Solutions-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१० : बदलते जीवन : भाग २-Maharashtra Board

बदलते जीवन : भाग १

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-९

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() भारताने ......... च्या नेतृत्वा खाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

() सुनील गावसकर_

() कपिल देव

() सय्यद किरमाणी

() संदीप पाटील

उत्तर :

भारताने कपिल देव च्या नेतृत्वा खाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

() जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात......... भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

() पंजाबी

() फ्रेंच

() इंग्रजी

() हिंदी

उत्तर :

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

प्रश्न . दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.

पुढील तक्ता पूर्ण करा.

१. भारतातील महत्त्वाच्या भाषा --------------
२. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू ------------
३. तुम्ही पाहिलेले बालचित्रपट  
४. विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे  
उत्तर :

() भारतातील महत्त्वाच्या भाषा : भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी.

() ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू : करनाम मल्लेश्वरी, अभिनव बिंद्रा, नीरज चोप्रा, मीराबाई चानू, मणु भाकर

()  तुम्ही पाहिलेले बालचित्रपट : श्यामची आई, किल्ला, हाफ टिकट, मकडी, छिल्लर पार्टी

() विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे : झी २४ तास, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी, आज तक,  झी न्यूज

प्रश्न . पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.

उत्तर :

१९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच वर्षी, सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. या दोन घटनांमुळे देशभरात क्रिकेट खेळाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या यशांमुळे भारतातील सर्व राज्यांमध्ये क्रिकेट खेळले जाऊ लागले,

() चित्रपटांचे अर्थ कारण बदलत आहे.

उत्तर :

  • चित्रपट कृष्णधवलपासून रंगीत झाले.
  • चित्रीकरणाची स्थळे देशाबाहेर जाऊ लागली, ज्यामुळे प्रेक्षकांना देश-विदेशातील वैविध्यपूर्ण जागा दिसू लागल्या.
  • पूर्वी ३-४ तास चालणारा सिनेमा आता दीड तासांवर आला आहे.
  • 'एकच चित्रपटगृहात १०० आठवडे चालणे' ही संकल्पना बदलली. आता एकच चित्रपट एकाच वेळी देश-परदेशांतील हजारो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ लागला, ज्यामुळे चित्रपटांचे अर्थकारण पूर्णपणे बदलून गेले.
  • चित्रपट निर्मितीला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला असून, हा उद्योग कोट्यवधी लोकांना रोजगार देत आहे.

प्रश्न . पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

() भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे?

उत्तर :

  • भारतातील प्रमुख भाषांच्या अनेक बोलीभाषा आहेत.
  • बोलीभाषा मुख्य भाषेला (प्रमाण भाषेला) शब्दांचा पुरवठा करतात, मुख्य भाषेला समृद्ध बनवतात.
  • या बोलीभाषा म्हणजे समृद्ध परंपरा, विचार व संस्कृती यांचा ठेवा आहे, जो त्या भाषेला अधिक समृद्ध बनवतो.
  • हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा नष्ट होऊ नये आणि एक चांगला वारसा जपला जावा, यासाठी बोलीभाषांचे जतन करणे आवश्यक आहे.

() वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर :

ताज्या बातम्या देणे, जाहिरातींद्वारे उद्योगाला चालना देणे, लोकमत घडवणे आणि शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणे ही वृत्तपत्रांची प्रमुख कार्ये होती. सुरुवातीला ती कृष्णधवल रंगात छापली जात होती.

आधुनिक स्वरूप:

  • काळानुसार वृत्तपत्रे रंगीत झाली. जिल्हा किंवा तालुका पातळीवरील वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी वृत्तपत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे.
  • वृत्तपत्रे आता अधिक सक्रिय झाली असून दुष्काळग्रस्त किंवा पूरग्रस्तांसाठी निधी उभारणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे यांसारख्या सामाजिक कार्यांतून ती जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत.

() दूरदर्शन या माध्यमात कोणते बदलत झाले आहेत?

उत्तर :

सुरुवातीचा काळ:

  • स्वातंत्र्योत्तर काळात भारतात दूरदर्शनचे आगमन झाले.
  • सुरुवातीला कृष्णधवल आणि नंतर रंगीत झालेल्या दूरदर्शनवर मोजकेच कार्यक्रम ठराविक वेळेत प्रसारित होत असत.
  • हळूहळू शैक्षणिक कार्यक्रम, बातम्या, राष्ट्रपती-प्रधानांच्या दौऱ्यांचे वार्तांकन सुरू झाले. 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांनी या माध्यमाची लोकप्रियता सिद्ध केली.

परिवर्तनाचे टप्पे:

  • १९९१: सीएनएन वाहिनीने इराक युद्धाचे केलेले थेट प्रक्षेपण हे भारतातील वृत्तवाहिन्यांसाठी एक मैलाचा दगड ठरले.
  • १९९८: 'स्टार' (सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन) या खासगी उद्योगसमूहाच्या भारतात येण्याने सुरुवातीच्या काळातील नीरस आणि एकसुरी बातम्यांचे विश्व पूर्णपणे बदलून गेले.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- इतिहास -पाठ-१० : बदलते जीवन : भाग २- नोट्स

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१० : बदलते जीवन : भाग २ - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Useful Links

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *