Solutions-Marathi Medium-इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-४-बाह्यप्रक्रिया भाग-२-Maharashtra Board

बाह्यप्रक्रिया भाग-२

इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-४-महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा.

() तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते.

उत्तर :

योग्य.

() वाळवंटी प्रदेशात दीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते.

उत्तर :

अयोग्य.

() भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते.

उत्तर :

योग्य.

() वाऱ्याचे कार्य क्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते.

उत्तर :

योग्य.

प्रश्न . पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा.

() हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो.

उत्तर :

अयोग्य

() मंद उतार, मंदावलेली गती वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते.

उत्तर :

योग्य.

() नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते.

उत्तर :

योग्य.

() हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते.

उत्तर :

अयोग्य

प्रश्न . चुकीची जोडी ओळखा.

() संचयन - ‘V’ आकाराची दरी.

() वहन - ऊर्मिचिन्हे.

() खनन - भूछत्र खडक.

उत्तर :

(अ) संचयन - ‘V’ आकाराची दरी.

प्रश्न . खालील आकृत्यां मधील भूरूपे कोणती, ते लिहा.

उत्तर :

(i)-'व्ही' (V) आकाराची दरी; (ii)-घळई; (iii)-त्रिभुज प्रदेश.

प्रश्न . खाली दिलेल्या भूरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा.

(धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर, गिरिशृंग, बारखाण, हिमोढ, कुंभगर्ता , भूछत्र खडक, विलयविवर, खाजण, पुळण, लवणस्तंभ)

नदी वारा हिमनदी सागरी लाटा भूजल
 

 

       
उत्तर :

नदी वारा हिमनदी सागरी लाटा भूजल
धबधबा,

त्रिभुज प्रदेश,

कुंभगर्त

बारखाण,

भूछत्र खडक

हिमगव्हर,

गिरिशृंग,

हिमोढ

खाजण,

पुळण

विलयविवर, 

लवणस्तंभ

प्रश्न . पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

() नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?

उत्तर :

नदीचे खनन कार्य : जेव्हा नदी वेगाने वाहते, तेव्हा ती रेती, दगडगोटे व उपनद्या घेऊन जमिनीला खणते. यामुळे खालील भूरूपे तयार होतात:

  • घळई (खोल दऱ्या)
  • V आकाराच्या दऱ्या
  • धबधबे

() लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते कोठे होते?

उत्तर :

  • लवणस्तंभांची निर्मिती भूजल या कारकामुळे होते.
  • चुनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवणस्तंभांची निर्मिती होते.

() सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती?

उत्तर :

सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे : (१) पुळण (२) वाळूचा दांडा (३) खाजण.

() हिमोढाचे प्रकार कोणते?

उत्तर :

हिमनदी वाहताना बर्फाबरोबर रेती, दगड, माती व गाळ घेऊन जाते. हे गाळ जिथे साठतो, त्याला हिमोढ म्हणतात.

हिमोढाचे चार प्रकार:

क्रमांक प्रकार व्याख्या
I भू-हिमोढ हिमनदीच्या तळाशी साचलेला गाळ
II पार्श्व हिमोढ हिमनदीच्या बाजूला (काठावर) साचलेला गाळ
III मध्य हिमोढ दोन हिमनद्या एकत्र आल्यावर त्यांच्या मधोमध साचलेला गाळ
iV अंत्य हिमोढ हिमनदीच्या शेवटी, जिथे बर्फ पाण्यात बदलतो, तिथे साचलेला गाळ

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-४-बाह्यप्रक्रिया भाग-२- नोट्स

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-४-बाह्यप्रक्रिया भाग-२-स्वाध्याय प्रश्नोत्तरे


महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 51

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (24 PDF) Rs. 86

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *