बाह्यप्रक्रिया भाग-१
इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-३-Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) कायिक विदारण म्हणजे काय ?
कायिक विदारण ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात खडकांच्या रासायनिक गुणधर्मात कोणताही बदल होत नाही, परंतु खडक फाटतात, तुटतात किंवा त्यांच्या छोट्या तुकड्यांमध्ये विघटन होते.
(आ) रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते?
जेव्हा पाणी आणि त्यामधील विरघळलेले द्रव्ये खडकांतील खनिजांशी रासायनिक क्रिया करतात, तेव्हा खडकांची रचना बदलते किंवा ते विरघळतात — यालाच रासायनिक विदारण म्हणतात. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार:
(इ) जैविक विदारण कसे घडून येते?
(ई) विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा.
विदारण
विस्तृत झीज
नैसर्गिक घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे 'विदारण/अपक्षय' होय.
विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल, म्हणजे 'विस्तृत झीज' होय.
कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार होत.
तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे मुख्य प्रकार होत.
प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.
(अ) भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो.
चूक.
(आ) आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते.
बरोबर.
(इ) शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते.
बरोबर.
(ई) खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय.
बरोबर.
(उ) अपपर्णनातून जांभा खडकाची निर्मिती होते.
चूक.
प्रश्न ३. खालील ओघतक्ता पूर्ण करा.

प्रश्न ४. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा.
(अ) काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात.
जैविक विदारण.
(आ) खडकातील लोहावर गंज चढतो.
रासायनिक विदारण.
(इ) खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो.
कायिक विदारण
(ई) थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.
कायिक विदारण
(उ) ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे.
कायिक विदारण
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-३-बाह्यप्रक्रिया भाग-१- नोट्स
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-३-बाह्यप्रक्रिया भाग-१-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board-Marathi Medium-इयत्ता ९ वी-भूगोल – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२ : अंतर्गत हालचाली – Online Solutions
Next Chapter : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-४ : बाह्यप्रक्रिया भाग-२– Online Solutions
