Solutions-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-१ : महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी-Maharashtra Board

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-१

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() स्वतंत्र सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था -

() राजकीय व्यवस्था

() आंतरराष्ट्रीय व्यवस्था

() सामाजि व्यवस्था

() यांपैकी नाही

उत्तर :

स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था – आंतरराष्ट्रीय व्यवस्था

() राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी -

() युद्ध टाळणे

() वसाहतींचे स्वातंत्र्य

() राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे

() नि:शस्त्री करण करणे

उत्तर :

राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी - युद्ध टाळणे

() शीतयुद्ध ........... या घटनेमुळे संपले.

() संयुक्त राष्ट्रांची स्थापना

() सोव्हिएत रशियाचे विघटन

() लष्करी संघटनांची निर्मिती

() क्यूबाचा संघर्ष

उत्तर :

शीतयुद्ध सोव्हिएत रशियाचे विघटन या घटनेमुळे संपले.

प्रश्न . पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

() पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण -

  • पहिल्या महायुद्धामुळे जगात मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी झाली.
  • असे युद्ध पुन्हा होऊ नये म्हणून सर्व देशांनी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे ठरवले.
  • आंतरराष्ट्रीय समस्या शांततेने सोडवण्यासाठी आणि युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे, या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ’ ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली.

() शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण -

  • एकध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एका गटात येणे.
  • शीतयुद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे दोन महासत्तांच्या गटांत सामील झाली होती.
  • राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे यालाच 'द्विध्रुवीकरण' असे म्हणतात. म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण नव्हे; तर द्विध्रुवीकरण झाले.

() मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण -

  • सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी 'पेरेस्त्रोइका' (पुनर्रचना) आणि 'ग्लासनोस्त' (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली.
  • यामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले आणि आर्थिक व राजकीय क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले.
  • याचा परिणाम म्हणजे हुकूमशाही नियंत्रणात आली; त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

प्रश्न . पुढील संकल्पना स्पष्ट करा.

() शीतयुद्ध

उत्तर :

  • प्रत्यक्ष युद्ध नसले तरी युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन 'शीतयुद्ध' या संज्ञेद्वारे केले जाते.
  • दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमधील सत्तास्पर्धा, शस्त्रास्त्रस्पर्धा आणि विचारप्रणालीतील भेद यांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यात प्रत्यक्ष युद्ध झाले नाही, परंतु युद्धाला पूरक असा तणाव कायम होता.

() अलिप्ततावाद

उत्तर :

  • शीतयुद्धाच्या काळात भांडवलशाही आणि साम्यवादी देशांनी आपापल्या बाजूच्या लष्करी संघटना तयार केल्या. जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटांत सामील झाले.
  • जगाचे द्विध्रुवीकरण होत असताना, काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या गटांपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले, त्याला 'अलिप्ततावाद' म्हणतात.

() परस्परावलंबन

उत्तर :

  • जगातील सर्व देश काही ना काही कारणांसाठी एकमेकांवर अवलंबून असतात.
  • कोणतेही राष्ट्र कितीही मोठे किंवा विकसित असले, तरी ते पूर्णपणे स्वयंपूर्ण राहू शकत नाही.
  • गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून राहावेच लागते.
  • तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या वा गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते.
  • देशांमधील हे परस्परावलंबनच आजच्या जागतिक व्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

() द्विध्रुवीकरण

उत्तर :

  • दुसऱ्या महायुद्धानंतर अण्वस्त्रनिर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून सोव्हिएत युनियन महासत्ता बनले. अमेरिका आधीच महासत्ता बनली होती.
  • जगातील बहुतेक देश या दोन महासत्तांच्या गटांत सामील झाले. राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे 'द्विध्रुवीकरण' होय. यामुळे तणावाचे क्षेत्र अधिक व्यापक झाले.

() जागतिकीकरण

उत्तर :

शीतयुद्धानंतर व्यापार, आर्थिक संबंध, माहिती-तंत्रज्ञान आणि विचार-कल्पनांच्या देवाणघेवाणीला आलेला खुलेपणा या सर्व प्रक्रिया 'जागतिकीकरण' म्हणून ओळखल्या जातात.

  • देशांच्या सीमांना पूर्वीइतके महत्त्व राहिले नाही आणि भांडवल, श्रम, बाजारपेठा व माहितीचे जगभर सुलभ संचरण होऊ लागले.
  • जागतिकीकरणामुळे विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला आणि आर्थिक एकीकरण झाले.
  • तथापि, त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही.

प्रश्न . पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

() पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.

मुद्दे पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध
१. कालखड
२. सहभागी राष्ट्रे
३. परिणाम - (राजकीय व आर्थिक)
४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना
उत्तर :

मुद्दे पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध
१. कालखड इ. स. १९१४ ते १९१८ इ. स. १९३९ ते १९४५
२. सहभागी राष्ट्रे मित्र राष्ट्रे: ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका.

मध्यगत राष्ट्रे: जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, ऑटोमन साम्राज्य (तुर्कस्तान), बल्गेरिया.

मित्र राष्ट्रे: ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका.

अक्ष राष्ट्रे: जर्मनी, जपान, इटली.

३. परिणाम - (राजकीय व आर्थिक) आर्थिक : (i) जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. (ii) सहभागी राष्ट्रांचे आर्थिक नुकसान. (iii) संपूर्ण जगाला झळ. (iv) विजेत्या व पराभूत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या.

राजकीय : (i) पूर्वीची साम्राज्ये नष्ट झाली. (ii) जगात नवी राष्ट्रे अस्तित्वात आली. (iii) वसाहतींत स्वातंत्र्य चळवळींना प्रारंभ.

आर्थिक : (i) पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक संहार झाला. (ii) आर्थिक नुकसान अधिक. (iii) महागाई, टंचाई यामुळे लोकांच्या हालअपेष्टा वाढल्या.

राजकीय : (i) आशिया-आफ्रिका खंडांतील वसाहती स्वतंत्र झाल्या. (ii) जगात शीतयुद्धाला प्रारंभ झाला.

४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रसंघ. (i) संयुक्त राष्ट्रसंघटना (युनो).

(ii) 'नाटो' लष्करी संघटना.

(iii) 'वॉर्सा करार' ही लष्करी संघटना.

() शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ?

उत्तर :

शीतयुद्ध समाप्तीची कारणे :

  1. सोव्हिएत युनियनची धोरणे: सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी 'पेरेस्त्रोइका' (पुनर्रचना) आणि 'ग्लासनोस्त' (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. यामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले आणि आर्थिक व राजकीय क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले.
  2. आर्थिक खुलेपणा: सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील राज्याचे नियंत्रण शिथिल झाले.
  3. लोकशाहीकरणाला चालना: पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
  4. सोव्हिएत युनियनचे विघटन: १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली.

() शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले?

उत्तर :

शीतयुद्धानंतरचे जग: प्रमुख बदल

  • जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली.
  • राष्ट्रांमध्ये व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला.
  • पूर्वीच्या 'शत्रुराष्ट्र' या कल्पनेऐवजी 'स्पर्धक राष्ट्र' ही संकल्पना पुढे आली.
  • जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत.
  • पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-१ : महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी- नोट्स

PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-१ : महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी- स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Useful Links

Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium  – All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : धडा २ : भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल online Solutions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *