आंतरराष्ट्रीय समस्या
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-6
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा.
(१) पुढीलपैकी कोणती समस्या अंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.
(अ) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद
(ब) कावेरी पाणीवाटप
(क) निर्वासितांचे प्रश्न
(ड) आंध्र प्रदेशातील नक्षलवाद
(क) निर्वासितांचे प्रश्न
(२) पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
(अ) रोजगाराचा अधिकार
(ब) माहितीचा अधिकार
(क) बालकांचे अधिकार
(ड) समान कामासाठी समान वेतन
(ब) माहितीचा अधिकार
(३) पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ?
(अ) शिक्षक दिन
(ब) बालदिन
(क) वसुंधरा दिन
(ड) ध्वजदिन
(क) वसुंधरा दिन
प्रश्न २. पुढील विधाने चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
(१) पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
हे विधान बरोबर आहे; कारण -
- औद्योगिकीकरणामुळे सर्वच देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे.
- तेलाच्या व वायूच्या गळतीमुळे तसेच अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
- हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, वायुप्रदूषण, समुद्रपातळी वाढ यांसारख्या समस्या एका देशापुरत्या मर्यादित नसतात. एका देशातील प्रदूषणाचा परिणाम इतर देशांवरही होतो.
- पॅरिस करार, क्योटो प्रोटोकॉल यांसारख्या पर्यावरणीय करारांची अंमलबजावणी सर्व राष्ट्रांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.
- म्हणून जागतिकीकरणाच्या या काळात पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
(२) निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात.
हे विधान चूक आहे; कारण -
- निर्वासितांच्या निवास, अन्न, आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेक राष्ट्रे आर्थिक भार टाळण्यासाठी आश्रय देण्यास टाळाटाळ करतात.
- निर्वासितांमध्ये दहशतवादी किंवा गुन्हेगारी घटक शिरकाव करतील, अशी भीती काही देशांना असते. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव ते आश्रय नाकारतात.
- निर्वासित मोठ्या संख्येने आल्यास स्थानिक लोकसंख्येवर रोजगार, निवास व सार्वजनिक सेवांवर ताण येतो. यामुळे सामाजिक असंतोष वाढण्याची शक्यता असते.
- भिन्न भाषा, धर्म, संस्कृती यांमुळे स्थानिक समाजात मतभेद व संघर्ष निर्माण होतील, अशी भीती राष्ट्रांना वाटते.
मानवीय दृष्टीकोन महत्त्वाचा असला तरी आर्थिक, सुरक्षा, सामाजिक व राजकीय कारणांमुळे अनेक राष्ट्रे निर्वासितांना आश्रय देण्यास तयार होत नाहीत.
प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मानवी हक्क
- माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना 'मानवी हक्क' असे म्हणतात.
- मानवी हक्कांचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झाला आहे.
- मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो.
- मानवी हक्कांच्या पूर्ततेसाठी लोकशाही शासनपद्धती आवश्यक मानली जाते. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनावर असते.
(२) पर्यावरणीय ऱ्हास
- पर्यावरणीय ऱ्हास म्हणजे मानवी कृतींमुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे पर्यावरणाची गुणवत्ता कमी होणे होय. यामध्ये हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी व नैसर्गिक संसाधनांचे नुकसान होते.
- औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या, जंगलतोड, प्रदूषण, रासायनिक खतांचा अतिवापर, खनिज उत्खनन यांमुळे पर्यावरणीय ऱ्हास वाढतो.
- याचा परिणाम म्हणून हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
- थोडक्यात, पर्यावरणातील नैसर्गिक संतुलन बिघडून पर्यावरणाची हानी होणे म्हणजेच पर्यावरणीय ऱ्हास होय.
(३) दहशतवाद
दहशतवाद ही एक जागतिक समस्या बनली आहे, जी राजकीय, आर्थिक किंवा धार्मिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसाचाराचा वापर करते.
- ही एक संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसाचार कृती आहे.
- समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.
- दहशतवादाला भौगोलिक सीमांचे बंधन नसते आणि तो कोणत्याही देशात अस्थिरता निर्माण करू शकतो.
- वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेलादेखील धोका निर्माण होतो.
- दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध राष्ट्रांच्या सुरक्षा यंत्रणांनी परस्पर सहकार्याने काम करणे आवश्यक झाले आहे.
प्रश्न ४. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे :
- वाढते औद्योगिकीकरण.
- रासायनिक खते व कीटकनाशकांचा वाढता वापर.
- वाहनांमुळे होणारे प्रदूषण (ध्वनी आणि वायू).
- अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग.
- तेल गळती आणि रासायनिक वायूंची गळती.
पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम
- वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे.
- मातीचा कस कमी होणे.
- पाण्याची टंचाई व पावसाचे प्रमाण कमी होणे.
- नद्या-नाले आटणे आणि प्रदूषण वाढणे.
- ओझोन वायूच्या थराला छिद्र पडणे.
उपाययोजना
- जंगलांची वाढ करणे
- वायू, ध्वनी व जलप्रदूषण रोखणे
- जैवविविधतेचे रक्षण करणे
- वृक्षतोड थांबवणे व वृक्षारोपण करणे
प्रश्न ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.
मानवी हक्क प्रस्थापित करण्याबाबत भारताची पुढीलप्रमाणे सकारात्मक भूमिका आहे :
- भारतीय संविधानात मानवी हक्कांना 'मूलभूत हक्कां'चे स्थान देण्यात आले आहे.
- त्यामुळे या हक्कांवर कोणी अतिक्रमण केल्यास त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येते. म्हणजेच मानवी हक्कांना न्यायालयाचे संरक्षण देण्यात आले आहे.
- महिला, बालके, दुर्बल घटक व अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर असते.
- मानवी हक्कांच्या रक्षणासाठी भारताने १९९३ मध्ये 'मानवी हक्क संरक्षण कायदा' संमत करून 'राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग' स्थापन केलेले आहेत.
(२) दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्या साठी उपाय सुचवा.
दहशतवाद हा जागतिक धोका असून त्याचा सामना करण्यासाठी कायदेशीर, सामाजिक, आर्थिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
दहशतवादामुळे होणारे परिणाम :
- निरपराध नागरिक, सुरक्षा दल व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान होते.
- समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन सामान्य जनजीवन विस्कळीत होते.
- उद्योग, पर्यटन व गुंतवणूक यांवर वाईट परिणाम होतो.
- धर्म, जात व समुदायांमध्ये संशय व द्वेष वाढतो.
- कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊन लोकशाही संस्था कमकुवत होतात.
- देशांमधील संबंध ताणले जातात.
दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय :
- दहशतवादविरोधी कायदे काटेकोरपणे राबवणे.
- आंतरराष्ट्रीय सहकार्य – माहितीची देवाणघेवाण व संयुक्त कारवाई करणे.
- दहशतवादाला आर्थिक पुरवठा रोखणे
- युवकांमध्ये अतिरेकी विचारसरणीविरोधी जागृती निर्माण करणे.
- सीमा सुरक्षा मजबूत करणे
- बेरोजगारी, दारिद्र्य व असमानता कमी करून असंतोषाला आळा घालणे.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-६-आंतरराष्ट्रीय समस्या- नोट्स
PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-६-आंतरराष्ट्रीय समस्या- स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48
Offer for इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30
Offer for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा ५ : भारत व अन्य देश – online Solutions
