महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-६
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
प्रास्ताविक :
- भारतात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचे मूळ पुरुषप्रधान (पितृसत्ताक) मानसिकतेत आहे.
- या मानसिकतेमुळे समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले, त्यांच्यावर अत्याचार झाले.
- परिणामी दरहजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कमी होत गेले.
दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण :
| अ.क्र. | जनगणना वर्ष | स्त्रियांचे प्रमाण |
| १. | १९५१ | ९४६ |
| २. | १९६१ | ९४१ |
| ३. | १९७१ | ९३० |
| ४. | १९८१ | ९३४ |
| ५. | १९९१ | ९२७ |
| ६. | २००१ | ९३३ |
स्त्रीशक्तीचा आविष्कार :
भारतातील विविध चळवळींमध्ये स्त्रियांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
- भूदान चळवळीत विनोबा भावे यांनी स्त्रीशक्तीचा उपयोग करून भूदानाचा संदेश देशभर पोहोचवला.
- निजामशाही व सरंजामशाहीविरोधी शेतकरी मुक्तिलढ्यातही स्त्रिया पुढे आल्या, ज्यामुळे वेठबिगारी संपून त्यांची अन्यायातून मुक्तता झाली.
- तसेच, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई व महागाईविरोधात मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चे निघाले आणि या आंदोलनाला चांगले यश मिळाले.
चिपको आंदोलन :
स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार १९७३ च्या चिपको आंदोलनात दिसून आला.
- हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशातील जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने कापली जाणार होती.
- या विरोधात चंडिप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन सुरू केले.
- या आंदोलनात स्त्रियांनी वृक्षांभोवती फेर धरले, झाडांना मिठी मारून वृक्षतोड थांबवली.
- जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला 'चिपको आंदोलन' म्हणतात.
- या आंदोलनात महिलांचा व्यापक सहभाग होता.
- गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी अशा स्त्रियांनी जागृती केली.
मद्यपानविरोधी आंदोलन :
- आंध्र प्रदेशात १९९२ मध्ये मद्यपानविरोधी आंदोलन सुरू झाले.
- आंध्र प्रदेश सरकारच्या धोरणामुळे अरक (स्थानिक दारू) विक्रेत्यांनी गावोगावी दारूची दुकाने उघडली.
- सामान्य जनता व्यसनाधीन होऊ लागली.
- साक्षरता कार्यक्रमात 'सीतामा कथा' मधील सीता दारूला कसा अटकाव करते, ही गोष्ट सांगितली जायची; त्यामुळे जागृती होऊ लागली होती.
- नेल्लोर जिल्ह्यातील दुबागुंटा गावातील तीन तरुण नशेत तळ्यात बुडाले.
- या घटनेने स्त्रियांनी दारू विक्रीचे दुकान बंद पाडले.
- याची प्रेरणा घेऊन राज्यभर मद्यपानविरोधी (अरकविरोधी) आंदोलन उभे राहिल्याने सरकारला दारूविक्री धोरण कडक करावे लागले.
जागतिक महिला दिनाचा इतिहास :
- ८ मार्च १८५७ – न्यूयॉर्कमध्ये कामकरी महिलांचा पहिला मोर्चा; मागण्या – कामाचे तास कमी, योग्य मोबदला, पाळणाघरे.
- ८ मार्च १९०९ – महिलांचा संप; त्याच मागण्या.
- डेन्मार्क बैठक – ‘वुमेन्स सोशलिस्ट इंटरनॅशनल’ने ८ मार्च ‘महिलांच्या लढ्याचा दिवस’ घोषित.
- १९७५ – संयुक्त राष्ट्र संघाने १९७५ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष' म्हणून घोषित केले.
- शांतता, विकास आणि स्त्री-पुरुष समानता ही संयुक्त राष्ट्रांची त्रिसूत्री होती.
- १९७७ – संयुक्त राष्ट्रांनी ८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ घोषित.
महिला आयोगाची स्थापना :
- भारत सरकारने १९७५ मध्ये महिला आयोगाची स्थापना केली.
- डॉ. फुलरेणू गुहा यांची सरकारने या आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली.
- स्त्रियांच्या समस्या व अन्याय याबाबतीत पाहणी केली गेली.
महिला आयोगाने पाहणी केलेले मुद्दे :
- स्त्रियांचे सामाजिक स्थान व त्यांचा दर्जा.
- संविधानात केलेल्या स्त्रियांसंदर्भातील तरतुदींचे परिणाम.
- स्त्रियांचे शिक्षण व टक्केवारी आणि शिक्षणामुळे स्त्रियांचा झालेला विकास.
- रोजगारातील स्त्रियांचे प्रमाण, स्त्री-पुरुष वेतनाचे प्रमाण.
- स्त्रियांची वर्तमान स्थिती, त्यांचा जन्म-मृत्युदर व स्त्रियांची भूमिका.
महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळ :
- १९७५ – महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवात ‘स्त्रीमुक्ती संघर्ष समिती’च्या राज्यव्यापी परिषदेतून. सर्व क्षेत्रांतील स्त्रियांचा सहभाग.
- १९७८ – जाहीरनाम्यात लिंगभेद, जातिभेद व वर्णभेदाविरुद्ध संघर्षाची भूमिका ठरली आणि विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम सुरू झाले.
- सांस्कृतिक उपक्रम – स्त्रीमुक्तीची ललकारी गीतसंग्रह, मुलगी झाली हो पथनाट्य, प्रेरक ललकारी मुखपत्र.
स्थानिक गट व प्रकाशने –
- पुणे – सौदामिनी राव यांनी ‘स्त्रीमुक्ती आंदोलन समिती’ स्थापन केली (१९७७), ‘बायजा’ द्वैमासिक.
- औरंगाबाद – ‘स्त्री उवाच’, ‘मैत्रीण’, ‘स्त्री अन्यायविरोधी मंच’.
- कोल्हापूर – ‘महिला दक्षता समिती’.
- नाशिक – ‘महिला हक्क’.
- लातूर – ‘नारी प्रबोधन मंच’.
हुंडा विरोधी संरक्षण समित्या – महाराष्ट्रभर स्थापना.
परिषद व उपक्रम – धुळे येथे स्त्री अत्याचारविरोधी परिषद.
महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व व संस्था – विद्या बाळ यांचे ‘नारी समता मंच’ व ‘मिळून साऱ्याजणी’ नियतकालिके, समाजवादी महिला सभा, क्रांतिकारी महिला संघटना.
सरकारी मदत – रोजगार हमी योजनेने स्त्री सबलीकरणास हातभार.
राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम –
- प्रमिला दंडवते – दिल्ली (१९७६) ‘महिला दक्षता समिती’; देशातील विविध राज्यांत शाखा.
- ‘अखिल भारतीय जनवादी महिला संघटना’ (१९८०) -कम्युनिस्ट पक्षाने ही संघटना स्थापन केली. हुंडा, स्त्री-भ्रूणहत्या, कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर या संघटनेने संघर्ष केला.
संशोधन व शिक्षण –
- पहिले महिला विद्यापीठ – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.
- स्त्री अभ्यास केंद्रे – टाटा समाज विज्ञान संस्था (मुंबई), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर).
- ‘आलोचना’ व ‘दृष्टी’ या केंद्रांनी सुद्धा या प्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावली..
स्त्रियांच्या संदर्भातील कायदे :
(i) १९५२ च्या कायद्याने -
- केंद्र सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले.
- वडिलांच्या संपत्तीत समान वाटा दिला.
- स्त्री-धनावरील तिचा अधिकार मान्य केला.
- बहुपत्नीत्व संपुष्टात आणले.
- स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार दिला.
(ii) १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा करून हुंडा देणे व मागणे फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला.
(iii) १९६१ साली प्रसूती सुविधा अधिनियम संमत करून स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मान्य झाली.
हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती :
- १९६१ चा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही स्त्रियांचे मृत्यू होतच होते. याच्या चौकशीत हुंडा हेच कारण असल्याचे स्पष्ट झाल्याने आणि स्त्रियांना अधिक संरक्षणाची गरज ओळखून, पोलिस व अन्य यंत्रणांच्या मतानुसार १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.
कौटुंबिक न्यायालय (१९८४) :
कौटंबिक न्यायालयांच्या स्थापनेमागील उद्देश :
- विवाहासंदर्भात वाद सोडवणे.
- पोटगी व विभक्त राहणे याबाबत निर्णय देणे.
- एकल पालकत्व, अपत्यांचे संगोपन व मालकी यांबाबत निर्णय देणे.
- कामकाजात सामंजस्य व समुपदेशकांना महत्त्व.
पोटगीबाबतचा खटला (१९८५) :
- एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठरावीक रक्कम देणे, याला 'पोटगी' असे म्हणतात.
- १९५२च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले.
- पोटगीच्या अधिकारामुळे घटस्फोटित स्त्रियांचे जीवन सुसह्य बनले.
- भारतात विविध धर्मीयांसाठी पोटगीचे वेगवेगळे कायदे आहेत.
संसदेचा 'मुस्लीम वुमेन अॅक्ट' :
- सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो बेगम खटल्यात शाहबानोला अशी पोटगी मागण्याचा हक्क आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
- धार्मिक संघटनांनी याविरुद्ध गदारोळ माजवल्यामुळे संसदेने 'मुस्लीम वुमेन अॅक्ट' (प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स ) हा कायदा संमत केला.
सती प्रतिबंधक कायदा :
- ४ सप्टेंबर १९८७ रोजी राजस्थानातील देवरा गावी रूपकुंवर सती गेली.
- तिच्या सती जाण्याचे उदात्तीकरण करून या प्रथेचा गौरव केला गेला.
- त्या विरोधात काही स्त्री मुक्तिवादी कार्यकर्त्या व पत्रकार यांनी सत्यशोधन केले.
- अखेरीस सरकारने १९८८ मध्ये कडक तरतुदी असलेला 'सती प्रतिबंधक कायदा' संमत केला.
मानव अधिकार संरक्षण कायदा :
- स्त्री व पुरुषांवरील अन्याय दूर करण्यासाठी १९९३ मध्ये हा कायदा करण्यात आला.
- राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली.
- सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची स्थिती इत्यादी गोप्टींवर या आयोगाने प्रभावी काम केले.
महिलांसाठी आरक्षण :
- संविधानातील ७३व्या व ७४व्या कलमांत दुरुस्ती करून महिलांना स्थानिक शासन संस्थांत १/३ जागा राखून ठेवण्यात आल्या.
- सरपंच, अध्यक्ष, महापौर या पदांसाठी एक तृतीयांश जागांचे महिला आरक्षण ठेवण्यात आले.
- महाराष्ट्रासह १५ राज्यांत स्त्रियांसाठी ५०% आरक्षण दिलेले आहे.
संविधानाने स्त्रियांसाठी केलेल्या तरतुदी :
- स्त्री-पुरुष समानता तत्त्वाचा पुरस्कार.
- मतदानाचा अधिकार, पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणाचा अधिकार.
- रोजगाराच्या समान संधी.
- सती, हुंडा यांसारख्या दुष्ट चाली कायद्याने रद्द.
- स्त्रियांचा घटस्फोटाचा आणि पोटगीचा अधिकार मान्य.
- मालमत्तेत कायदेशीर वाटा.
- स्थानिक शासन संस्थांत आरक्षण.
दुर्बल घटकांचे सक्षमीकरण :
अनुसूचित जाती :
- स्वातंत्र्य, समानता या मूल्यांचा संविधानाने पुरस्कार केला.
- १७ व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता पालनाला बंदी घालण्यात आली.
- अस्पृश्य वर्गाचा अनुसूचित जातीत समावेश करून त्यांना शिक्षण व नोकऱ्यांत प्रतिनिधित्व दिले गेले.
अनुसूचित जमाती :
- दुर्गम भागात किंवा जंगलात राहणाऱ्या आदिवासीचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला.
- आधुनिकतेपासून लांब असणाऱ्या आणि अत्यल्प उत्पन्न असल्यामुळे निकृष्ट राहणीमान व वैद्यकीय मदतीचा अभाव असणाऱ्या आदिवासीना संरक्षणाची गरज असते.
- या वर्गाला कायदेमंडळात, शिक्षणात व नोकऱ्यांत आरक्षण दिलेले आहे.
भटक्या व विमुक्त जाती-जमाती :
- उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरत राहणाऱ्या जाती-जमातींच्या समूहांना 'भटक्या जाती' असे म्हणतात.
- पशुपालन व अन्य व्यवसाय करून हे गट आपली उपजीविका करतात.
- ब्रिटिशांनी १८७१ मध्ये गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत काही जातींना 'गुन्हेगारी जमाती' ठरवले होते.
- स्वातंत्र्योत्तर काळात हा कायदा रद्द करून या जमातींचा समावेश 'विमुक्त जमातींत' केला.
- भटक्या व विमुक्त जमातींना शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण दिलेले आहे.
अल्पसंख्याक :
- एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला अल्पसंख्याक' असे म्हणतात.
- या अल्पसंख्याकांना आपल्या संस्कृतीचे, भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी संविधानाने विशेष अधिकार दिलेले आहेत.
- अल्पसंख्याकांना आपल्या स्वतंत्र शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा हक्क असतो.
- अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात.
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता नववी- इतिहास पाठ-६ : महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण- नोट्स
PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-६ : महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48
Offer for इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30
Offer for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : धडा ५ : शैक्षणिक वाटचाल – online Notes
Next Chapter : धडा ७ : विज्ञान व तंत्रज्ञान – online Notes
