकल्पना स्पष्टीकरण·      

  • भूवेष्टित समुद्र : पूर्णपणे जमिनीने वेढलेले समुद्र, म्हणजे 'भूवेष्टित समुद्र' होत. भूवेष्टित समुद्र महासागरांना जोडलेले नसतात.·      
  • क्षारता : पाण्यातील क्षारांचे प्रमाण, म्हणजे पाण्याची 'क्षारता' होय.

 

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-६-सागरजलाचे गुणधर्म- नोट्स

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-६-सागरजलाचे गुणधर्म-स्वाध्याय प्रश्नोत्तरे


महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 51

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (24 PDF) Rs. 86

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *