Solutions-Marathi Medium-इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२-अंतर्गत हालचाली-Maharashtra Board

अंतर्गत हालचाली

इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२-Maharashtra Board

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . अचूक पर्याया समोर v अशी खूण करा.

() अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत?

  • भूरूपांवर
  • गतीवर
  • दिशेवर
उत्तर :

गतीवर

() मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय निर्माण होतो ?

  • दाब
  • ताण
  • पर्वत
उत्तर :

ताण

() खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते?

  • ताण
  • दाब
  • अपक्षय
उत्तर :

ताण

() खालीलपैकीवली पर्वतकोणता?

  • सातपुडा
  • हिमालय
  • पश्चिम घाट
उत्तर :

हिमालय

() विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे?

  • पर्वतनिर्माणकारी
  • खंडनिर्माणकारी
  • क्षितिजसमांतर
उत्तर :

खंडनिर्माणकारी

प्रश्न . भौगोलिक कारणे लिहा.

() हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या .

उत्तर :

  • हिमालयाच्या पायथ्याशी जेव्हा भूकंप होतो, तेव्हा जमिनीत तीव्र हालचाल होते.
  • भूकंपाच्या पहिल्या म्हणजेच प्राथमिक लहरींमुळे जमिनीतील कण पुढे-मागे हलतात. त्यानंतर येणाऱ्या दुय्यम लहरींमुळे हेच कण वर-खाली (ऊर्ध्वगामी) हालतात.
  • या लहरींचा क्रम असा असतो की, आधी प्राथमिक लहरी पोहोचतात आणि मग दुय्यम लहरी. त्यामुळे भूकंपाच्या वेळी इमारती प्रथम पुढे-मागे हलताना दिसतात आणि नंतर वर-खाली हलून जोरात कोसळतात.

() मेघालय पठार दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.

उत्तर :

घटक मेघालय पठार दख्खन पठार
निर्मितीची पद्धत भूगर्भातील दाबामुळे खडक वर उचलले गेले भेगांमधून लाव्हा बाहेर पडून साचला
भूप्रक्रिया मंद भू-हालचाली शीघ्र (जलद) भू-हालचाली
मुख्य कारण दोन समांतर विभंगांमधील भाग वर उचलला गेला लाव्हारस साचल्याने तयार झालेले पठार

 मेघालय पठार हे जमिनीतील मंद हालचालींमुळे खडक वर उचलले गेल्याने तयार झाले आहे. तर दख्खन पठार भेगांमधून लाव्हारस बाहेर पडून साचल्यामुळे तयार झाले आहे.

त्यामुळे दोन्ही पठारांची निर्मिती वेगवेगळ्या प्रकारच्या भू-प्रक्रियांमुळे झाली आहे. अशा प्रकारे, मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.

() बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.

उत्तर :

  • जागृत ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो.
  • भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो.
  • त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जाण्यास वाव मिळतो. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.

() बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

उत्तर :

  • बॅरन बेटावरील ज्वालामुखी काही काळ शांत राहतो आणि नंतर अचानक उद्रेक होतो.
  • हा उद्रेक मध्यभागातून म्हणजेच केंद्रीय स्वरूपाचा असतो.
  • उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या लाव्हामुळे भूभाग शंकूसारखा वर उचलला जातो.

त्यामुळे बॅरन बेटाचा आकार आता शंकूप्रमाणे झाला आहे.

() ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो .

उत्तर :

  • भूकंप आणि ज्वालामुखी ही दोन्ही घटनांची सुरुवात भूपट्टांच्या सीमांवर होते.
  • जेव्हा भूपट्टांमध्ये हालचाल होते, तेव्हा खडकांवर दाब वाढतो आणि ते तुटतात. त्यामुळे आत शिलारस तयार होतो. हा शिलारस तड्यांमधून बाहेर पडतो आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो.
  • उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे जमिनीला हादरे बसतात.

त्यामुळे ज्वालामुखीमुळे भूकंप होऊ शकतो.

प्रश्न . अंतर्गत हालचाली ओळखा नावे सांगा.

() किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात.

उत्तर :

शीघ्र भू-हालचाली.

() हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे.

उत्तर :

मंद भू-हालचाली.

() पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो .

उत्तर :

शीघ्र भू-हालचाली.

() प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते.

उत्तर :

मंद भू-हालचाली.

प्रश्न . भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा.

() पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो .

() भूपट्ट अचानक हलतात.

() प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो .

() कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.

() साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.

उत्तर :

(१) भूपट्ट अचानक हलतात.

(२) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.

(३) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.

(४) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.

(५) पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो.

प्रश्न . फरक स्पष्ट करा.

() गट पर्वत वली पर्वत

उत्तर :

गट पर्वत वली पर्वत
अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज-समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण

होऊन खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात.

अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज-समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात.
दोन समांतर विभंगांमधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गट पर्वतांची निर्मिती होते. वळ्यांमुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते.
उदा., युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. उदा., हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स.

() प्राथमिक भूकंप लहरी दुय्यम भूकंप लहरी

उत्तर :

प्राथमिक भूकंप लहरी दुय्यम भूकंप लहरी
भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात, त्यांना 'प्राथमिक भूकंप लहरी' म्हणतात. प्राथमिक भूकप लहरीनतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात, त्यांना 'दुय्यम भूकंप लहरी' म्हणतात.
घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात. केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात.
मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होते. मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी होते.
कमी विध्वंसक असतात. जास्त विध्वंसक असतात.

() भूकंप ज्वालामुखी

उत्तर :

भूकंप ज्वालामुखी
भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हा हादरा, म्हणजेच 'भूकंप' होय. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकला जाण्याची क्रिया, म्हणजे 'ज्वालामुखी'/'ज्वालामुखीचा उद्रेक' होय.
भूकंपामुळे थोड्या प्रमाणावर काही प्रदेश उंचावतात, तर काही प्रदेश खचतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही. ज्वालामुखीच्या उद्रेका वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो.

प्रश्न . थोडक्यात उत्तरे लिहा.

() भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.

उत्तर :

भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

  • भूपृष्ठाखालील भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकंप होतात.
  • भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात.
  • ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात.
  • याशिवाय, भूपृष्ठाखालील खडकांत विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात.

() जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत?

उत्तर :

  • जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वतनिर्माणकारी मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.
  • उदा., हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स इत्यादी वली पर्वत हे पर्वतनिर्माणकारी मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.

() भूकंपाची तीव्रता घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे?

उत्तर :

  • भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते. भूकंपाची तीव्रता जितकी जास्त, तितके नुकसान अधिक होते
  • भूकंपाच्या प्राथमिक लहरीनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहर्रीपेक्षा अधिक विध्वंसक असतात.
  • या लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते.
  • परिणामी, भृपृष्ठावरील इमारती/घरे वरखाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते.
  • कमी तीव्रतेचा भूकंप (3-4 रिश्टर स्केल) असल्यास सौम्य हादरे जाणवतात, पण फारसा तोडफोड होत नाही. घरांना विशेष नुकसान होत नाही.

() भूकंपाचे भूपृष्ठावर मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते?

उत्तर :

भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम :

  • जमिनीला तडे पडणे.
  • भूमिपात होऊन दरडी कोसळणे.
  • भूजलाचे मार्ग बदलणे.
  • काही प्रदेश उंचावले जाणे, तर काही प्रदेश खचणे.
  • सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होणे.
  • हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळणे.

भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम :

  • प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होणे.
  • वाहतुकीचे मार्ग खंडित होणे.
  • संदेशवहन व्यवस्था कोलमडणे.

() भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर :

भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी असे पुढील तीन प्रकार होतात :

  • प्राथमिक लहरी (Primary or ‘P’ Waves) : भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या प्राथमिक किंवा 'P' लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेत सर्व दिशांनी भूपृष्ठात प्रवास करतात. या लहरींमुळे खडकातील कण पुढे-मागे सरकतात. घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकणारा या लहरींचा मात्र द्रवरूपातील गाभ्यामधून प्रवास करताना दिशेत बदल होतो.
  • दुय्यम लहरी (Secondary or ‘S’ Waves) : प्राथमिक लहर्रीनंतर भृपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा 'S' म्हटले जाते. या लहरींही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. या लहरींमुळे खडकातील कण वर-खाली सरकतात, या लहरी फक्त घन पदार्थांतून प्रवास करतात. प्राथमिक लहरीपेक्षा दुय्यम लहरी या अधिक विध्वंसक असतात.
  • भूपृष्ठ लहरी (Surface or ‘L’ waves) : प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ किंवा 'L' लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात.

() ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.

उत्तर :

ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण पुढीलप्रमाणे :

(i) उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार : उद्रेकानुसार ज्वालामुखीचे केंद्रीय ज्वालामुखी व भेगीय ज्वालामुखी असे प्रकार पडतात.

  • केंद्रीय ज्वालामुखी : उद्रेकाच्या वेळी मोठ्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर पडणारा लाव्हारस म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी होय. केंद्रीय ज्वालामुखींमुळे ज्वालामुखीय पर्वत तयार होतात. उदा., जपानमधील फुजियामा.
  • भेगीय ज्वालामुखी : उद्रेकाच्या वेळी अनेक तडांतून (भेगांतून) बाहेर पडणारा लाव्हारस म्हणजे भेगीय ज्वालामुखी होय. भेगीय ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. उदा., भारतातील दख्खनचे पठार.

(ii) उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखींचे प्रकार : उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखींचे पुढील तीन प्रकार पडतात :

  • जागृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा., भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
  • सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी : जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदा., भारतातील बॅरन बेट.
  • मृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदा., टांझानियातील किलीमांजारो.

प्रश्न . आकृतीच्या साहाय्याने अपिेकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम भूपृष्ठ लहरी दाखवा.

उत्तर :

 

प्रश्न . सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा.

() माउंट किलीमांजारो.  () मध्य अटलांटि भूकंपक्षेत्र.  () माउंट फुजी. () क्रॅकाटोआ() माउंट व्हेसुव्हियस.

उत्तर :

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२-अंतर्गत हालचाली- नोट्स

PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-२-अंतर्गत हालचाली-स्वाध्याय प्रश्नोत्तरे


महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 51

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (24 PDF) Rs. 86

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *