Notes-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-७-मानवी वस्ती-Maharashtra Board

मानवी वस्ती

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-७-महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :

  • भारत देशांतील वस्त्यांचा विकास व नागरीकरण
  • ब्राझील देशांतील वस्त्यांचा विकास व नागरीकरण

वस्त्यांचा विकास :

भारतातील वस्त्यांचे वितरण :

वेशिष्ट्ये : हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता या घटकांमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधांत विविधता आढळते.

दाट लोकवस्त्या :

  • उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार व शेतीखाली असणारे इतर भाग.
  • गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्या दाट व केंद्रित स्वरूपाच्या आहेत.
  • सौम्य हवामान, सुपीक मृदा, वाहतुकीच्या सुविधांची उपलब्धता इत्यादी घटक गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्त्यांच्या वितरणावर अनुकूल परिणाम करतात.

विरळ लोकवस्त्या :

  • मध्य भारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंचसखल प्रदेश.

ब्राझीलमधील वस्त्यांचे वितरण :

सुरुवातीच्या वस्त्या : युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांकडून ब्राझीलच्या किनारी प्रदेशात सुरुवातीच्या काळात वस्त्यांची निर्मिती.

दाट लोकवस्त्या :

  • सम व दमट हवामान, मुबलक पाणी पुरवठा, साधनसंपत्तीची विपुलता, शेतीसाठी सुपीक मृदा इत्यादी घटकांमुळे सुरुवातीच्या काळापासून किनारपट्टीच्या भागात दाट घनतेच्या वस्त्या.
  • कॉफीच्या उत्पादनासाठी सुयोग्य जमीन, खनिज संपत्तीचा साठा, ऊर्जेचा अखंडित पुरवठा व वाहतुकीच्या सोईसुविधांचा विकास यांमुळे सावो पावलो येथे दाट घनतेच्या वस्त्या.

विरळ लोकवस्त्या :

  • ब्राझीलच्या उच्चभूमीच्या ईशान्य भागातील अवर्षणग्रस्त प्रदेशात पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात.
  • विषुववृत्तीय वर्षावने, रोगट हवामान, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोधावर व वापरावर पडणाऱ्या मर्यादा, वाहतुकीच्या मर्यादित सुविधा यांमुळे अॅमेझॉन नदीखोऱ्यातील प्रदेशात विरळ व विखुरलेल्या लोकवस्त्या आहेत.

नागरीकरण :

भारतातील नागरीकरण :

एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरांत राहतात, त्या आधारे नागरीकरणाचे प्रमाण ठरवता येते.

भारतातील नागरीकरणाची माहिती :

वैशिष्ट्ये :

  • विकसित देशांच्या तुलनेत भारतातील नागरीकरणाचा वेग कमी.
  • २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ ३१.२ टक्के होते..
  • १९६१ ते २०११ या पन्नास वर्षांच्या कालखंडात भारतातील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत १८ टक्क्यांपासून ३१.२ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.
  • या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी-अधिक असल्याचे आढळून येते.
  • उत्तर भागाच्या तुलनेत दक्षिण भागात नागरीकरणाचे प्रमाण जास्त.

विविध राज्यांतील व केंद्रशासित प्रदेशातील नागरीकरणाचे प्रमाण :

  • उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तरांचल, बिहार आणि राजस्थान या राज्यांत नागरीकरण कमी.
  • गोवा, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांत नागरीकरण अधिक.
  • गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य. (सुमारे ६२ टक्के लोकसंख्येचे
  • शहरी भागांत वास्तव्य.)
  • दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या नागरीकरणाचा दर ८० टक्क्यांपेक्षा अधिक.

भारताच्या शहरी लोकसंख्येची वैशिष्ट्ये : भारताच्या नागरी लोकसंख्येचे वितरण राज्यनिहाय भिन्न आहे. काही राज्यांमध्ये शहरीकरणाचे प्रमाण अधिक असून काही ठिकाणी हे प्रमाण तुलनेने कमी आहे.

भौगोलिक वितरणानुसार फरक :

  • उत्तरेकडील व ईशान्येकडील राज्यांत शहरी लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
  • मध्य व दक्षिण भारतात शहरी लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने अधिक आहे.

० ते ४०% शहरी लोकसंख्या असलेले राज्ये :

  • उत्तरेकडील राज्ये – उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा
    ईशान्येकडील राज्ये – मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर
    केंद्रशासित प्रदेश – अंदमान व निकोबार बेटे

४१ ते ८०% शहरी लोकसंख्या असलेले राज्ये/प्रदेश :

  • मध्य भारत – गुजरात
  • केंद्रशासित प्रदेश – दमण व दीव, दादरा व नगर हवेली
  • दक्षिण भारत – महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू
  • केंद्रशासित प्रदेश – पुदुच्चेरी, लक्षद्वीप (६१%–८०%)

८१ ते १००% शहरी लोकसंख्या असलेले प्रदेश :

  • चंदीगढ व दिल्ली (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र – NCT)

भारतात शहरीकरणाचा वेग सतत वाढत आहे. • औद्योगीकरण, नागरी सुविधा व रोजगाराच्या संधी यामुळे ग्रामीण भागातील लोक शहरांकडे स्थलांतर करत आहेत.

भारताचा शहरी लोकसंख्या वितरणाचा नमुना असमतोल असून, काही भाग अत्यंत शहरी आहेत तर काही ठिकाणी शहरीकरण फारच कमी आहे. या असमतोलाचे कारणे भूगोल, विकासाचे स्वरूप व औद्योगिक संधींशी संबंधित आहेत.

ब्राझीलमधील नागरीकरण :

जगातील इतर विकसनशील देशांच्या तुलनेत ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला विकसनशील देश आहे.

(१) वैशिष्ट्ये :

  • सुमारे ८६ टक्के लोकसंख्येचे शहरी भागांत वास्तव्य.
  • २०१० च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे ८४.६ टक्के होते.
  • १९६० ते २०१० या पन्नास वर्षांच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत ४७.१ टक्क्यांपासून ८४.६ टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढ झाली आहे.
  • या पन्नास वर्षांच्या कालखंडात प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो.
  • १९६० ते २००० या चार दशकांत नागरीकरणाचा वेग जास्त होता; परंतु त्या नंतर मात्र ब्राझीलमधील नागरीकरणाचा वेग मंदावला आहे.

(२) विविध भागांतील नागरीकरणाचे प्रमाण :

  • उच्चभूमी प्रदेश व अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात नागरीकरणाचे प्रमाण कमी. या भागातील मॅनॉस या निग्रो आणि अॅमेझॉन नद्यांच्या संगमावरील बंदराच्या ठिकाणी नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने अधिक.
  • दक्षिण व आग्नेय भागांत नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने अधिक.
  • अंतर्गत भागांच्या तुलनेत किनारी भागांत नागरीकरणाचे प्रमाण अधिक.
  • उत्तरेकडील राज्यांपेक्षा सावो पावलो, गोइआस, रिओ दी जनेरिओ या राज्यांत नागरी लोकसंख्या जास्त.
  • 'सावो पावलो' या नव्याने विकसित झालेल्या महानगरात आणि इतर औद्योगिक प्रदेशांत नागरीकरणाची वाढ सर्वाधिक.

ब्राझीलमधील विविध भागांतील लोक रिओ दी जनेरिओ या शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. वाढत्या शहरीकरणामुळे ब्राझीलमधील शहरांत दारिद्रय, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, आर्थिक विषमता, झोपड-पट्ट्यांची वाढ, वांढती रोगराई इत्यादी समस्या वाढत आहेत.

ब्राझीलमधील नागरीकरणावर परिणाम करणारे घटक :

  • पूर्व व वायव्य किनारपट्टीच्या प्रदेशात सम व दमट हवामान, मुबलक पाणीपुरवठा, शेतीपूरक सुपीक जमीन.
  • सावो पावलो येथील खनिजांचा मुबलक साठा व वाहतुकीच्या सोईसुविधा, ऊर्जेचा अखंडित पुरवठा इत्यादी.

'पश्चिमेकडे चला' धोरण :

  • देशातील विशिष्ट भागांत होणारी लोकसंख्येची वाढ व मानवी वस्त्यांचे होणारे केंद्रीकरण टाळण्यासाठी ब्राझील सरकारद्वारे 'पश्चिमेकडे चला' या धोरणाला प्रोत्साहन.
  • या धोरणामुळे लोकसंख्येच्या विकेंद्रीकरणास चालना.
PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below links to get PDF from store

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-७-मानवी वस्ती - नोट्स

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-७-मानवी वस्ती  - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *