Notes-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-हवामान-Maharashtra Board

हवामान

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :

  • ब्राझीलचे हवामान
  • भारताचे हवामान

ब्राझीलचे हवामान :

ब्राझीलचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात येतो.

ब्राझीलच्या हवामानाची वैशिष्ट्ये :

(१) हवामानातील विविधता :

  • अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता.
  • विषुववृत्ताजवळ उष्ण हवामान.

विषुववृत्ताजवळील ब्राझीलच्या उत्तर किनारी भागात तुलनेने सम हवामान आढळते.

ब्राझीलमध्ये मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते.

(२) नैसर्गिक आपत्तींची शक्यता :

  • विषुववृत्ताजवळील प्रदेशात ऊर्ध्व दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे व आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्तांची शक्यता कमी.

ब्राझीलमधील तापमानाची वैशिष्ट्ये :

  • ब्राझीलचा उत्तर भाग : विषुववृत्ताजवळ तापमान अधिक व तापमानात वर्षभर समानता. उत्तरेकडील अॅमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी पमान सुमारे २५ से ते २८ से. आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
  • ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते.
  • ब्राझीलचा दक्षिण भाग : तापमान तुलनेने कमी.
  • उच्चभूमीचा भाग : हवामान थंड.
  • किनारपट्टीचा प्रदेश : हवामान सौम्य व आर्द्र.
  • अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस (अतिदक्षिण भागात म्हणजेच ब्राझीलमधील (ब्राझील उच्चभूमीच्या व अजस्र कड्याच्या दक्षिणेकडील प्रदेशात) समशीतोष्ण हवामान असते.

ब्राझीलमधील पर्जन्याची वैशिष्ट्ये :

आग्नेय तसेच ईशान्य दि शेकडून येणाऱ्या पूर्वीय (व्यापारी) वाऱ्यांपासून या देशात पाऊस पडतो.

ब्राझीलमधील विविध भागांत पर्जन्यऋतूचा कालावधी निरनिराळा आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते मे हा ब्राझीलमधील पर्जन्यऋतूचा कालावधी आहे.

ब्राझीलमधील पर्जन्य वितरणावर उच्चभूमीचा प्रभाव

  • वाऱ्यांचा अडथळा: दक्षिण महासागराकडून येणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या अजस्र कड्यांमुळे व उच्चभूमीमुळे अडवले जातात.
  • सांद्रीभवनामुळे पर्जन्य: हे वारे उंच भागावर गेल्यावर थंड हवामानामुळे त्यामध्ये सांद्रीभवन होते, त्यामुळे उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूस पावसाचे प्रमाण जास्त असते.
  • पर्जन्यछायेचा प्रदेश: विरुद्ध बाजूस वाऱ्यांमध्ये बाष्प कमी असल्यामुळे तिथे पर्जन्य होत नाही. त्यामुळे ईशान्य ब्राझीलमध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो आणि पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहते.

ब्राझीलमधील पर्जन्याचे प्रमाण :

  • अॅमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी २००० मिमी पाऊस.
  • ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीला पावसाळ्यात मोठा पूर येतो.
  • पुराचे प्रमाण विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात अधिक असते.
  • आग्नेय किनारपट्टीवर, पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमीपर्यंत पाऊस.
  • अजस्त्र कड्याजवळील किनारी भागांत प्रतिरोध प्रकारचा पाऊस.
  • उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते.
  • ब्राझीलच्या ईशान्य भागात उच्चभूमीच्या पलीकडे अत्यल्प पाऊस पडतो केवळ वार्षिक सरासरी ६०० मिमी पर्जन्य पडते. (पर्जन्यछायेचा प्रदेश) .
  • ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात.
माहीतीसाठी

  • ब्राझील हा उष्ण कटिबंधीय देश आहे. या भागात हिमवृष्टी होत नाही ; परंतु काही आकस्मिक परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वारे ब्राझीलच्या दक्षिण भागात पोहचतात. अशा वेळी या प्रदेशात हिमवृष्टी होते.

भारताचे हवामान :

भारताचा समावेश उष्णकटिबंधीय प्रदेशात होतो.

भारताच्या हवामानाची वैशिष्ट्ये :

प्रकार : भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते..

स्वरूप : हवामान वर्षभर सर्वसाधारणपणे उष्ण.

ऋतू : भारतीय हवामानशास्त्र विभागाने मानलेले भारतातील चार मुख्य ऋतू : उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा ऋतू, हिवाळा.

हवामानावर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे घटक : हिंदी महासागर, हिमालय पर्वत.

प्रादेशिक हवामानातील भिन्नतेची कारणे : अक्षवृत्तीय स्थानांतील फरक, समुद्रसपाटीपासूनच्या उंचीतील फरक.

हवामानातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती : अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर इत्यादी.

भारतातील तापमानाची वैशिष्ट्ये :

भारताचे तापमान विषम आहे. भारतातील काही भागांत थंडीत तापमान 0 से पेक्षाही कमी असते, तर काही भागात उन्हाळ्यात तापमान ५० सेपर्यंत पोहोचते. अशा प्रकारे, भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते.

भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जात असल्यामुळे भारताच्या उत्तर व दक्षिण भागांतील तापमानात पुढीलप्रमाणे भिन्नता आढळते :

  • भारताचा दक्षिण भाग : भारताच्या दक्षिण भागात (कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील भागात) सूर्यकिरणे तुलनेने लंबरूप पडत असल्यामुळे भारताच्या दक्षिण भागात तापमान तुलनेने अधिक.
  • भारताचा उत्तर भाग : भारताच्या उत्तर भागात (कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागात) सूर्यकिरणे तुलनेने तिरपी पडत असल्यामुळे भारताच्या उत्तर भागात तापमान तुलनेने कमी. (हिवाळ्यात उत्तर भागातील जम्मू-काश्मीर, हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान -४० से पेक्षाही कमी.)

भारतातील पर्जन्याची वैशिष्ट्ये :

  • मुख्य कारण – नैऋत्य मोसमी वारे: भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो.
  • हिंदी महासागर व हिमालयाचा प्रभाव: या दोन्ही घटकांचा भारतीय हवामान व पर्जन्यावर मोठा प्रभाव असतो.
  • उन्हाळ्यात कमी दाबाचा पट्टा: पंजाब व राजस्थानमधील उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाब तयार होतो.
  • वाऱ्यांची दिशा: हिंदी महासागरावर अधिक दाब असतो, त्यामुळे तेथून नैऋत्य दिशेने बाष्पयुक्त वारे भारतात येतात.
  • हिमालयाचे संरक्षण: हिमालय पर्वतरांगांमुळे उत्तर दिशेने येणारे अतिथंड वारे अडवले जातात.
  • प्रतिरोध पर्जन्य: नैऋत्य मोसमी वारे हिमालयातील शिवालिक व हिमाचल रांगांवर आदळून प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस घडवतात.
  • वाऱ्यांचा परतीचा प्रवास: हे वारे हिमालयावरून वळून पुन्हा ईशान्य दिशेने हिंदी महासागराकडे परत जातात – ईशान्य मोसमी वारे.
  • मान्सून परतीचा पाऊस: ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे भारताच्या द्वीपकल्पीय भागात (तामिळनाडू, आंध्रप्रदेश) परतीचा पाऊस पडतो.

भारतातील पर्जन्याचे प्रमाण :

  • पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यांमुळे किनारी भागात पर्जन्याचे प्रमाण अधिक आढळते.
  • घाटांच्या पलीकडील भागात (वातविन्मुख/पर्जन्यछायेच्या प्रदेशात) पावसाचे प्रमाण कमी आढळते.
  • नैऋत्य मोसमी वारे अरवली पर्वतरांगांना समांतर वाहत पुढे उत्तरेकडे जात असल्यामुळे गुजरात-राजस्थान या भागातही पर्जन्याचे प्रमाण कमी आढळते.
माहीतीसाठी :

  • पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२० मि मी पेक्षा कमी आहे.
  • मान्सूनच्या परतीच्या काळात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो

मेघालय पठारावरील पर्जन्य वितरण :

  • वाऱ्यांची दिशा: बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे मेघालय पठाराच्या दिशेने वाहतात.
  • वाऱ्याकडील बाजूस अधिक पाऊस: मेघालय पठाराच्या वाऱ्याकडील बाजूस असलेली चेरापुंजी व मौसिनराम ही ठिकाणे वाऱ्यांतील बाष्पामुळे विश्वातील सर्वाधिक पावसाचा अनुभव घेतात (११००० मिमीपेक्षा जास्त).
  • पर्जन्यछायेचा प्रभाव: पठाराच्या विरुद्ध बाजूस असलेल्या शिलाँग येथे वाऱ्यातील बाष्प कमी झाल्याने पर्जन्यछाया तयार होते आणि तेथे केवळ १००० मिमी पाऊस पडतो.
PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below links to get PDF from store

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-हवामान- नोट्स

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-हवामान  - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *