Solutions-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-९ : बदलते जीवन : भाग १-Maharashtra Board

बदलते जीवन : भाग १

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-९

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() डॉ.एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वा खाली भारतात ......... या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

() चेन्नई

() वेल्लूर

() हैदराबाद

() मुंबई

उत्तर :

डॉ.एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वा खाली भारतात वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया

() ‘जयपूर फूटचे जनक म्हणून ......... यांना ओळखले जाते.

() डॉ. एन.गोपीनाथ

() डॉ. प्रमोद सेठी

() डॉ. मोहन राव

() यांपैकी नाही

उत्तर :

‘जयपूर फूट’चे जनक म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांना ओळखले जाते.

प्रश्न . पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

() डॉ.एन.गोपीनाथ - ओपन हार्ट शस्त्रक्रिया

() रामचंद्र शर्मा - कुशल कारागीर

() डॉ. सुभाष मुखोपाध्याय - टेस्ट ट्यूब बेबी

() डॉ. मोहन राव - पोलिओ

उत्तर :

(४) डॉ. मोहन राव - पोलिओ

प्रश्न . टीपा लिहा

() कुटुंबसंस्था

उत्तर :

कुटुंबसंस्थेचे स्वरूप आणि महत्त्व: कुटुंब हा समूह जीवनातील एक मूलभूत घटक असून, प्रत्येक समाजातील एक मूलभूत समूह असतो. भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंबसंस्था महत्त्वाची होती.

एकत्र कुटुंबपद्धती: भारत हा प्रामुख्याने ‘एकत्र कुटुंब पद्तीचा देश’ म्हणून जगभर ओळखला जायचा. जागतिकीकरणपूर्व कालखंडातील ग्रामीण समुदायांमध्ये एकत्र कुटुंबपद्धतीला प्राधान्य होते. या पद्धतीमध्ये कुटुंबप्रमुख आणि कुटुंबातील सदस्यांना महत्त्व दिले जात असे.

विभक्त कुटुंबपद्धतीकडे संक्रमण: जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंबपद्धतीला चालना मिळाली आहे. औद्योगिकीकरण, जागतिकीकरण आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतर यामुळे एकत्र कुटुंबपद्धतीचे विघटन होऊ लागले.

टिकाऊ संस्था: कुटुंब एकत्र असो वा विभक्त, ही एक कायमस्वरूपी टिकाव ठेवणारी संस्था आहे.

() जयपूर फूट तंत्रज्ञान

उत्तर :

  • भारतातील अपंग व्यक्तींचे आयुष्य ‘जयपूर फूट’ च्या शोधाने बदलून गेले आहे.
  • १९६८ पूर्वी, जर एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात तिचा पाय जायबंदी झाला, तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागत असे.
  • या समस्येवर उपाय म्हणून, डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक आणि कान तयार केले.
  • जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे अपंग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे आणि पळणे शक्य झाले.
  • या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो.
  • पाय दुमडणे आणि मांडी घालणे हे या कृत्रिम पायांमुळे शक्य झाले आहे.
  • जयपूर फूट तंत्रज्ञानाने अपंग व्यक्तींना सन्मानाने काम करण्याची संधी दिली. या तंत्रज्ञानाने अपंगांचे जीवन सुसह्य केले.

() शहरीकरण

उत्तर :

शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण (किंवा नागरीकरण) असे म्हणतात.

 नागरीकरणाची कारणे: नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे. तसेच, हवा, पाणी आणि समूहजीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडवून आणतात.

स्वातंत्र्योत्तर काळातील वाढीची कारणे: स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे आहेत:

  • मृत्यू दरातील घट.
  • औद्योगिकीकरण.
  • ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता.
  • शहरातील रोजगार संधी व व्यापार.
  • स्थलांतर.
  • रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात शहरांकडे आकर्षित होतात

() बदलते आर्थिक जीवन

उत्तर :

पूर्वीचे स्वरूप:

  • मध्ययुगापूर्वीपर्यंत गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते.
  • गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत.
  • शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे

सध्याची परिस्थिती आणि बदल:

  • वस्तुविनिमय पद्धती जाऊन व्यवहार चलनात होऊ लागले.
  • शेतीशिवाय शेतीशी निगडित जोडधंदे सुरू झाले.
  • खेड्यांचे विद्युतीकरण झाले. सिंचनव्यवस्था व वाहतूक यात सुधारणा झाली.
  • नागरी समाज बिगरशेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडलेला आहे.
  • औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण आणि शहरी आर्थिक जीवन पूर्णतः बदलून गेले आहे.

प्रश्न . पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.

उत्तर :

पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यामागे खालील प्रमुख कारण होते:

  • १९७८ पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मल्यानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती.
  • या प्राणघातक संकटांमध्ये प्रामुख्याने पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, आणि डांग्या खोकला यांचा समावेश होता.
  • वरील रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
  • १९९५ मध्ये भारत सरकारने 'पल्स पोलिओ' लसीकरणाची मोहीम हाती घेतली.
  • या मोहिमेमुळे पोलिओ आटोक्यात आला.

() ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.

उत्तर :

  • भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांमध्ये ग्रामीण भागाच्या विकासाला महत्त्व दिले होते.
  • ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्याची खूपच वानवा होती. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असे.
  • महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्र सरकारने ग्रामीण पाणी पुरवठा व लोकांचे आरोग्य या प्रश्नांकडे लक्ष दिले.
  • ग्रामीण भागात विहिरी खणणे व नळांवाटे लोकांना पाणीपुरवठा करणे, या हेतूने शासनाकडून 'ग्रामीण पाणीपुरवठा योजना' सुरू करण्यात आली.

प्रश्न . पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

() संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे ?

उत्तर :

  • भारतीय संविधानानुसार कायद्यापुढे सर्व भारतीय समान आहेत आणि धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे.
  • या तरतुदींमुळे वंशपरंपरागत व्यवसायाची कल्पना मोडीत निघाली आणि जातीय व्यवस्थेच्या चौकटीला मोठा धक्का बसला.

() समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे?

उत्तर :

भारत सरकारने १४ जून १९६४ रोजी समाजकल्याण खाते स्थापन केले.

उद्दिष्ट्ये:

  • भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्यसुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे.
  • स्त्रिया, मुले, दिव्यांग, दुर्बळ घटक, अनुसूचित जाती व जमाती आणि अल्पसंख्याक यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहोचवणे.

() ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत?

उत्तर :

ग्रामीण विकासासंदर्भात खालील महत्त्वाची आव्हाने आहेत :

  • ग्रामीण भागातील आवश्यक व्यवसायांचा विकास करणे.
  • सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे .
  • सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे.

याव्यतिरिक्त, ग्रामीण विकासासाठी जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पास गती देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये आजही अनेक समस्या आहेत, ज्या विकासामधील आव्हाने दर्शवतात:

प्रश्न . सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या .

उत्तर :

भारतीय संविधानाने जनतेचे राहणीमान वाढवणे, पोषण सुधारणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य मानले आहे. या क्षेत्रात अॅलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देण्यात आली.

  • डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात पहिली यशस्वी 'ओपन हार्ट शस्त्रक्रिया' झाली.
  • अपघातात पाय गमावलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम पाय, हात, नाक व कान तयार केले. यामुळे दिव्यांग व्यक्तींना खडबडीत जमिनीवरून चालणे, सायकल चालवणे, शेतीची कामे करणे शक्य झाले.
  • डॉ. जॉनी व डॉ. मोहन राव यांनी जिवंत व्यक्तीने दान केलेल्या मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले.
  • डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली कृत्रिम गर्भधारण तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला. 'दुर्गा' या मुलीचा जन्म झाला.
  • पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी लसीकरण कार्यक्रम सुरू झाला.
  • 'पल्स पोलिओ' लसीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली, ज्यामुळे पोलिओ नियंत्रणात आला.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- इतिहास पाठ-९ : बदलते जीवन : भाग १- नोट्स

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-९ : बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Useful Links

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *