Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-५-नैसर्गिक वनस्पती व प्राणी-Maharashtra Board

नैसर्गिक वनस्पती व प्राणी

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-५-महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . पाठात दिलेली माहिती, आकृत्या नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा.

अ.क्र. वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश ब्राझीलमधील प्रदेश
उष्ण कटिबंधीय वने १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष    
२. निम वाळवंटी काटेरी वने १.

२.

   
३. 'सॅव्हाना' १. तुरळक झुडपांसारखी झाडे / तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत    
४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती    
५. गवताळ प्रदेश १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश    
उत्तर :

अ.क्र. वनांचा प्रकार गुणधर्म भारतातील प्रदेश ब्राझीलमधील प्रदेश
उष्ण कटिबंधीय वने १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष अंदमान आणि निकोबार बेटेपश्चिम घाट, आसाम इत्यादी. गियाना उच्चभूमी व अॅमेझॉन नदीचे खोरे.
२. निम वाळवंटी काटेरी वने  (१) वनस्पतींची पाने आकाराने लहान.

(२) कमी उंचीच्या वनस्पती.

गुजरात, राजस्थान. ब्राझीलमधील ईशान्य भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश शुष्क (अवर्षण चतुष्कोन).
३. 'सॅव्हाना' १. तुरळक झुडपांसारखी झाडे / तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत राजस्थानमधील वाळवंटी प्रदेश. ब्राझीलची उच्चभूमी.
४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य  प्रदेश इत्यादी. पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोन्यांचा प्रदेश.
५. गवताळ प्रदेश १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (तराई प्रदेश). ब्राझीलचा अतिदक्षिणेकडील प्रदेश.

प्रश्न . वेगळा घटक ओळखा.

() ब्राझीलमधील वनप्रकार-

(i) काटेरी झुडपी वने             (ii) सदाहरित वने

(iii) हिमालयीन वने              (iv) पानझडी वने

उत्तर :

(iii) हिमालयीन वने

() भारताच्या संदर्भात-

(i) खारफुटीची वने                (ii) भूमध्य सागरी वने

(iii) काटेरी झुडपी वने           (iv) विषुववृत्तीय वने

उत्तर :

(iv) विषुववृत्तीय वने

() ब्राझीलमधील वन्य प्राणी-

(i) अॅनाकोंडा              (ii) तामरिन

(iii) मकाऊ                 (iv) सिंह

उत्तर :

(iv) सिंह

() भारतीय वनस्पती-

(i) देवदार                   (ii) अंजन

(iii) ऑर्किड                (iv) वड

उत्तर :

(iii) ऑर्किड

प्रश्न . जोड्या जुळवा.

() सदाहरित वने

() पानझडी वने

() समुद्रकाठची वने

() हिमालयीन वने

() काटेरी झुडपी वने 

(i) सुंद्री

(ii) पाईन

(iii) पाऊ ब्रासील

(iv) खेजडी

(v) साग

(vi) आमर

(vii) साल

उत्तर :

(१) सदाहरित वने - पाऊ ब्रासील

(२) पानझडी वने - साग

(३) समुद्राकाठची वने - सुंद्री

(४) हिमालयीन वने - पाईन

(५) काटेरी व झुडपी वने - खेजडी.

प्रश्न . थोडक्यात उत्तरे द्या .

() ब्राझील भारतातील नैसर्गिक वनप्रकारातील फरक सांगा.

उत्तर :

ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक  :

ब्राझील भारत
ब्राझील देशाच्या विषुववृत्ताजवळील उत्तर भागात वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट व सदाहरित वर्षावने आढळतात. भारताचे स्थान विषुववृत्तापासून लांब आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये आढळणारी वर्षावने भारतात आढळत नाहीत.
भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगांत अतिउंच प्रदेशांत हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशांत पाईन, देवदार, फर, स्प्रूस अशा सूचिपर्णी वृक्षांची वने व. पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत. त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत.

() ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणीजीवन नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.

उत्तर :

अन्नसाखळीतील निसर्गसंबंध: वनस्पती हे तृणभक्षक प्राणी व पक्ष्यांचे मुख्य अन्न आहे. तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असतात. त्यामुळे वनस्पतींची विविधता जितकी जास्त, तितकी अन्नसाखळी समृद्ध.

नैसर्गिक अन्नाचा परिणाम: ज्या भागात विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आढळतात, त्या भागात त्या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी, ते मांसभक्षक प्राण्यांनाही पोषण देतात.

  • उदाहरणे (ब्राझील): ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी हरणांची विविध जाती आढळतात. त्यामुळे या भागात बिबट्यांसारखे शिकारी प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.
  • उदाहरणे (भारत): भारताच्या गवताळ प्रदेशात विविध कीटकांचे अस्तित्व आहे. या कीटकांवर उपजीविका करणारा माळढोक सारखा पक्षी येथे आढळतो.

वनस्पतींचे प्रमाण आणि जैवविविधता: ज्या भागात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त, तेथे प्राणी व पक्ष्यांची संख्या व विविधता जास्त असते.

  • उदा. ब्राझीलमधील विषुववृत्तीय भाग – दाट वने, विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी.

मर्यादित वनस्पती = मर्यादित प्राणीजीवन: ज्या भागात वनस्पतींचे प्रमाण कमी, तेथे प्राणी व पक्षीही मर्यादित प्रमाणात आढळतात.

  • उदा. भारताचे थर वाळवंट – कमी वनस्पती, म्हणूनच मर्यादित प्रजातींचे प्राणी.

भारत आणि ब्राझीलमध्ये नैसर्गिक वनस्पती व प्राणीजीवन यामध्ये घनिष्ठ सहसंबंध आहे.
वनस्पतींची समृद्धता = जैवविविधतेचा विस्तार, हे सूत्र या दोन्ही देशांमध्ये लागू होते.

() ब्राझील भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते?

उत्तर :

ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे :

  • वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
  • दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
  • वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
  • पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

() ब्राझील भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?

उत्तर :

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

  • वाढती लोकसंख्या आणि निवासाची गरज: भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत असल्याने वनतोड करून जमिनीचा वापर केला जातो.
  • शहरीकरण आणि झाडांची तोड: शहरे, रस्ते, औद्योगिक प्रकल्प, गावे विस्तारण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. परिणामी, वनक्षेत्र कमी होते.
  • स्थलांतरित शेती: ब्राझीलमध्ये याला "रोका" आणि भारतात "झूम" म्हणतात. या पद्धतीमध्ये वन जाळून किंवा तोडून शेतीसाठी जमीन तयार केली जाते. या शेतीमुळे वनांचे क्षेत्र सतत कमी होत जाते.
  • इंधन व लाकडाची मागणी: ग्रामीण व गरीब भागांमध्ये इंधनासाठी सरपण लाकूड वापरण्याची प्रथा आहे. त्यामुळे वनातील झाडांची कत्तल केली जाते. यामुळे जैवविविधतेवरही प्रतिकूल परिणाम होतो.

वनांचा ऱ्हास हा पर्यावरणीय संतुलन बिघडवणारा गंभीर प्रश्न आहे. भारत व ब्राझीलसारख्या जैवविविधतेने समृद्ध देशांमध्ये या समस्येचे जागरूकतेने आणि शाश्वत उपायांनी निवारण करणे आवश्यक आहे.

() भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?

उत्तर :

  • स्थान व पर्जन्य: ही वने १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात आढळतात. भारताच्या बहुतांश भागात या प्रमाणात पर्जन्य होत असल्यामुळे पानझडी वने प्रचंड प्रमाणात आढळतात. उदा. मध्य भारत, पूर्व महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पूर्व मध्यप्रदेश इत्यादी भागांत ही वने आहेत.
  • ऋतुमानाशी सुसंगत वैशिष्ट्ये: उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून वनस्पतींची पाने गळून पडतात. यामुळे वनस्पती पाण्याची बचत करतात व त्यांचा जीवनकाळ वाढतो. परिणामी भारतात पानझडी वने आढळतात.

प्रश्न . भौगोलिक कारणे लिहा.

() ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.

उत्तर :

  • ब्राझील देशाच्या उत्तर भागात अॅमेझॉन नदीच्या खो-यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८० से असते.
  • अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो.
  • या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे.

() हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.

उत्तर :

  • हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान ०° सेपेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात.
  • अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही.
  • उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते.

() ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे.

उत्तर :

  • कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनांत, गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.
  • झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खाद्य असते.
  • ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पँटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे.

() भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

उत्तर :

  • निर्वनीकरण (वनतोड): वाढती लोकसंख्या, घरबांधणी आणि इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. यामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होतो. जंगल नष्ट झाल्यामुळे अनेक प्रजाती स्थलांतरित होतात किंवा नष्ट होतात.
  • झपाट्याने वाढणारे नागरीकरण व प्रदूषण: शहरे वाढत असून, त्यातून हवा, पाणी व ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. हे प्रदूषण प्राण्यांच्या आरोग्यावर व प्रजोत्पादन क्षमतेवर परिणाम करते. अनेक प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर फेकले जातात.
  • शिकार व बेकायदेशीर तस्करी: वाघ, हत्ती, गेंड्यासारख्या प्राण्यांची शिकार त्यांच्या अंगप्रत्यंगांसाठी केली जाते. बेकायदेशीर व्यापारामुळे अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
  • स्थलांतरित शेती (झूम शेती): विशेषतः ईशान्य भारतात "झूम" पद्धतीची शेती केली जाते. यामध्ये वनसंपदा जाळून किंवा तोडून शेतजमीन तयार केली जाते. यामुळे प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात येते.

वन्य प्राणी आणि पर्यावरण यांचे नाते परस्परसंबंधित आहे. प्राणीसंख्या घटल्यास जैवविविधतेचे संतुलन बिघडते. त्यामुळे संरक्षण, जनजागृती आणि कायद्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे.

() भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी वनसंवर्धनाची गरज आहे.

उत्तर :

  • भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
  • भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या 'झूम 'सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये 'रोका' या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
  • या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन्ही देशांत प्राण्यांच्या काही जाती दुर्मीळ होत आहेत. काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below links to get PDF from store

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-५-नैसर्गिक वनस्पती व प्राणी - नोट्स

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-५-नैसर्गिक वनस्पती व प्राणी  - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Useful Links

Main Page : – महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल–  – All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : प्रकरण-४ : हवामान Online Solutions

Next Chapter : प्रकरण- ६ : लोकसंख्याOnline Notes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *