Solutions-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-६ : महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण-Maharashtra Board

महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-६

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() ..१९९२ मध्ये ....... या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.

() महाराष्ट्र

() गुजरात

() आंध्र प्रदेश

() उत्तराखंड

उत्तर :

(क) आंध्र प्रदेश

() भारत सरकारने १९७५ मध्ये ........ यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.

() डॉ.फुलरेणू गुहा

() उमा भारती

() वसुंधरा राजे  

() प्रमिला दंडवते

उत्तर :

(अ) डॉ.फुलरेणू गुहा

प्रश्न . पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

() सौदामिनी राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती

() विद्याबाळ - नारी समता मंच

() प्रमिला दंडवते - महिला दक्षता समिती

() ज्योती म्हापसेकर - महिला आयोग

उत्तर :

(४) ज्योती म्हापसेकर - महिला आयोग

प्रश्न . पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.

उत्तर :

महाराष्ट्रात स्त्री-मुक्ती चळवळीस सुरुवात झाली कारण

  • १९७५ मध्ये स्त्री-मुक्ती संघर्ष समिती ने महिलांसाठी राज्यस्तरीय परिषद घेतली आणि १९७८ मध्ये लिंगभेद व जातिभेदाविरोधात लढा देण्याचे जाहीर केले.
  • महिलांनी नियतकालिके, पथनाट्ये, गीतसंग्रह यांसारखे सांस्कृतिक उपक्रम सुरू केले.
  • तसेच हुंडा, स्त्री-भ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या प्रश्नांवर परिषदा, संघर्ष आणि संशोधन झाले.

या सर्व कृतींमुळे महाराष्ट्रात स्त्री-मुक्ती चळवळीचा पाया रचला गेला.

() १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.

उत्तर :

  • १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा करून हुंडा देणे व मागणे फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला.
  • पण १९६१ चा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही स्त्रियांचे मृत्यू होतच होते. याच्या चौकशीत हुंडा हेच कारण असल्याचे स्पष्ट झाल्याने,
  • आणि स्त्रियांना अधिक संरक्षणाची गरज ओळखून, पोलिस व अन्य यंत्रणांच्या मतानुसार १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.

() अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.

उत्तर :

  • भारतात अनेक वर्षे अस्पृश्यता पाळली जात असे.
  • या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाखीचे बनले होते.
  • स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला.
  • हे घटनादत्त अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळणे आवश्यक होते.

म्हणून अस्पृश्यतेची ही हीन रूढी नष्ट होण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली.

() संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक शैक्षणिक हक्क दिले आहेत.

उत्तर :

  • भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती व परंपरांचा देश आहे.
  • अल्पसंख्याकांच्या संस्कृती, भाषा व शिक्षणाची जपणूक व्हावी आणि त्यांची ओळख टिकून राहावी, यासाठी संविधानाने त्यांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
  • यामुळे ते आपली भाषा, लिपी, परंपरा जतन करू शकतात आणि स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात व चालवू शकतात.

प्रश्न . टीपा लिहा.

() चिपको आंदोलन

उत्तर :

स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार १९७३ च्या चिपको आंदोलनात दिसून आला.

  • हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशातील जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने कापली जाणार होती.
  • या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन सुरू केले.
  • या आंदोलनात स्त्रियांनी वृक्षांभोवती फेर धरले, झाडांना मिठी मारून वृक्षतोड थांबवली.
  • जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला 'चिपको आंदोलन' म्हणतात.
  • या आंदोलनात महिलांचा व्यापक सहभाग होता.
  • गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी अशा स्त्रियांनी जागृती केली.

() मानव अधिकार संरक्षण कायदा

उत्तर :

१९९३ साली केंद्र शासनाने स्त्री-पुरुषांवरील अन्याय कमी करण्यासाठी मानव अधिकार संरक्षण कायदा केला. या कायद्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग  आणि राज्य मानवाधिकार आयोग स्थापन झाले.

या अंतर्गत –

  • सामूहिक अत्याचारांवर कारवाई झाली,
  • घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी उपाय झाले,
  • स्त्रियांसाठी सुरक्षित कार्यस्थळाची हमी देण्यात आली.

यामुळे स्त्रियांवरील अन्याय कमी झाला आणि स्त्री-पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी या कायद्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रश्न . पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.

स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.

उत्तर :

स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, स्त्रिया एकत्र येऊन एखाद्या विषयावर लढा दिल्यास समाजात मोठे बदल घडू शकतात. हे पुढील उदाहरणांवरून दिसते,

  • स्त्रियांच्या लाटणे मोर्चा सारख्या आंदोलनातून बाजारातील महागाईवर नियंत्रण आले.
  • चिपको आणि बिष्णोई आंदोलनातून पर्यावरण संरक्षणाला बळ मिळाले.
  • आंध्र प्रदेशातील मद्यपानविरोधी लढ्यात दारूविक्रीवर बंदी आणण्यास सरकारला भाग पाडले.
  • तेलंगणातील शेतकरी मुक्तिलढ्यामुळे वेठबिगार प्रथा संपुष्टात आली आणि स्त्रियांचीही मुक्तता झाली.
  • स्त्री-संघटनांच्या प्रयत्नांमुळे महिला विद्यापीठे व स्त्री-अभ्यास केंद्रे उभी राहिली.
  • हुंडाविरोधी, स्त्री-अत्याचारविरोधी व स्त्री-मुक्ती चळवळीमुळे महिलांवरील अन्याय कमी झाला.

म्हणूनच, स्त्रियांची एकजूट सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे सिद्ध होते.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- इतिहास पाठ-६ : महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण- नोट्स

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-६ : महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Useful Links

Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium  – All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : धडा ५ : शैक्षणिक वाटचाल online Solutions

Next Chapter : धडा ७ : विज्ञान व तंत्रज्ञान online Solutions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *