Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-७-मानवी वस्ती-Maharashtra Board

मानवी वस्ती

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-७-महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . अचूक पर्यायांसमोरील चौकटीतअशी खूण करा.

() वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते.

(i) समुद्रसान्निध्य

(ii) मैदानी प्रदेश

(iii) पाण्याची उपलब्धता

(iv) हवामान

उत्तर :

(iii) पाण्याची उपलब्धता √

() ब्राझीलच्या अग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते?

(i) केंद्रित

(ii) रेषाकृती

(iii) विखुरलेली

(iv) ताराकृती

उत्तर :

(ii) रेषाकृती √

() भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो?

(i) नदीकाठी

(ii) वाहतूक मार्गांच्या लगत

(iii) डोंगराळ प्रदेशात

(iv) औद्योगिक क्षेत्रात

उत्तर :

(iii) डोंगराळ प्रदेशात √

() नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते.

(i) वनाच्छादन

(ii) शेतीयोग्य जमीन

(iii) उंचसखल जमीन

(iv) उद्योगधंदे

उत्तर :

(ii) शेतीयोग्य जमीन √

() ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते?

(i) पारा

(ii) आमापा

(iii) एस्पिरितो सान्तो

(iv) पॅराना

उत्तर :

(i) पारा √

प्रश्न . भौगोलिक कारणे लिहा.

() पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

उत्तर :

  • मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.
  • पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.
  • नद्या व जलमार्ग हे पारंपरिक वाहतुकीचे मार्ग आहेत. हे मार्ग व्यापार व संपर्क सुलभ करतात, त्यामुळे लोकवस्ती आकर्षित होते.
  • पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो.
  • अनेक प्राचीन सभ्यता (उदा. सिंधू, नाईल, गंगा) जलस्रोतांच्या काठीच विकसित झाल्या. या भागांतील पाण्याच्या उपलब्धतेमुळे लोकांनी तेथे वस्ती केली.
  • अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

() ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

उत्तर :

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचा घनता संपूर्ण देशभर समान नाही. बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात केंद्रित आहे. यामागील कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

(i) वसाहतवादाचा प्रभाव : प्रारंभीच्या काळात युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी पूर्व किनारपट्टीच्या भागातच वस्त्या व बंदरे उभारली. त्यामुळे सुरुवातीपासूनच या भागात नागरीकरण सुरू झाले.

(ii) नैसर्गिक सुविधा : पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात पुढील नैसर्गिक सुविधा आढळतात:

  • सम व दमट हवामान
  • सुपीक जमीन
  • मुबलक पाणीपुरवठा
  • खनिज व इतर साधनसंपत्तीचा साठा

या नैसर्गिक घटकांमुळे शेती, उद्योगधंदे व व्यापार यांचा विकास झाला. परिणामी, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, आणि लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले.

(iii) वाहतूक व्यवस्था : पूर्व किनारपट्टीवर उत्तम वाहतूक व्यवस्था, बंदरे, शहरांचा विकास यामुळे लोकवस्ती वाढीस लागली. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीही हा भाग उपयुक्त ठरतो.

ब्राझीलमध्ये लोकवस्ती प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या भागातच केंद्रित आहे. यामागे इतिहास, नैसर्गिक संसाधने, शेती-उद्योगांचा विकास व नागरी सुविधा ही प्रमुख कारणे आहेत.

() भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.

उत्तर :

भारतातील नागरी लोकसंख्येत सतत वाढ होत आहे. या वाढीमागील कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • शेतीत यांत्रिकीकरण, सिंचन व्यवस्था, सुधारित बियाणे यामुळे शेतीत प्रगती झाली. उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळे शहरांमध्ये रोजगाराच्या संधी वाढल्या.
  • शिक्षणाच्या संधी व दर्जेदार शैक्षणिक संस्था शहरांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक शिक्षणासाठी शहरांकडे वळतात.
  • रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक यामुळे शहरांमध्ये प्रवेश सोपा झाला आहे. त्यामुळे लोकांचे स्थलांतर अधिक सोयीचे बनले आहे.
  • शहरांमध्ये विविध क्षेत्रांतील रोजगार उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर करतात.
  • शिक्षण, रोजगार, व्यवसाय, आरोग्य सुविधा इत्यादी कारणांमुळे भारताच्या विविध भागांतील लोक शहरांमध्ये स्थायिक होत आहेत.

भारतामध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. यामागे शेती व उद्योगातील प्रगती, शिक्षण व रोजगाराच्या संधी, वाहतुकीच्या सुविधा ही प्रमुख कारणे आहेत.

() ईशान्य ब्राझीलमध्ये स्त्या विरळ आहेत.

उत्तर :

  • ईशान्य ब्राझील हा पर्जन्यछायेचा भाग आहे. म्हणजेच, या भागात पावसाचे प्रमाण फारच कमी असते.
  • या भागात फक्त सुमारे 600 मिमी पाऊस पडतो. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त (पाऊस कमी होणारा) मानला जातो.
  • पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेती योग्य प्रकारे करता येत नाही.
  • यामुळे या भागात रोजगाराच्या संधी कमी आहेत आणि लोकसंख्याही कमी आहे.
  • त्यामुळे, ईशान्य ब्राझीलमध्ये गाव व वस्त्या एकमेकांपासून दूर म्हणजेच विखुरलेल्या स्वरूपात आढळतात.

() उत्तर भारतात अन्य राज्यां पेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.

उत्तर :

  • उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिमालय पर्वतरांगांमुळे तेथे शेती आणि उद्योगधंद्यांचा विकास कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे, अशा राज्यांमध्ये नागरीकरणाचा वेग कमी आहे.
  • परंतु, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी प्रदेशात असल्यामुळे तेथे विकासाची संधी अधिक आहे.
  • दिल्ली ही भारताची राजधानी, तर चंदीगढ ही पंजाब व हरियाणाची संयुक्त राजधानी आहे.
  • या दोन्ही शहरांत प्रशासकीय कार्यालये, बँका, उद्योग, शिक्षण संस्था यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

त्यामुळे उत्तर भारतातील इतर भागांच्या तुलनेत, दिल्ली आणि चंदीगढ येथे नागरीकरणाचे प्रमाण जास्त आहे.

प्रश्न . थोडक्यात उत्तरे लिहा.

() भारत आणि ब्राझील या देशांचा नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.

उत्तर :

  • ब्राझीलमध्ये भारताच्या तुलनेत नागरीकरणाचे प्रमाण अधिक आहे.
  • २०११ साली भारताचे नागरीकरणाचे प्रमाण ३१.२% होते, तर २०१० साली ब्राझीलचे प्रमाण ८४.६% होते.
  • भारतामध्ये १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात नागरी लोकसंख्येत १८% वरून ३१.२% पर्यंत वाढ झाली.
  • ब्राझीलमध्ये १९६० ते २०१० या कालखंडात नागरी लोकसंख्या ४७.१% वरून ८४.६% पर्यंत वाढली.
  • भारतात या काळात प्रत्येक दशकात नागरीकरण वाढले असले, तरी वाढीचा दर प्रत्येक वेळी सारखा राहिला नाही.
  • ब्राझीलमध्येही प्रत्येक दशकात नागरीकरण वाढत गेले, पण वाढीचा दर कमी कमी होत गेला.
  • एकंदरीत, भारत व ब्राझील या दोन्ही देशांत नागरीकरणात सातत्याने वाढ झाली आहे, पण ब्राझील हे भारताच्या तुलनेत अधिक नागरीकरण झालेला देश आहे.

() गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांतील मानवी वस्त्यां बाबत फरक स्पष्ट करा.

उत्तर :

गंगा नदीचे खोरे (भारत) :

  • या भागात सौम्य हवामान आढळते, जे मानवी वस्तीला पोषक आहे.
  • गंगा आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ सुपीक मृदा तयार करतो.
  • सुपीक जमिनीमुळे शेतीचा भरभराटीने विकास झाला आहे.
  • शेतीबरोबरच इतर उद्योगांचाही विकास या भागात झालेला आहे.
  • वाहतुकीच्या चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे व्यापार व प्रवास सुलभ झाला आहे.
  • त्यामुळे गंगा खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळते.

अॅमेझॉन नदीचे खोरे (ब्राझील)

  • या भागात रोगट आणि दमट हवामान आढळते, जे वस्तीला अडथळा ठरते.
  • घनदाट वर्षावनांमुळे प्रदेश दुर्गम झाला आहे.
  • यामुळे साधनसंपत्तीचा शोध व वापर मर्यादित राहतो.
  • वाहतुकीच्या सुविधा कमी आहेत; बहुतांश वाहतूक जलमार्गांवर अवलंबून आहे.
  • परिणामी अॅमेझॉन खोऱ्यात विखुरलेली व विरळ मानवी वस्ती आढळते.

() मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते?

उत्तर :

मानवी वस्तीस परिणाम करणारे घटक :

 मानवी वस्तीस प्रतिकूल घटक

  • अवर्षणग्रस्त प्रदेश, वाळवंटी भाग, नापीक जमीन, अपुरा सूर्यप्रकाश, व रोगट हवामान हे घटक मानवी वस्तीस प्रतिकूल ठरतात.
  • अशा ठिकाणी शेती व उद्योगांचा विकास होत नाही, त्यामुळे लोक त्या भागात राहत नाहीत.
  • परिणामी, मानवी वस्ती विरळ आणि मर्यादित स्वरूपाची असते.

मानवी वस्तीस अनुकूल घटक :

  • स्वच्छ हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन व पर्याप्त पर्जन्य हे घटक मानवी वस्तीस अनुकूल ठरतात.
  • या घटकांमुळे शेती व उद्योगांचा विकास होतो.
  • परिणामी, त्या भागात लोकसंख्येची वाढ व दाट मानवी वस्ती आढळते.

मानवी वस्त्यांचे वितरण नैसर्गिक व भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. जिथे जगण्यास पोषक अटी असतात, तिथेच मानवी वस्त्यांची वाढ अधिक प्रमाणात होते. अशा प्रकारे, मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली आढळते.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below links to get PDF from store

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-७-मानवी वस्ती - नोट्स

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-७-मानवी वस्ती  - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Useful Links

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *