Notes-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-५ : शैक्षणिक वाटचाल-Maharashtra Board

शैक्षणिक वाटचाल

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-५

नोट्स

अभ्यासघटक :

  • प्राथमिक शिक्षण :
  • माध्यमिक शिक्षण :
  • उच्च शिक्षण
  • संशोधन संस्था - विज्ञान
  • अभियांत्रिकी
  • संशोधन संस्था - वैद्यक क्षेत्र
  • संशोधनसंस्था – कृषी

भारतीय शिक्षण :

  • १९५१ च्या पहिल्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता प्रमाण १७% होते.
  • साक्षरता वाढवणे हे सरकारपुढचे मोठे आव्हान होते.
  • या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या.

जनगणनेप्रमाणे भारतातील साक्षरतेचे प्रमाण :

जनगणना वर्ष साक्षरता प्रमाण
१९५१ १७%
१९७१ ३४%
१९८१ ४३%
१९९१ ५२%
२००१ ६४१

प्राथमिक शिक्षण :

(अ) 'खडू-फळा' योजना :

  • ६ ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला 'प्राथमिक शिक्षण' असे म्हणतात.
  • प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने १९८८ साली 'खडू-फळा' योजना (ऑपरेशन ब्लॅकबोर्ड) सुरू केली.
  • १९९१ साली केरळ हे पूर्णतः साक्षर राज्य झाले.

(ब) 'खडू-फळा' योजनेतील उपक्रम :

या योजनेअंतर्गत,

  • शाळांचा दर्जा सुधारणे.
  • किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे.
  • प्रत्येक शाळेला किमान दोन वर्गखोल्या, स्वच्छतागृह यासाठी निधी देणे.
  • दोन शिक्षकांपैकी एका स्त्री-शिक्षिकेची नेमणूक करणे.
  • फळा, नकाशा, ग्रंथालय, प्रयोगशाळा साहित्य आणि क्रीडा साहित्य यांसाठी देखील आर्थिक मदत पुरविण्यात आली.

(क) ११९४ मध्ये योजना विस्तार :

१९९४ मध्ये या योजनेचा विस्तार करून,

  • १०० पेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या शाळांना एक जादा खोली व शिक्षक देण्यात आले.
  • मुलींच्या शाळा व अनुसूचित जाती-जमातीबहुल शाळांना प्राधान्य देण्यात आले,
  • तसेच ग्रामीण भागात ५०% स्त्री-शिक्षिकांची नेमणूक बंधनकारक करण्यात आली.

(ड) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (DPEP):

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी केंद्र सरकारने हा कार्यक्रम सात राज्यांत सुरू केला.

कार्यक्रम :

या कार्यक्रमांतर्गत,

  • १००% विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करणे,
  • विद्यार्थी गळती थांबवणे,
  • मुली व दिव्यांगांसाठी शिक्षण उपलब्ध करणे,
  • संशोधन व मूल्यमापन करणे,
  • पर्यायी शिक्षण आणि समाजजागृतीस प्रोत्साहन देणे या उद्दिष्टांवर भर देण्यात आला.
  • १९९५ साली या कार्यक्रमांतर्गत मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली.
माहितीसाठी :

आदिवासी मुलांसाठी शिक्षण :

ताराबाई मोडक

  • बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याची सुरुवात.
  • आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या.
  • प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार.

अनुताई वाघ

  • ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासी उन्नतीसाठी संस्था स्थापन – कोसबाड प्रकल्प.
  • पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले.
  • बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालयाची स्थापना.

 माध्यमिक शिक्षण :

विद्यापीठ शिक्षण आयोग :

  • पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षणातील आमूलाग्र बदलासाठी या आयोगाची नियुक्ती केली.
  • या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली.
  • १९५२-५३ मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला.

मुदलियार आयोग :

  • या आयोगाने ११ वी+पदवीची ४ वर्षे किंवा ११+१+३ असा आकृतिबंध सुचवला.
  • माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम व अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारशी सुचवल्या.
  • उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना मांडली.

कोठारी आयोग :

  • या आयोगाने १०+२+३ हा सुचवलेला आकृतिबंध १९७२ पासून अमलात आला.
  • शिक्षणाची एकच पद्धत, त्रिभाषा सूत्र, निरंतर शिक्षण, प्रौढ्ध शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण व मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले.
  • अनुसूचित जाती-जमातींसाठी प्राधान्य, शैक्षणिक खर्चासाठी अंदाजपत्रकात वाढीव तरतूद अशा शिफारशी केल्या.
  • महाराष्ट्राने १९७२ साली १0+२+३ हा आकृतिबंध स्वीकारून १९७५ साली दहावीची पहिली परीक्षा घेतली.

उच्च शिक्षण :

विद्वापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती :

  • १९४८ मध्ये केंद्र सरकारने डॉ. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची नियुक्ती केली.
  • आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे आयोगाला दिली होती.

विद्यापीठ शिक्षण आयोगाची कामे :

  • विद्यापीठांना अनुदान मंजूर करून त्याचे वाटप करणे.
  • विद्यापीटीय शिक्षणाचे नियोजन करणे.
  • अभ्यासक्रमात सुसूत्रता आणणे.
  • शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य देणे.
  • उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी करणे.
  • विद्यापीठ विकास परिषदा स्थापन करणे.
  • पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्र निर्माण करणे.
  • नवी विद्यापीठे स्थापन करणे.
  • 'कंट्रिवाइड क्लासरूम' या आयोगाने तयार केलेल्या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले.

NCERT :

स्थापना :

  • १ सप्टेंबर १९६१ रोजी दिल्ली येथे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) या संस्थेची स्थापना झाली.
  • शालेय शिक्षण, शिक्षणविषयक सर्वकष धोरण आणि त्याची अंमलबजावणी यांविषयी मार्गदर्शन करणे या उद्देशाने NCERT ची स्थापना करण्यात आली.

NCERT ची कामे :

  • शिक्षणविषयक संशोधन करणे व प्रशिक्षणाची सोय करणे.
  • शिक्षणाचा विकास व विस्तार करणे.
  • शैक्षणिक कार्यक्रम राबवणे.
  • शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे.
  • शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन तंत्राचा विकास तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवले.

MSCERT :

स्थापना :

  • १९६४ मध्ये पुणे येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची (MSCERT) स्थापना झाली.
  • या संस्थेला 'विद्या प्राधिकरण' या नावाने संबोधले जाते.
  • या संस्थेतर्फे 'जीवन शिक्षण' हे मासिक प्रकाशित केले जाते.

MSCERT ची कामे :

  • प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे.
  • शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण देणे.
  • अभ्यासक्रम व मूल्यमापन यांबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे.
  • १० वी व १२ वीच्या परीक्षांनंतर त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणे.

बालभारती :

  • महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्या सक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे झाली.
  • इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते.
  • मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू , कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगु या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात.
  • ‘किशोर’ हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - १९८६ :

  • या धोरणानुसार बदलत्या गरजांप्रमाणे शिक्षणात मूलभूत बदल करण्यात आले.
  • सर्व राज्यांकरिता किमान एक अभ्यासक्रम दिला गेला.
  • सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळण्याची अपेक्षा करण्यात आली.
  • राज्यांच्या गरजांप्रमाणे अभ्यासक्रमात लवचीकता ठेवण्यात आली.
  • या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृतिकार्यक्रमाधारित 'प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-१९८८' तयार करण्यात आला.

उपग्रह वापर :

  • उपग्रहांदवारे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, हे १९७५ साली सिद्ध झाले.
  • 'इस्रो 'चे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात मोठे योगदान दिले.
  • अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली 'साईट' हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला.
  • 'उपग्रहाद्वारे शिक्षणप्रणाली' ही कल्पना पुढे आली.
  • ग्रामीण भागात उपग्रहाद्वारे दर्जेदार शिक्षण देण्याची सोय झाली.

मुक्त विद्यापीठाची कल्पना :

कल्पना :

  • संयुक्त राष्ट्रसंघाने १९७० हे वर्ष 'जागतिक शैक्षणिक वर्ष' म्हणून घोषित केले.
  • केंद्रीय शिक्षण व समाजकल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या चर्चासत्रांतून मुक्त विद्यापीठाची कल्पना पुढे आली.
  • सर्वसामान्यांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणे, हा मुक्त विद्यापीठ स्थापण्यामागील हेतू होता.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ :

  • १९७४ साली मुक्त विद्यापीठ स्थापनेच्या संदर्भात पी. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना झाली.
  • २० सप्टेंबर १९८५ रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली.
  • औपचारिक महाविद्यालयीन शिक्षण न घेतलेल्यांसाठी पात्रता, वय व अन्य अटींत सूट.
  • दूरस्थ शिक्षण कार्यक्रम आकाशवाणीवरून व दूरदर्शनवरून सादर.
  • एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम राबवले जातात.
  • देशात ५८ प्रशिक्षण केंद्रे, तर परदेशात ४१ केंद्रे कार्यरत आहेत.
  • महाराष्ट्रात नाशिक येथे १९८९ साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

संशोधन संस्था विज्ञान :

CSIR (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) :

  • स्थापना – १९५०, उद्देश: वैज्ञानिक संशोधनाला चालना व त्याचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे.
  • संशोधन क्षेत्रे – पदार्थविज्ञान, रसायन, औषधे, अन्नप्रक्रिया, खाणकाम.
  • उद्योगांसोबत सहकार्य – औद्योगिक संस्थांबरोबर करार → आयात कमी, परकीय चलन बचत.
  • मूलभूत कार्य – मूलभूत संशोधन प्रोत्साहन, परदेशी विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयोगशाळांची भूमिका.

महत्त्वपूर्ण कामगिरी :

  • मतदानासाठी बोटाला लावायची शाई.
  • हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यांवरील औषधे.
  • पाणीशुद्धीकरण तंत्रज्ञान.
  • बांबू उत्पादन काळात कपात.
  • डीएनए फिंगरप्रिंटिंगचा भारतातील प्रथम वापर.
  • अंदमानातील आदिवासींचा ६०,००० वर्षे जुना इतिहास सिद्ध.
  • भूकंपाची आगाऊ सूचना प्रणाली.

इत्यादी गोष्टी या संस्थेने केल्या.

नवकल्पना व परंपरागत ज्ञान :

  • कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर.
  • हळदीचा जखम बरे करण्यासाठी वापर.
  • तांदळाच्या जातींसाठी स्वामित्व (पेटंट) संरक्षण.
  • भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश (८ आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध).

या गोष्टींमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली.

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथेमॅटिकल अँड फिजिकल सायन्स, तमिळनाडू :

  • स्थापना वर्ष – १९६२.
  • मुख्य कार्य – गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला चालना देणे.

संगणक इन्स्टिट्यूट:

  • १९६९ साली इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जादवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे देशी बनावटीचा पहिला संगणक आयएसआयजेयू तयार केला.
  • १९७४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मितीचे कंत्राट मिळाले आणि त्यामुळे भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. संगणकांमुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला.
  • १९८७ साली अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिल्यानंतर राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला.
  • १९८८ मध्ये पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC) ची स्थापना करण्यात आली.
  • १९९१ साली डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी महासंगणक परम-८००० तयार करण्यात आला.

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (BARC) :

  • न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयांत मोलाचे संशोधन केले.
  • अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले.

अभियांत्रिकी :

आयआयटी :

  • स्थापना – १९५१, खरगपूर (प. बंगाल) – पहिली आयआयटी.
  • उद्देश – अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमध्ये उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध करणे.
  • नंतरची स्थापना/रूपांतरे – पवई (मुंबई), चेन्नई, कानपूर, नवी दिल्ली येथील महाविद्यालयांचे आयआयटीमध्ये रूपांतर.
  • मदत – सोव्हिएत रशिया, अमेरिका, जर्मनी, युनेस्को यांनी मदत केली..
  • दर्जा व अभ्यासक्रम – आयआयटींना स्वायत्त विद्यापीठांचा दर्जा देऊन बी.टेक व एम.टेक अभ्यासक्रम सुरू झाले..
  • वैशिष्ट्ये – प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश, माफक शुल्क, विद्यार्थ्यांसाठी आरक्षण.
  • ब्रेन ड्रेन – १९७०-८० दशकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशी स्थलांतरित.
  • नवीन आयआयटी – १९९४ : गुवाहाटी (आसाम), २००१ : रुरकी.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) :

  • उद्देश – कुशल व उच्च दर्जाचे व्यवस्थापक तयार करणे.
  • पहिली स्थापना – अहमदाबाद; केंद्र सरकार व गुजरात राज्य सरकारने संयुक्तपणे स्थापना.
  • मदत – अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल कडून उभारणीत मदत.
  • इतर ठिकाणे – कोलकाता, बंगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर, शिलाँग येथे IIM स्थापन.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) :

  • उद्देश – चित्रपटनिर्मिती संदर्भातील शास्त्रशुद्ध शिक्षण देणे.
  • प्रशिक्षण क्षेत्रे – दिग्दर्शन, संकलन, अभिनय व चित्रपटसंबंधित सर्व शाखा.
  • स्थान – पुणे.
  • विशेषप्रभात फिल्म कंपनीचा वारसा लाभलेली संस्था.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) :

  • स्थापना – १९६१, अहमदाबाद.
  • उद्देश – औद्योगिक आरेखन (इंडस्ट्रियल डिझायनिंग) शिक्षण.
  • अभ्यासक्रम प्रारंभ – १९६३-६४; बेसिक डिझाइन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचे डिझाइन, व्हिज्युअल कम्युनिकेशन.
  • महत्त्वाची कामे – आकाशवाणी संच (ट्रान्झिस्टर) व गणकयंत्र (कॅलक्युलेटर) यांचे डिझाइन. इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोधचिन्हे तयार.

संशोधन संस्था - वैद्यक क्षेत्र :

ICMR (भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद) – स्थापना: १९४९

  • उद्देश: विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय व बिगरशासकीय संशोधन संस्थांना सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक साहाय्य.
  • देशभरात २६ रोग संशोधन केंद्रे.
  • क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणात महत्त्वपूर्ण योगदान.

AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) :

  • उद्देश: प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना.
  • पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम.
  • वैशिष्ट्ये: संशोधन सुविधा, सुसज्ज इस्पितळे, माफक दरातील उपचार, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालये, हृदयविकार/मेंदूविकार/नेत्रविकार उपचारासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया – पुनर्गठन: १९५८

  • उद्देश: वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष ठरवणे, देखरेख व तपासणी.

सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी :

१९६९ मध्ये आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी व होमिओपॅथी यांमध्ये संशोधनासाठी सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी स्थापन.

१९७९ मध्ये या संस्थेचे विसर्जन करून तीन स्वतंत्र संस्था स्थापन :

  • सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन
  • सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी
  • सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नेचर क्युअर

विविध रोगांवर संशोधन, चाचण्या व औषधांचे प्रमाणीकरण यांची जबाबदारी.

अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर :

  • टाटा मेमोरियल सेंटरची शाखा.
  • कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि कर्करोगासंबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून ही संस्था कार्यरत आहे.

संशोधनसंस्था कृषी

  • १९०५ : भारतात कृषी संशोधनाची सुरुवात.
  • १९५८ : भारतीय कृषी संशोधन संस्थेला विद्यापीठाचा दर्जा.
  • विभाग – मृदाशास्त्र, कृषिशास्त्र, आर्थिक वनस्पतिशास्त्र इत्यादी विभागांमार्फत संशोधन सुरू झाले.
  • मुख्यालय – नवी दिल्ली; देशातील सर्वात मोठे कृषीविषयक ग्रंथालय.
  • संशोधन विषय – गहू, कडधान्ये, गळित पिके, भाजीपाला यावर संशोधन झाले.
  • विशेष कामगिरी – एका वर्षात एकापेक्षा अधिक पिके घेण्याच्या पद्धतीवर झालेले संशोधन शेतकऱ्यांना उपयुक्त ठरले.
PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- इतिहासपाठ-५ : शैक्षणिक वाटचाल - नोट्स

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-५ : शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *