वितरणाचे नकाशे
इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-१-Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न_१. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(अ) वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो .
अयोग्य.
(आ) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.
योग्य
(इ) क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्या प्रमाणे छटा बदलत नाहीत.
अयोग्य.
(ई) क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.
अयोग्य.
(उ) लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
अयोग्य.
(ऊ) टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे.
योग्य
(ए) समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.
अयोग्य.
(ऐ) टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते.
योग्य
प्रश्न_२. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.
उपयोग :
- वितरणाच्या नकाशांद्वारे एखाद्या प्रदेशातील विशिष्ट घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध स्पष्ट होतो.
- एखादा घटक (उदा. लोकसंख्या, पर्जन्य, तापमान) कोणत्या भागात अधिक आहे व कोणत्या भागात कमी आहे, हे स्पष्टपणे कळते.
- भूपृष्ठ, हवामान, जलस्रोत, जमिनीचा प्रकार, लोकसंख्या, शेती, उद्योग आदी घटकांची माहिती समजते.
प्रकार :
- टिंब पद्धतीचे नकाशे : एखाद्या घटकाचे वितरण विशिष्ट टिंबांच्या माध्यमातून दर्शवले जाते. उदा. लोकसंख्या, जनावरांची संख्या.
- क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशे : रंगछटांद्वारे घटकांची घनता किंवा प्रमाण दाखवले जाते. वितरणाचे जास्तीत जास्त मूल्य व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन ५ ते ७ गट (मूल्यवर्ग) ठरवले जातात. उदा. लोकसंख्येची घनता, साक्षरता दर.
- समघनी पद्धतीचे नकाशे : समान मूल्ये असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांद्वारे घटकांचे सलग वितरण दाखवले जाते. उदा. तापमान (समताप रेषा), पर्जन्य (समवृष्टि रेषा), उंची (समउंच रेषा).
(आ) समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक.
| समघनी पद्धत | क्षेत्रघनी पद्धत |
| जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. | जेव्हा एखाद्या चलाचे वितरण विलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी क्षेत्रघनी पद्घतीचा वापर केला जातो. |
| समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो. | क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध यांचा वापर केला जातो. |
| समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जात नाही. | क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. |
(इ) प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा.
प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत किंवा क्षेत्रघनी पद्धत उपयुक्त असते. लोकसंख्या या घटकाचे वितरण विलग असते व हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो.
- टिंब पद्धत : टिंब पद्धतीच्या नकाशात एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या हा घटक ज्या तन्हेने वितरित झाला आहे, तशाच तन्हेने नकाशात टिंबे देऊन त्याचे वितरण दाखवले जाते. लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे, तर नागरी लोकसंख्या गोलाद्वारे दाखवली जाते.
- क्षेत्रघनी पद्धत : क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात लोकसंख्येचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. लोकसंख्या वितरणाचे जास्तीत जास्त मूल्य व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन ५ ते ७ गट (मूल्यवर्ग) ठरवले जातात. प्रत्येक गटाचे (मूल्यवर्गाचे) मूल्य वेगळे असल्यामुळे प्रत्येक गटाच्या (मूल्यवर्गाच्या) मूल्याप्रमाणे वेगवेगळ्या छटांच्या आधारे लोकसंख्येचे उपविभागनिहाय वितरण दाखवले जाते.
प्रश्न_३. खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
(अ) जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.
क्षेत्रघनी नकाशा पद्धत.
(आ) जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण.
समघनी नकाशा पद्धत.
(इ) राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण.
टिंब नकाशा पद्धत.
(ई) भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण.
क्षेत्रघनी नकाशा पद्धत.
(उ) महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण.
समघनी नकाशा पद्धत.
प्रश्न ४. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

(अ) जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे?
जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे.
(आ) दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा.
जिल्ह्यात पूर्व दिशेस लोकसंख्येचे वितरण दाट आहे व पश्चिम दिशेस लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.
(इ) सर्वांत मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? ते ठिकाण कोणते?
सर्वांत मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या सुमारे वीस लाख आहे. ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर शहर होय.
(ई) सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता?
गगनबावडा हा सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका होय.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-१-वितरणाचे नकाशे- नोट्स
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-१-वितरणाचे नकाशे-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board-Marathi Medium-इयत्ता ९ वी-भूगोल – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ- २ : अंतर्गत हालचाली– Online Solutions
