भारत व अन्य देश
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-5
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश -
(अ) पाकिस्तान
(ब) बांगलादेश
(क) नेपाळ
(ड) म्यानमार
(क) नेपाळ
(२) भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश -
(अ) पाकिस्तान व चीन
(ब) नेपाळ व भूटान
(क) म्यानमार व मालदीव
(ड) अफगाणिस्तान व अमेरिका
(अ) पाकिस्तान व चीन
(३) भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी -
(अ) दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक
(ब) काश्मीर समस्या
(क) अण्वस्त्रविषयक संघर्ष
(ड) वरील सर्व समस्या
(ड) वरील सर्व समस्या
प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
हे विधान बरोबर आहे; कारण -
- समानता आणि परस्पर सन्मान या मूल्यांचा आधार घेऊन भारत आपल्या शेजारील देशांशी संबंध प्रस्थापित करतो.
- दक्षिण आशियातील देशांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा सर्वांत मोठा देश आहे.
- आर्थिक व तांत्रिक प्रगतीच्या बाबतीत भारत शेजारील राष्ट्रांपेक्षा अधिक प्रगत आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील देशांमध्ये भारताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
(२) भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
हे विधान चूक आहे; कारण -
- भारत आणि चीन यांच्यात मॅक्मोहन सीमारेषेबाबत सुरुवातीपासूनच मतभेद सुरू आहेत.
- तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्यामुळे भारत-चीन संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला.
- चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्र व अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवल्यामुळे भारताच्या सुरक्षेवर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारत-चीन संबंध तणावपूर्ण बनले आहेत.
- गलवान खोऱ्यात 2020 मध्ये झालेल्या संघर्षामुळे विश्वासाचा तुटवडा वाढला.
(३) श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांति सेना पाठवली.
हे विधान बरोबर आहे; कारण -
- श्रीलंकेत तमिळ अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायामुळे तेथील अंतर्गत संघर्ष वाढत होता.
- या संघर्षामुळे श्रीलंकेतील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आले होते.
- भारत आणि श्रीलंका यांच्यात १९८७ मध्ये झालेल्या करारानुसार श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारतावर आली.
- शेजारील देशात अस्थिरता निर्माण होऊ नये आणि प्रादेशिक शांतता राखण्यासाठी श्रीलंका सरकारच्या विनंतीवरून भारताने शांती सेना पाठवली.
प्रश्न ३. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
१. पुढील तक्ता पूर्ण करा.
| क्र. | झालेले करार/देवाणघेवाण | संबंधित देश |
| १. | ---------- | भारत-पाकिस्तान |
| २. | मॅकमोहन रेषा | ------------- |
| ३. | ----------------- | भारत-बांगलादेश |
| ४. | नैसर्गिक वायूची आयात | -------------- |
| ५. | ---------------- | भारत-अमेरिका |
| ६. | पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य | ------------ |
| ७. | --------------------------- | भारत-आफ्रिका |
| क्र. | झालेले करार/देवाणघेवाण | संबंधित देश |
| १. | सिमला करार | भारत - पाकिस्तान |
| २. | मॅक्मोहन रेषा | भारत -चीन |
| ३. | पाणीवाटप व सीमारेषेसंबंधी करार | भारत - बांग्लादेश |
| ४. | नैसर्गिक वायूची आयात | भारत - म्यानमार |
| 4. | नागरी अणुसहकार्य करार | भारत - अमेरिका |
| ६. | पायाभूत क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य | भारत -मालदीव |
| ७. | शिखर परिषद - २०१५ | भारत -आफ्रिका |
प्रश्न ४. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) सिमला करार
- भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ च्या युद्धानंतर २ जुलै १९७२ रोजी सिमला येथे सिमला करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही देशांनी आपापसातील वाद शांततामय मार्गाने व द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवण्याचे मान्य केले.
- या करारानुसार काश्मीरमधील संघर्षविराम रेषेला नियंत्रण रेषा (Line of Control) असे नाव देण्यात आले. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा व प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे ठरवले.
- परंतु पुढे पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही.
(२) भारत-नेपाळ मैत्री करार
- भारत आणि नेपाळ यांच्यात १९५० साली भारत–नेपाळ मैत्री करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही देशांनी परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध, सहकार्य आणि शांतता राखण्याचे मान्य केले.
- या करारामुळे भारत व नेपाळच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात मुक्तपणे ये-जा, राहणे, व्यापार व रोजगार करण्याची मुभा मिळाली. तसेच दोन्ही देशांनी एकमेकांच्या सुरक्षा हितसंबंधांचा आदर करण्याचे व परस्पर सल्लामसलत करून निर्णय घेण्याचे ठरवले.
- नेपाळच्या पायाभूत सुविधा, अन्नधान्य आणि व्यापार याबाबत भारताने नेपाळला मदत करावी, असेही या मैत्री कराराने ठरवण्यात आले.
- म्हणून भारत–नेपाळ मैत्री करारामुळे दोन्ही देशांतील ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक संबंध अधिक दृढ झाले.
(३) मॅकमोहन रेषा
- मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन (तिबेट) यांच्यातील सीमारेषा आहे. १९१४ साली सिमला येथे झालेल्या परिषदेत ब्रिटिश भारताचे प्रतिनिधी सर हेन्री मॅकमोहन यांनी ही सीमारेषा निश्चित केली.
- ही रेषा भारताच्या ईशान्य भागातील अरुणाचल प्रदेश आणि तिबेट यांच्यामधील सीमा दर्शवते. भारताने मॅकमोहन रेषेला अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून मान्यता दिली आहे; मात्र चीन या रेषेला मान्यता देत नाही.
- यामुळेच मॅकमोहन रेषेबाबत भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.
- या सीमारेषेच्या वादातून चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमणही केले होते.
(४) भारत-अफगाणिस्तान संबंध
- भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ऐतिहासिक, मैत्रीपूर्ण व सहकार्याचे संबंध आहेत.
- दोन्ही देशांमधील संबंध राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानवीय मदतीच्या क्षेत्रात विकसित झालेले आहेत.
- भारताने अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी रस्ते, धरणे, वीज प्रकल्प, शाळा व रुग्णालये उभारण्यात मदत केली आहे. तसेच अफगाण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारतात शिष्यवृत्ती दिल्या जातात.
- दहशतवादाला विरोध, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य राखणे या मुद्द्यांवर भारत आणि अफगाणिस्तान यांचे समान मत आहे.
- त्यामुळे भारत–अफगाणिस्तान संबंध दक्षिण आशियातील शांतता व सहकार्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.
प्रश्न ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा.
- भारत आणि अमेरिका यांच्यातील समान दुवा म्हणजे दोन्ही देशांत असलेली लोकशाही.
- नोकरी आणि शिक्षण या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांनी अमेरिकेशी सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले.
- शीतयुद्धानंतर भारताचे अमेरिकेशी सुरक्षाविषयक संबंध अधिक वाढले.
- सुरुवातीपासूनच अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर अधिक दृढ झाले. अशा रितीने भारत-अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध वाढत गेले.
(२) शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा.
शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी भारताने सातत्याने प्रयत्न केले आहेत. भारत आपल्या परराष्ट्र धोरणात लोकशाही मूल्ये, शांतता आणि सहकार्य यांना महत्त्व देतो. यासंदर्भातील काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत :
१) नेपाळ : नेपाळमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताने राजकीय संवाद, मध्यस्थी आणि सहकार्य केले. राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाही व्यवस्था निर्माण होण्यासाठी भारताने नेपाळमधील लोकशाही शक्तींना पाठिंबा दिला.
२) भूतान : भूतानमध्ये लोकशाही व्यवस्था विकसित व्हावी यासाठी भारताने आर्थिक व प्रशासकीय सहकार्य केले. भूतानने राजेशाहीतून लोकशाहीकडे वाटचाल करताना भारताचा सक्रिय पाठिंबा लाभला.
३) श्रीलंका : श्रीलंकेतील अंतर्गत संघर्ष शांततामय मार्गाने सोडवून लोकशाही टिकवण्यासाठी भारताने शांती प्रक्रिया आणि राजकीय तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना मदत केली.
४) मालदीव : मालदीवमध्ये लोकशाही संकटाच्या काळात भारताने तेथील लोकनियुक्त सरकारला मदत करून लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्यास हातभार लावला.
अशा प्रकारे शेजारील राष्ट्रांमध्ये लोकशाही, स्थैर्य व शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारताने विविध मार्गांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.
(३) दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे?
दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना ही दक्षिण आशियातील देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी कार्य करते. तिची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :
- सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व तांत्रिक सहकार्य वाढवणे.
- व्यापार वाढीस चालना देऊन प्रादेशिक विकास साधणे.
- दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, शिक्षण व मानव संसाधन विकासासाठी संयुक्त कार्यक्रम राबवणे.
- विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणे.
- दक्षिण आशियातील देशांमध्ये शांतता, स्थैर्य व परस्पर समज वाढवणे.
- संपूर्ण आशियाचे एक मुक्त व्यापारक्षेत्र निर्माण करणे.
या कार्यांमुळे दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये सहकार्य, विकास व सौहार्द निर्माण करण्यासाठी SAARC महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-५-भारत व अन्य देश- नोट्स
PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-५-भारत व अन्य देश- स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48
Offer for इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30
Offer for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा ४ : संयुक्त राष्ट्रे – online Solutions
Next Chapter : धडा ६ : आंतरराष्ट्रीय समस्या – online Solutions
