लोकसंख्या
इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-६-महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
लोकसंख्या संसाधन :
नैसर्गिक संसाधनांप्रमाणेच, लोकसंख्याही कोणत्याही देशासाठी एक महत्त्वाचे संसाधन मानली जाते.
- विकासावर प्रभाव : देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा एकूण लोकसंख्या व तिच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.
- अधिक लोकसंख्या आणि निम्न गुणवत्ता : जर लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल आणि तिची गुणवत्ता कमी असेल, तर देशाचा विकास संथ होतो.
- पुरेशी लोकसंख्या आणि उच्च गुणवत्ता : जर लोकसंख्या संतुलित असेल व गुणवत्तापूर्ण असेल (उच्च शिक्षण, कुशलता, आरोग्य), तर विकास झपाट्याने होतो.
योग्य प्रमाणात व गुणवत्तेची लोकसंख्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लोकसंख्येला एक महत्त्वाचे मानवी संसाधन समजले जाते.
भारताची लोकसंख्या व वितरण :
भारताची लोकसंख्या : (२०११ च्या जनगणनेनुसार)
- एकूण लोकसंख्या : १२१ कोटी
- जगातील क्रम : लोकसंख्येनुसार भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश
- जागतिक भूभागात वाटा : फक्त २.४१%
- जागतिक लोकसंख्येत वाटा : १७.५%
- सरासरी लोकसंख्या घनता : ३८२ व्यक्ती प्रति चौ.कि.मी.
भारतातील लोकसंख्येचे वितरण :
भारतात लोकसंख्येचे असमान वितरण आढळते. भारतातील लोकसंख्येच्या वितरणाची माहिती पुढीलप्रमाणे आहे :
लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :
- प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता यांचा लोकसंख्या वितरणावर मोठा प्रभाव पडतो.
- उदा., सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित विकसित झालेली आढळते.

लोकसंख्येचे दाट वितरण :
- शेती व उद्योगधंदे यांमुळे काही भागांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण व लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. उदा., उत्तरेकडील मैदानी प्रदेश, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बेंगळुरू इत्यादी.
- भारतातील मध्यम पावसाच्या प्रदेशात, मैदानी प्रदेशात व तुलनेने सौम्य हवामान असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण (जास्त घनता) आढळते.
- भारतातील अधिक पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम व पूर्व किनारी प्रदेशाजवळील केरळ व तमिळनाडू राज्यांत, सुपीक मैदानी प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण (जास्त घनता) आढळते.
- बिहार व पश्चिम बंगाल राज्यांतील गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान, सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, सौम्य हवामान इत्यादी अनुकूल घटक आढळतात.
- गंगा खोऱ्याचा प्रदेश शेती व विविध उद्योगांच्या विकासासाठी अनुकूल आहे. या प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे.
लोकसंख्येचे विरळ वितरण :
- भारतातील अतिउंच पर्वतीय प्रदेशात, पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असणाऱ्या वाळवंटी प्रदेशात व दुर्गम भागात लोकसंख्येचे विरळ वितरण (कमी घनता) आढळते.
- उदा., भारतातील अतिउंचावरील हिमालयाच्या पर्वतरांगांमधील अतिथंड हवामानाच्या प्रदेशात, राजस्थानमधील थरच्या वाळवंटी प्रदेशात, मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यांतील कमी पावसाच्या प्रदेशात लोकसंख्येचे विरळ वितरण (कमी घनता) आढळते.
ब्राझीलची लोकसंख्या व वितरण :
ब्राझीलची लोकसंख्या : (२०१० च्या जनगणनेनुसार)
- एकूण लोकसंख्या : १९ कोटी
- जगातील क्रम : लोकसंख्येनुसार जगात पाचवा.
- जागतिक भूभागात वाटा : फक्त ५.६%
- जागतिक लोकसंख्येत वाटा : २.७८%
- सरासरी लोकसंख्या घनता : २३ व्यक्ती प्रति चौ.कि.मी.
ब्राझीलमधील लोकसंख्येचे वितरण :
लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा दक्षिण अमेरिका खंडात प्रथम क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे.
ब्राझीलमधील लोकसंख्येच्या वितरणाची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

लोकसंख्येचे दाट वितरण :
- औद्योगिकीकरण व अनुकूल हवामान यांमुळे ब्राझीलच्या पूर्व भागात आणि किनारपट्टीच्या भागात सुमारे ९० टक्के लोक राहतात.
- ब्राझीलमधील रिओ दी जनेरिओ आणि सावो पावलो या राज्यांत सुमारे ३०० किमी रुंदीच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असल्यामुळे येथे लोकसंख्या सर्वाधिक प्रमाणावर केंद्रित झालेली आढळते.
- ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान, पर्जन्याचे मध्यम प्रमाण, सुपीक जमीन व नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता इत्यादी अनुकूल घटकांमुळे या भागात शेती व इतर उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याचे आढळते.
लोकसंख्येची मध्यम स्वरूपाची घनता :
- ब्राझीलमधील उच्चभूमीच्या प्रदेशात मध्यम पर्जन्यमान व तुलनेने अनुकूल हवामान असल्यामुळे लोकसंख्येचे मध्यम स्वरूपात वितरण आढळते.
कमी लोकसंख्येचा प्रदेश :
- ब्राझीलचा मध्य व पश्चिमी भाग.
लोकसंख्येचे विरळ वितरण :
- ब्राझील देशातील उत्तरेकडील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान, पर्जन्याचे अधिक प्रमाण, घनदाट वर्षावने, दुर्गम प्रदेश इत्यादी घटकांमुळे लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
- ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात केवळ भटक्या जमातीचे लोक टोळ्या करून राहतात.
- ब्राझीलमधील बाहिया राज्यातील बहुतांश प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश असल्यामुळे या राज्यात लोकसंख्येचे विरळ वितरण आढळते.
लोकसंख्येची रचना :
भारताची लोकसंख्येची रचना :
| तौलनिक घटक | वैशिष्ट्ये |
| लिंग गुणोत्तर : | (१) लिंग गुणोत्तर १००० पेक्षा कमी.
(२) २०११ नुसार ९४७. (३) कित्येक दशकांत लिंग गुणोत्तरात चढउतार. (४) १९९१ नंतर भारतात लिंग गुणोत्तरात तुलनेने वाढ. |
| वय-लिंग मनोरा : | तरुण वयोगटातील लोकांचे लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने जास्त. |
| लोकसंख्यावाढीचा दर : | (१) २००१ ते २०११ च्या दशकात भारताच्या लोकसंख्येत १८.२ कोटींनी वाढ.
(२) वर्तमानकाळात लोकसंख्यावाढीचा दर तुलनेने कमी, परंतु एकूण लोकसंख्येत वाढ. |
| सरासरी आयुर्मान : | २०१६ नुसार ६८ वर्षे. |
| साक्षरता दर : | २०१६ नुसार ७२.२ टक्के. |
ब्राझीलची लोकसंख्येची रचना :
| तौलनिक घटक | वैशिष्ट्ये |
| लिंग गुणोत्तर : | (१) गेल्या अनेक दशकांत लिंग गुणोत्तर १००० पेक्षा जास्त.
(२) २०१० नुसार १०९०. (३) स्त्रियांच्या संख्येत २००१ पासून लक्षणीय वाढ. |
| वय-लिंग मनोरा : | वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या. |
| लोकसंख्यावाढीचा दर : | (१) लोकसंख्यावाढीचे प्रमाण अत्यंत कमी.
(२) पुढील दोन दशकांत लोकसंख्या वाढण्याची शक्यता अत्यंत कमी. |
| सरासरी आयुर्मान : | २०१६ नुसार ७५ वर्षे. |
| साक्षरता दर : | २०१६ नुसार ९२.६ टक्के. |
- लिंग गुणोत्तर : एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या, म्हणजे 'लिंग गुणोत्तर' होय.
- सरासरी आयुर्मान : एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते तो कालावधी, म्हणजे 'सरासरी आयुर्मान' होय.
भारत व ब्राझील : लोकसंख्येची तौलनिक रचना (लिंग-वय रचना) :
|
घटक / मुद्दा |
भारत | ब्राझील |
| लहान मुलांचे प्रमाण | जास्त | कमी |
| तरुण वयोगटातील लोकसंख्या | जास्त | तुलनेत कमी |
| कार्यशील (उत्पादक) गटाचे प्रमाण | अधिक (भारत 'तरुण देश') | तुलनेने कमी |
| वृद्ध लोकसंख्या | तुलनेत कमी | वृद्धत्वाकडे झुकणारी |
| स्त्री-पुरुष संख्येचे प्रमाण | ० ते ७५ वर्षे वयोगटात स्त्रियांची संख्या कमी | सर्व वयोगटांत स्त्रिया अधिक |
| लिंग गुणोत्तर | स्त्रियांकरता प्रतिकूल | स्त्रियांकरता अनुकूल |
| ७५ वर्षांवरील वयोगट | स्त्रिया अधिक | — |
- भारत – तरुण व कार्यक्षम लोकसंख्या असलेला देश, पण लिंग गुणोत्तरात असंतुलन आहे.
- ब्राझील – वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या, परंतु लिंग गुणोत्तर संतुलित व स्त्रियांसाठी अनुकूल.
Click on below links to get PDF from store
PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-६-लोकसंख्या - नोट्स
PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-६-लोकसंख्या - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71
Main Page : – महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल– – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : प्रकरण-५ : नैसर्गिक वनस्पती व प्राणी – Online Notes
Next Chapter : प्रकरण- ७ : मानवी वस्ती – Online Notes
