सागरजलाचे गुणधर्म
इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ- ६-महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
अभ्यासघटक :सागरजलाची वैशिष्टये :
|
सागरजलाची सर्वसाधारण वैशिष्टये :
- पॅसिफिक महासागर हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे.
- जमिनीवरील क्षार (मीठ) पाण्यात मिसळतात आणि नद्यांद्वारे सागरात पोहोचतात.
- ही प्रक्रिया लाखो वर्षांपासून चालू आहे.
- बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होते, पण क्षार सागरातच राहतात – त्यामुळे सागराचे पाणी खारट होते.
- जमीन आणि पाणी यांचे तापमान बदलण्याची गती वेगळी असते:
- जमीन लवकर गरम होते आणि लवकर थंड होते.
- पाणी हळूहळू गरम होते आणि हळूहळू थंड होते.
त्यामुळे:
- विषुववृत्ताजवळ (गरम भागात) जमिनीचे तापमान सुमारे ४५°C, तर पाण्याचे २५°C असते.
- ध्रुवाजवळ (थंड भागात) जमिनीचे तापमान सुमारे -२५°C, तर पाण्याचे -२°C असते.
तापमान :
सागरजलाचे पृष्ठीय तापमान :
- सर्वत्र सारखे नसते.
- अक्षवृत्तानुसार बदलते.
- विषुववृत्तापासून ध्रुवाकडे कमी होत जाते.
- विषुववृत्ताजवळ : २५° से
- मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात : १६° से
- ध्रुवाजवळ : २° से
- परिणाम करणारे घटक : स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, लाटा, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इ.
सागरजलाचे खोलीनुसार तापमान :
- खोल जाताना तापमान कमी होते. पण हा बदल सर्वत्र सारखा नसतो.
- विषुववृत्ताजवळ फरक सर्वाधिक, मध्य अक्षवृत्तात कमी, तर ध्रुवीय प्रदेशात पृष्ठीय व खोल तापमान सारखे (४° से).
- जास्त खोलीवर तापमानात फारसा फरक पडत नाही. २००० मी नंतर तापमान स्थिर ४° से राहते.
- जास्त खोल सागरजल कधीही गोठत नाही.
- भूवेष्टीत समुद्रापेक्षा खुल्या सागराचे तापमान कमी असते.
विषुववृत्ताजवळ खोलीनुसार तापमान:
| खोली (मीटर) | तापमान (°C) | ||
| पृष्ठीय | १८–२५°C | ||
| ५०० मीटर | १२°C | ||
| १००० मीटर | ८°C | ||
| १५०० मीटर | ५°C | ||
| २००० मीटर | ४°C | ||
सूर्यकिरणांचा प्रभाव:
- सूर्यकिरण सागरपृष्ठावरून परावर्तित होतात. काही किरण खोलवर जातात, पण तीव्रता कमी असते.
- २००० मीटरच्या खाली सूर्यकिरण पोहोचत नाहीत. त्यामुळे त्या खोलीवर तापमान सर्वत्र ४°C असते.
क्षारता :
- सागरजलात मीठ (क्षार) असतो, पण सगळ्या सागरत त्याचे प्रमाण सारखे नसते.
- सागरात मीठ (क्षार) साठल्यामुळे पाणी खारट होते.
- नद्या जमिनीवरील क्षार सागरात आणतात.
- बाष्पीभवन फक्त पाण्याची वाफ करते, क्षार सागरातच राहतात.
क्षारतेवर परिणाम करणारे घटक:
- तापमान आणि बाष्पीभवनाचा वेग
- गोड्या पाण्याचा पुरवठा
- समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित (चारही बाजूंनी जमिनीने वेढलेले) स्वरूप
क्षारतेचे फायदे:
- क्षारतेमुळे पाण्याची उद्धरण क्षमता वाढते.
- मोठी जहाजे पाण्यावर सहज तरंगतात – जलवाहतुकीसाठी उपयुक्त.
- मिठागरांमधून मीठ मिळवता येते.
- मीठाचा उपयोग: अन्नात, औषधे व रसायने तयार करण्यासाठी, बर्फ बनवणे आणि अन्न टिकवणे
भौगोलिक क्षेत्रानुसार क्षारतेतील फरक:
| क्षेत्र | क्षारता | कारण |
| मध्य अक्षवृत्तीय (उष्ण कटिबंध) | 36–37‰ | जास्त तापमान, जास्त बाष्पीभवन |
| समशीतोष्ण कटिबंध | कमी | मध्यम तापमान, मध्यम बाष्पीभवन |
| ध्रुवीय प्रदेश | 32‰ | कमी तापमान, कमी बाष्पीभवन |
| विषुववृत्ताजवळ | मध्यम | ढगाळ हवामान, पाऊस, नद्यांचा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि जास्त तापमान यांचा संतुलन |
समशीतोष्ण कटिबंधातील सागरजलक्षारता :
- या कटिबंधात सूर्यकिरणे तिरपी पडतात. त्यामुळे तापमान कमी → बाष्पीभवनाचा वेगही कमी. पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी आणि वितळणाऱ्या बर्फामुळे गोड्या पाण्याचा मुबलक पुरवठा होतो. म्हणूनच समशीतोष्ण कटिबंधात अक्षांश वाढत जाईल तशी क्षारता कमी होत जाते.
काही ठळक उदाहरणे:
| समुद्र / महासागर | क्षारता (‰) | वैशिष्ट्य |
| अटलांटिक महासागर | 36‰ | खुला महासागर |
| भूमध्य समुद्र | 39‰ | भूवेष्टित, बाष्पीभवन जास्त |
| मृत समुद्र | 332‰ | अतिशय खारट, पूर्णतः भूवेष्टित |
| बंगालचा उपसागर | 32‰ | ढगाळ हवामान, नद्यांचा गोड्या पाण्याचा पुरवठा |
| अरबी समुद्र | 36‰ | तुलनेत कमी गोड्या पाण्याचा पुरवठा |
घनता :
- सागरजलाचे तापमान आणि क्षारता हे दोन घटक सागरजलाची घनता ठरवतात.
- तापमान कमी असल्यास घनता वाढते.
- क्षारता कमी असल्यास घनता कमी होते.
- मात्र, क्षारता कमी असूनही तापमान कमी असल्यास घनता वाढते.
- तापमान व क्षारतेचा घनतेवरील प्रभाव ५०० मी खोलीवर विशेष दिसून येतो.
- मात्र, १००० मी खोलीनंतर तापमान-क्षारता-बनता हे घटक फारसे बदलत नाहीत.
- तापमान-क्षारता-घनता या सागरजलाच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे सागरी प्रवाहांची निर्मिती होते.
- सागरी प्रवाहांमुळे सागरजलाच्या तापमानाचे नियंत्रण होते.
- प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहांचा परिणाम होतो.
मृत समुद्र :
- मृत समुद्र हे इस्राईल आणि जॉर्डन देशांच्या सीमेवर आहे.
- या समुद्राचे पाणी खूपच खारट आहे – सामान्य समुद्राच्या तुलनेत १० पट जास्त.
- या समुद्राच्या पाण्याची क्षारता ३३२‰ आहे. सर्वसाधारण महासागरी जलाची क्षारता ३५‰ असते.
- जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्रात मिळते.
- येथे पाऊस कमी, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी आणि बाष्पीभवन जास्त असल्यामुळे पाणी खूप खारट झाले आहे.
- या पाण्यात मासे आणि इतर सजीव राहू शकत नाहीत. काही एकपेशीय जीव मात्र तग धरतात.
- खारटपणामुळे पाण्यात क्षार साठतात आणि त्यातून क्षारस्तंभ तयार होतात. काही स्तंभ पाण्याच्या वर दिसतात.
- पाण्याची घनता जास्त असल्यामुळे येथे बुडण्याची शक्यता नाही – आपण सहज तरंगू शकतो.
- मृत समुद्राजवळचा भूभाग जगातील सर्वात कमी उंचीचा आहे – काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून ४०० मीटर खाली.
संकल्पना स्पष्टीकरण·
|
Click on link to get PDF from store :
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-६-सागरजलाचे गुणधर्म- नोट्स
PDF : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-६-सागरजलाचे गुणधर्म-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- भूगोल-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (12 PDF) Rs. 53
Offer for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103
इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98
Main Page : – Maharashtra Board-Marathi Medium-इयत्ता ९ वी-भूगोल – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ-५ : वृष्टी– Online Notes
Next Chapter : इयत्ता-९ वी-भूगोल-पाठ- ७ : आंतरराष्ट्रीय वाररेषा – Online Notes
