Solutions-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-५ : शैक्षणिक वाटचाल-Maharashtra Board

शैक्षणिक वाटचाल

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-५

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() परम-८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ -

() डॉ. विजय भटकर

() डॉ. आर.एच.दवे

() पी. पार्थसारथी

() वरीलपैकी कोणीही नाही.

उत्तर :

(अ) डॉ. विजय भटकर

() जीवन शिक्षण हे मासिक ........ या संस्थे मार्फत प्रकाशित केले जाते.

() बालभारती

() विद्या प्राधिकरण

() विद्यापीठ शिक्षण आयोग

() महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

उत्तर :

(ब) विद्या प्राधिकरण

() आय.आय.टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्या साठी प्रसिद्ध आहे.

() कृषी

() वैद्यकीय

() कुशल दर्जाचे व्यवस्थापक

() अभियांत्रिकी

उत्तर :

(ड) अभियांत्रिकी

प्रश्न . दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.

() भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती कार्य
………….. भारताचे पहिले शिक्षणमंत्री
………….. विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
प्रा.सय्यद राऊफ …………..
………….. कोसबाड प्रकल्प
उत्तर :

व्यक्ती कार्य
मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष
प्रा.सय्यद राऊफ महाराष्ट्रात पहिली ते सातवीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम केले.
अनुताई वाघ कोसबाड प्रकल्प

() ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगया संस्थेची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहा.

उत्तर :

स्थापना वर्ष - (१ सप्टेंबर १९६१)

मुख्यालय – नवी दिल्ली

स्थापना उद्देश – शालेय शिक्षणातील संशोधन, प्रशिक्षण व सल्ला सेवा

मुख्य कार्ये

  • अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करणे
  • शिक्षक प्रशिक्षण
  • शैक्षणिक संशोधन व नवकल्पना
  • शैक्षणिक साहित्य निर्मिती

प्रमुख प्रकाशने – NCERT पाठ्यपुस्तके, संशोधन अहवाल, शैक्षणिक नियतकालिके

संबंधित संस्था – SCERTs, प्रादेशिक शैक्षणिक संस्था

लाभार्थी – विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते

विशेष नोंद – CBSE व इतर शिक्षण मंडळांसाठी आधारभूत पुस्तके

प्रश्न . पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.

उत्तर :

जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला कारण,

  • स्वातंत्र्योत्तर भारतात निरक्षरता ही मोठी समस्या होती, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा सुधारण्याची गरज होती,
  • तसेच अनुसूचित जाती-जमातीबहुल ग्रामीण भागांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे आवश्यक होते.
  • त्यासाठी केंद्र सरकारने 'खडू-फळा योजना' सुरू करून प्राथमिक शिक्षण व्यवस्थेस गती दिली.
  • १९९४ मध्ये या योजनेचा विस्तार करून जादा शिक्षक व वर्गखोल्या दिल्या.
  • अनुसूचित जाती-जमातीबहुल ग्रामीण भागांना प्राधान्य देण्याची बंधने राज्य सरकारांवर घातली गेली.

अशा रितीने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी 'जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम' सुरू करण्यात आला.

() NCERT ची स्थापना करण्यात आली.

उत्तर :

  • केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत व सर्वकष धोरणासंदर्भात मदत करणे.
  • शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत केंद्र शासनाला मार्गदर्शन करणे.
  • प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकनिर्मिती यांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शन करणे.
  • शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण इत्यादींबाबत काम करणे.

या कारणांसाठी केंद्र शासनाने १ सप्टेंबर १९६१ रोजी NCERT ची स्थापना केली.

() भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला.

उत्तर :

भारतीय कृषी संशोधन संस्थेमुळे :

  • गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले.
  • कृषी क्षेत्राचा विकास, मृदांचा शास्त्रशुद्ध अभ्यास, वनस्पतीशास्त्र इत्यादींच्या अभ्यासास सुरुवात झाली.
  • एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन सुरू झाले.
  • कृषी क्षेत्राचा विकास होऊन उत्पादन वाढले.

म्हणून भारतीय कृषी संशोधनाद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला.

प्रश्न . टीपा लिहा.

() इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

उत्तर :

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना २० सप्टेंबर १९८५ रोजी करण्यात आली.
  • या विद्यापीठाची संकल्पना १९७० मध्ये भारत सरकारच्या विविध विभागांतील चर्चासत्रातून पुढे आली.
  • सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा पोहोचवणे हा या विद्यापीठाचा मुख्य उद्देश होता.
  • ज्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही, अशांना वय व पात्रतेच्या अटींमध्ये सवलत देत उच्च शिक्षणाची संधी दिली जाते.
  • हे विद्यापीठ एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम, देश-विदेशातील प्रशिक्षण केंद्रे, आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे दूरस्थ शिक्षण अशा वैशिष्ट्यांसह कार्य करते.

() कोठारी आयोग

उत्तर :

मुदलियार आयोगाने सुचवलेल्या शिक्षणाच्या आकृतिबंधाची अंमलबजावणी अवघड झाल्याने १९६४ साली डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला गेला.

 

  • नेमलेल्या आयोगाने शिक्षण क्षेत्रातील सर्व स्तरांचा अभ्यास केला आणि बदलांची शिफारस केली.
  • आयोगाने१०+२+३ या शिक्षण आकृतिबंधाचा पुरस्कार केला, म्हणजे १० वर्षे शाळा शिक्षण, २ वर्षे उच्च माध्यमिक आणि ३ वर्षे विद्यापीठ शिक्षण असा देशभर एकसमान शिक्षण क्रम सुचवला.
  • आयोगानेत्रिभाषा सूत्राचा प्रस्ताव मांडला — मातृभाषा, हिंदी, आणि इंग्रजी किंवा अन्य आधुनिक भारतीय भाषा हे तीन भाषांचे शिक्षण करण्यात यावे.
  • अनुसूचित जाती-जमाती तसेच सामाजिकदृष्ट्या मागास वर्गासाठी शिक्षणात प्राधान्य व आरक्षणतसेच आर्थिक सवलतीच्या शिफारशी आयोगाने केल्या.
  • आयोगाच्या मुख्य उद्दिष्टांमध्येराष्ट्रीय एकात्मता, शिक्षणाचे आधुनिकीकरण, नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा विकास, आणि सर्वांसाठी समसमान संधी राखणे यांचा समावेश होता.

अशा प्रकारे, कोठारी आयोगाने भारतीय शिक्षण व्यवस्था व्यापकपणे बदलण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या, ज्या आजही शिक्षण धोरणात आधारभूत ठरल्या आहेत.

() भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर

उत्तर :

  • भारत सरकारनेटाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) आणि अणुशक्ती मंडळ (Atomic Energy Commission) यांची स्थापना अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी केली. या दोन्ही संस्थांचे संचालक डॉ. होमी भाभा हे होते.
  • या संस्थांनीन्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स यासारख्या विषयांत महत्त्वाचे संशोधन केले.
  • शास्त्रज्ञांना अणुभट्टी निर्मितीसाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल सुरू करण्यात आले.
  • अणुभट्टीच्या माध्यमातून किरणोत्सारी पदार्थांची निर्मितीकेली जाते व त्यांचा शेती, उद्योग आणि वैद्यक क्षेत्रांत वापर होतो.

यामुळे भारतातील अणुविज्ञान क्षेत्रात मूलभूत संशोधन, प्रगत प्रशिक्षण आणि सामाजिक उपयोजन अशा सर्व बाबींमध्ये या संस्थांची मोठी भूमिका आहे.

() बालभारती

उत्तर :

  • महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, म्हणजेचबालभारती, पुणे येथे २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन करण्यात आले.
  • इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनमान्य आणि दर्जेदार पाठ्यपुस्तके बालभारती तयार करते.
  • ही पुस्तकेमराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगु अशा आठ भाषांमध्ये प्रकाशित केली जातात.
  • विद्यार्थ्यांसाठी‘किशोर’ हे मासिक बालभारतीकडून प्रसिध्द केले जाते, जे ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी आहे.
  • बालभारती ही राज्यातील शालेय शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची आणि विश्वासार्ह संस्था आहे.

प्रश्न . पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

() ‘खडू-फळा’ (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता ?

उत्तर :

प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने १९८८ साली 'खडू-फळा' योजना (ऑपरेशन ब्लॅकबोर्ड) सुरू केली.

'खडू-फळा' योजनेतील उपक्रम :

या योजनेअंतर्गत,

  • शाळांचा दर्जा सुधारणे.
  • किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे.
  • प्रत्येक शाळेला किमान दोन वर्गखोल्या, स्वच्छतागृह यासाठी निधी देणे.
  • दोन शिक्षकांपैकी एका स्त्री-शिक्षिकेची नेमणूक करणे.
  • फळा, नकाशा, ग्रंथालय, प्रयोगशाळा साहित्य आणि क्रीडा साहित्य यांसाठी देखील आर्थिक मदत पुरविण्यात आली.

() शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात ?

उत्तर :

  • कृषी विद्यालये/ महाविद्यालये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करतात.
  • कृपी क्षेत्राचा विकास करण्यासाठी संशोधनावर भर देतात.
  • एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन केले जाते.
  • सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गह्ू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला इत्यादींवर विविध प्रयोग केले जातात.
  • या महाविद्यालयांतून मृदाशास्त्र, कृषिशास्त्र, आर्थिक वनस्पति-शास्त्र इत्यादी विभाग निर्माण करून अभ्यासक्रम राबवले जातात.

अशा रितीने शेतीच्या विकासात कृषी विद्यालये व महाविद्यालये आपली भूमिका बजावतात.

() भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा.

उत्तर :

स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या वैद्यकीय क्षेत्रात पुढील प्रगती झाली :

  • ICMR स्थापना – १९४९; वैद्यकीय संशोधनासाठी.
  • संशोधन केंद्रे – देशभरात २६, विविध रोगांवर संशोधन.
  • यश – क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रण.
  • AIIMS स्थापना – वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना.
  • महाविद्यालये – वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये.
  • सार्वजनिक इस्पितळे – सुसज्ज व माफक दरात उपचार.
  • परिचारिका प्रशिक्षण – प्रशिक्षण महाविद्यालये.
  • स्पेशालिटी केंद्रे – हृदयविकार, मेंदूविकार, नेत्रविकार उपचार.
  • मेडिकल कौन्सिल पुनर्गठन – १९५८; गुणवत्ता निकष व देखरेख.
  • इतर संस्था – आयुर्वेद व कर्करोग शिक्षण क्षेत्रातील संशोधन व सेवा.

() तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा.

उत्तर :

आमच्या शाळेमध्ये सर्व स्तरांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक अभ्यासक्रम आणि सह-अभ्यासक्रम उपक्रम राबवले जातात, यापैकी काहींचा समावेश आहे:

शालेय उपक्रम (शैक्षणिक क्रिया) :

  • अभ्यासक्रमाशी संबंधित क्रिया : भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांचे अध्यापन.
  • लेखी व तोंडी परीक्षा : ज्ञानाचे मूल्यमापन.
  • प्रयोगशाळा कार्य : विज्ञान, संगणक, भूगोल इत्यादी विषयांचे प्रयोग.
  • प्रकल्प व सादरीकरणे : विषयांवरील सखोल अभ्यास.
  • ग्रंथालय वाचन : ज्ञानवृद्धी व वाचनाची आवड निर्माण करणे.

सहशालेय उपक्रम (अभ्यासेतर क्रिया) :

  • क्रीडा स्पर्धा : धावणे, खेळ, योगासन, व्यायाम.
  • सांस्कृतिक कार्यक्रम : नृत्य, संगीत, नाटक, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा.
  • सामाजिक सेवा उपक्रम : स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे.
  • शैक्षणिक सहली : ऐतिहासिक स्थळे, विज्ञान प्रदर्शन, उद्योगभेटी.
  • विद्यार्थी संघटना व क्लब : विज्ञान क्लब, साहित्य मंडळ, निसर्ग मंडळ.

आमच्या शाळेतील सांधिक स्पर्धांमध्ये सर्व वर्गांचा उत्साही सहभाग असतो, शिक्षकही आनंदाने सामील होतात, विजेत्यांची आंतरशालेय स्पर्धांसाठी निवड केली जाते.

हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच नेतृत्वगुण, सर्जनशीलता, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक जबाबदारी वाढवतात.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- इतिहासपाठ-५ : शैक्षणिक वाटचाल - नोट्स

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-५ : शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Useful Links

Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium  – All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : धडा ४ : आर्थिक विकास online Solutions

Next Chapter : धडा ५ : शैक्षणिक वाटचाल online Solutions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *