Notes-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-८-अर्थव्यवस्था आणि व्यवसाय-Maharashtra Board

अर्थव्यवस्था आणि व्यवसाय

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-८-महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :

  • भारत देशांतील अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
  • ब्राझील देशांतील अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
  • भारत व ब्राझील यांच्यातील आंतरराष्ट्रीय व्यापार

मिश्र अर्थव्यवस्था :

मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक (शासकीय) व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असलेली अर्थव्यवस्था.

  • भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत वरीलप्रमाणे मिश्र अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे.
  • दोघंही सार्वजनिक सेवांमध्ये शासनाचे नियंत्रण राखतात, तर काही सेवा क्षेत्रांमध्ये खासगी सहभागासही प्रोत्साहन दिले जाते.
  • भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उदयोग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
  • भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे.

भारत, ब्राझील व अमेरिकेची संयुक्त संस्थाने - तौलनिक अभ्यास :

अर्थव्यवस्थेचे स्वरूप :

  • भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था मिश्र व विकसनशील आहेत.
  • भारत कृषिप्रधान असून सेवा व औद्योगिक क्षेत्राचा विकास होत आहे.
  • ब्राझीलमध्ये कृषी व खनिज संसाधनांवर आधारित उद्योगांचे प्राबल्य आहे.
  • याउलट अमेरिका ही विकसित देश असून तिची अर्थव्यवस्था अत्यंत प्रगत, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सेवा क्षेत्रावर आधारित आहे.

स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) :

  • भारताचे एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न अंदाजे 7 ट्रिलियन डॉलर (2024) आहे,
  • ब्राझीलचे GDP सुमारे 1 ट्रिलियन डॉलर इतके आहे.
  • याच्या तुलनेत अमेरिका हे जगातील सर्वात मोठे अर्थव्यवस्थेचे देश असून तिचे GDP सुमारे 28 ट्रिलियन डॉलर आहे.

दरडोई उत्पन्न (Per capita income) :

  • भारतामध्ये दरडोई उत्पन्न हे अंदाजे $2,600 ते $2,800 दरम्यान आहे.
  • ब्राझीलमध्ये दरडोई उत्पन्न सुमारे $10,000 ते $11,000 दरम्यान असून ते भारतापेक्षा जास्त आहे.
  • अमेरिका मात्र खूपच पुढे असून तेथे दरडोई उत्पन्न सुमारे $85,000 ते $90,000 इतके आहे.

लोकसंख्या :

  • भारताची लोकसंख्या सुमारे 142 कोटी असून जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे.
  • ब्राझीलची लोकसंख्या सुमारे 5 कोटी आहे.
  • अमेरिकेची लोकसंख्या सुमारे 34 कोटी आहे.

साक्षरतेचे प्रमाण :

  • साक्षरतेच्या बाबतीत अमेरिका अग्रेसर असून तेथे साक्षरतेचे प्रमाण सुमारे 99% आहे. ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण सुमारे 94% आहे.
  • भारतात हे प्रमाण तुलनेत कमी असून सुमारे 77% आहे, परंतु हे प्रमाण हळूहळू वाढत आहे.

स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न कमी-अधिक असण्याची कारणे :

  • भारताची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे जरी देशाचे एकूण उत्पन्न खूप मोठे असले, तरी दरडोई उत्पन्न खूपच कमी आहे.
  • ब्राझीलमध्ये लोकसंख्या तुलनेत कमी असल्याने दरडोई उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे.
  • अमेरिकेत कमी लोकसंख्या, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादनक्षमतेचा उच्च दर्जा आणि समृद्ध संसाधनांचा भरपूर वापर यामुळे दरडोई उत्पन्न फारच जास्त आहे.

ब्राझीलमधील उद्योग :

ब्राझीलमधील उद्योगांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

शेती :

  • ब्राझीलमधील उच्चभूमी आणि किनारी प्रदेश हे शेती व्यवसायासाठी महत्त्वाचे भाग आहेत.
  • या भागांत सौम्य हवामान, मध्यम पर्जन्यमान आणि अनुकूल भूरचना असल्यामुळे शेतीस पूरक परिस्थिती उपलब्ध आहे.
  • ब्राझीलमध्ये भात आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके, तसेच कॉफी, काकाओ (कोको), रबर आणि ऊस ही नगदी पिके घेतली जातात.
  • कॉफी व सोयाबीन यांच्या उत्पादनात व निर्यातीत अग्रेसर. (कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास झिराइस, सावो पावलो या राज्यांत.)
  • याशिवाय, केळी, अननस, संत्री आणि लिंबूवर्गीय फळांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते.

पशुपालन व पशुपालन व्यवसायावर आधारित व्यवसाय :

  • गवताळ प्रदेशांत गाई, शेळ्या व मेंढ्या यांचे पालन.
  • पशुपालन व्यवसायाच्या विकासामुळे पशुपालन व्यवसायावर आधारित मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन व्यवसायांचा विकास.

खाणकाम :

(i) पूर्व भाग :  ब्राझीलचा पूर्व भाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे. येथे लोहखनिज, मँगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट यांसारखी महत्त्वाची खनिजे आढळतात.

(ii) पश्चिम भाग :

  • या भागात अॅमेझॉन नदीचे खोरे आहे. येथे सदाहरित वने आणि दुर्गम भूप्रदेश असल्यामुळे खनिज शोधणे आणि त्याचा वापर करणे कठीण आहे.
  • याशिवाय, लोकसंख्या विरळ आणि वाहतूक सुविधा अपुरी असल्यामुळे या भागात खाणकाम व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही.

(iii) ब्राझील उच्चभूमी : या भागात खनिजांची चांगली उपलब्धता, वाढती मागणी आणि उत्तम वाहतूक व्यवस्था या गोष्टींच्या मदतीने खाणकाम व्यवसायाचा चांगला विकास झाला आहे.

मासेमारी :

  • ब्राझील देशाला सुमारे ७४०० कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.
  • थंड व उष्ण समुद्र प्रवाहांचा संगम आणि विस्तीर्ण भूखंडमंच यांमुळे दक्षिण अटलांटिक महासागरालगत मासेमारीस अनुकूल क्षेत्र तयार झाले आहे.
  • ब्राझीलमध्ये मासेमारी परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे.
  • हा व्यवसाय वैयक्तिक व लहान समूहांमार्फत, पारंपरिक तंत्रज्ञान व उपकरणांचा वापर करून केला जातो.
  • स्वोर्ड फिश, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन यांसारख्या मासळ्यांचे प्रमाण जास्त असून त्यांची मासेमारी होते.
  • ब्राझीलमध्ये घनदाट वने, नद्यांचे वेगवान प्रवाह आणि प्राकृतिक रचना यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारीचा फारसा विकास झालेला नाही.

ब्राझीलमधील उद्योगांचे वितरण :

(1) ब्राझीलमधील प्रमुख उद्योगांमध्ये खालीलांचा समावेश होतो:

  • लोह आणि पोलाद उद्योग
  • वाहनजोडणी उद्योग
  • खनिज तेल प्रक्रिया
  • रासायनिक उत्पादन
  • सिमेंटनिर्मिती उद्योग

(2) तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरीही परंपरागत उद्योगांचे महत्त्व आजही टिकून आहे.

(3) साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग, तसेच खाद्यान्न प्रक्रिया उद्योग ब्राझीलमध्ये चांगले विकसित झाले आहेत.

उद्योगांचे स्थानानुसार वितरण :

  • मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण प्रामुख्याने ब्राझीलच्या दक्षिण व आग्नेय भागात झाले आहे.
  • ईशान्य व पश्चिम भाग तुलनेत कमी विकसित असून या भागांमध्ये उद्योग वाढीसाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.

भारतातील उद्योग :

शेती :

(१) वैशिष्ट्ये

  • भारतात शेती हा प्राचीन व्यवसाय आहे.
  • एकूण भूभागाच्या सुमारे ६०% भागावर शेती केली जाते.
  • बहुतांश शेती ही निर्वाहासाठी केली जाते.
  • भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान ब्राझीलपेक्षा अधिक आहे.
  • शेती व्यवसायात भारतात अधिक मनुष्यबळ गुंतलेले आहे.

(२) शेतीस चालना देणारे घटक

  • भारतातील उत्तरेकडील विस्तीर्ण गंगा खोऱ्याचे मैदाने
  • सुपीक मृदा व दीर्घ काळ टिकणारे अनुकूल हवामान
  • हवामानातील विविधता यांमुळे शेतीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.

(३) उत्पादित होणारी पिके

  • खाद्यान्न पिके : भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका
  • नगदी पिके : चहा, कॉफी, कापूस, रबर, ताग

(४) परकीय चलन प्राप्ती

  • भारतात मिरी, लवंग, तमालपत्र यांसारखे मसाले, तसेच आंबा, द्राक्ष, सफरचंद यांसारखी फळे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.
  • या कृषी उत्पादनांची निर्यात केल्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होते.

मासेमारी :

भारतातील मासेमारी व्यवसायाची माहिती :

(१) वैशिष्ट्ये :

  • भारत हा खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रणी आहे.
  • आहारातील घटक, रोजगारनिर्मिती, पोषणस्तर वाढवणे, परकीय चलनप्राप्ती इत्यादी कारणांसाठी भारतात मासेमारी व्यवसायाचा उपयोग होतो.
  • त्यामुळे भारतात मासेमारी व्यवसायास खूप महत्त्व आहे.

(२) आहारातील महत्त्व :

  • भारतातील पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा व केरळ
  • पूर्व किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा
  • या राज्यांतील किनारपट्टीच्या प्रदेशांत राहणाऱ्या लोकांच्या आहारात मासे हा एक मुख्य घटक आहे.

(३) खाऱ्या पाण्यातील मासेमारी :

  • वार्षिक मासेमारी उत्पादनापैकी ४०% हिस्सा सागरी मासेमारीचा आहे.
  • अरबी समुद्रात : वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे
  • बंगालच्या उपसागरात : शेवंडे, लबी चकई, रावस इत्यादी जलचरांची पकड केली जाते.

 (४) गोड्या पाण्यातील मासेमारी :

  • भारतातील विविध नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी (मत्स्यपालन) व्यवसाय चालतो.
  • भारतातील गोड्या पाण्यातील मासेमारीत कटला, रोहू, चोपडा इत्यादी मासे पकडले जातात. भारतातील मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा ६० टक्के आहे.

खाणकाम :

भारतातील खाणकाम व्यवसायाची माहिती :

  • भारत हा खनिजसंपत्तीने समृद्ध देश आहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांत धातू खनिजांचे मोठे साठे आढळतात. विशेषतः छोटा नागपूरचे पठार हे खनिजांचे भांडार मानले जाते, ज्यामुळे या परिसरात धातुनिर्मिती उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे.
  • वीजपुरवठा हा उद्योगासाठी महत्त्वाचा घटक असून, दामोदर-महानदी खोरे, हिराकूड प्रकल्प आणि विविध औष्णिक विद्युत केंद्रांमुळे स्वस्त व अखंड वीज उपलब्ध होते. त्यामुळे भारतातील धातू व खाण उद्योगांना चांगली चालना मिळते.

खाण उद्योगांचे केंद्रीकरण खालीलप्रमाणे दिसून येते:

  • कोळसा उद्योग: छत्तीसगढमधील कोर्बा व पूर्व महाराष्ट्रात.
  • खनिज तेल: आसाममधील दिग्बोई, महाराष्ट्राजवळील मुंबई हाय, गुजरातमधील कलोल व कोयाली, तसेच गोदावरी नदीच्या मुखाजवळ.
  • दगड उद्योग: राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशमध्ये कडाप्पा दगड.
  • धातू उद्योग: राजस्थानमध्ये तांबे, शिसे, जस्त, कर्नाटकमध्ये लोह, मँगनीज, अॅल्युमिनिअम, व तमिळनाडूमध्ये अॅल्युमिनिअम उद्योग.

रोजगारनिर्मिती : या सर्व खाणकाम उद्योगांमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते. त्यामुळे खाणकाम व्यवसाय भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो.

भारतातील उद्योगांचे वितरण :

भारतातील उदयोगांच्या वितरणाची माहिती :

(१) असमान वितरण :

  • कच्च्या मालाच्या उपलब्धतेतील भिन्नता, ऊर्जा साधनांमधील भिन्नता, आर्थिक साधनांमधील भिन्नता, मागणीतील भिन्नता इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे असमान वितरण.

(२) धातू उद्योग :

  • झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांत धातू खनिजांचे साठे.
  • भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातुनिर्मितीच्या उद्योगांचे केंद्रीकरण.
  • दामोदर-महानदी खोऱ्यांतील जलविद्युत प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, अनेक औष्णिक विद्युत केंद्रांकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यांमुळे धातू उदयोगांना चालना.
  • राजस्थानात तांबे, शिसे आणि जस्त धातू उदयोग.
  • कर्नाटकात लोह-पोलाद, मँगनीज व अॅल्युमिनिअम धातू उदयोग.
  • तमिळनाडूत अॅल्युमिनिअम धातू उदयोग.

(३) शेतीवर आधारित उदयोग :

  • कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचे कच्च्या मालाच्या प्रदेशांत केंद्रीकरण.
  • महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यांत साखर उदयोग.
  • पश्चिम बंगाल राज्यात ताग उदयोग.
  • विविध राज्यांच्या वनप्रदेशांजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तूंची निर्मिती म्हणजेच, वनोत्पादनांवर आधारित उद्योगांचे केंद्रीकरण.
  • कोकण व केरळच्या किनारी प्रदेशांत काथ्या, फळप्रक्रिया, मासेप्रक्रिया इत्यादी उदयोगांचे केंद्रीकरण.

(४) तेलशुद्धीकरण उद्योग :

  • कोयाली, दिग्बोई, नूनमती, बोंगाईगाव ही तेलशुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशांत.
  • मथुरा आणि बरौनी ही तेलशुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात व तेल उत्पादन क्षेत्रांपासून दूर.

(५) सिमेंट उद्योग :

  • सिमेंटसाठी आवश्यक असलेला कच्चा माल उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी सिमेंट उद्योगाचा विकास.

(६) मीठ उदयोग :

  • गुजरात, राजस्थान व तमिळनाडू या राज्यांत मीठ उदयोगाचा विकास.

(७) इतर उद्योग :

  • यंत्रनिर्मिती, विद्युतनिर्मिती, वाहननिर्मिती, खतनिर्मिती, ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती इत्यादी अनेक इतर उद्योगांचे देशाच्या विविध भागांत वितरण. या उद्योगांचे प्रामुख्याने देशातील मोठ्या शहरांमध्ये केंद्रीकरण.

भारत व ब्राझील यांच्यातील आंतरराष्ट्रीय व्यापार :

ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय व्यापार :

  • ब्राझीलमधून प्रामुख्याने लोहखनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादींची निर्यात केली जाते.
  • ब्राझील यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादींची आयात करतो.
  • जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.
  • ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा २५% आहे.

भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार

  • भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडे, कातडी वस्तू, लोहखनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो;
  • भारत खनिज तेल (पेट्रोलियम), यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे इत्यादी आयात करतो.
  • युनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.
  • भारताची स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा सुमारे ४० टक्के आहे.

परस्पर गुंतवणूक :

  • भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारली आहेत.
  • भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.
  • भारतीयांना ब्राझीलमध्ये उपहारगृहे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैवइंधन इत्यादी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर उद्योगांच्या संधी उपलब्ध आहेत.
  • ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अल्प प्रमाणात आहे.
  • ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैवइंधन इत्यादी क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे.
  • भारतामध्ये ब्राझीलच्या मार्को पोलो (वाहन उद्योग), व्हेल (खाण उदयोग), स्टेफनीनी (माहिती उद्योग) यांसारख्या मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत.
PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below links to get PDF from store

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-८-अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - नोट्स

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-८-अर्थव्यवस्था आणि व्यवसाय  - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *