Notes-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-१ : महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी-Maharashtra Board

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-१

नोट्स

अभ्यासघटक :

  • आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा आणि महायुद्धानंतरच्या राजकीय बदलांचा आढावा.
  • देशांमधील परस्परावलंबन आणि परराष्ट्र धोरणाचे महत्त्व.
  • पहिले आणि दुसरे महायुद्ध यांची कारणे, सहभागी देश आणि परिणाम.
  • राष्ट्रसंघाची स्थापना.
  • शीतयुद्धाच्या काळातील राजकीय घडामोडी.
  • द्विध्रुवीकरण, अलिप्ततावाद आणि जागतिकीकरण.
  • जागतिक राजकारणातील बदल.

आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची ओळख :

कोणताही देश स्वयंपूर्ण नसतो आणि त्याला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. या परस्परावलंबनातूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा जन्म होतो.

परस्परावलंबन:

  • जगातील सर्व देश काही ना काही कारणांसाठी एकमेकांवर अवलंबून असतात.
  • कोणतेही राष्ट्र कितीही मोठे किंवा विकसित असले, तरी ते पूर्णपणे स्वयंपूर्ण राहू शकत नाही.
  • देशांमधील हे परस्परावलंबनच आजच्या जागतिक व्यवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवस्था:

  • स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते, तिला 'आंतरराष्ट्रीय व्यवस्था' म्हणतात.
  • या व्यवस्थेत राष्ट्रे एकमेकांशी करार करतात, त्यांच्यात देवाणघेवाण आणि व्यवहार होतात.

परराष्ट्र धोरण:

  • प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत, याविषयी निश्चित धोरण ठरवते, ज्याला 'परराष्ट्र धोरण' असे म्हणतात.
  • या धोरणांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संबंध निश्चित होतात.

महायुद्धे आणि त्यांचे परिणाम :

विसाव्या शतकातील दोन महायुद्धांनी जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. या युद्धांचे परिणाम दूरगामी आणि जागतिक राजकारणाला नवी दिशा देणारे ठरले.

पहिले महायुद्ध (१९१४ - १९१८) :

पहिल्या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या आणि सहभागी नसलेल्या, अशा सर्वच राष्ट्रांना आर्थिक नुकसान सोसावे लागले.

सहभागी राष्ट्रे:

  • मित्र राष्ट्रे: ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका.
  • मध्यगत राष्ट्रे: जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी, ऑटोमन साम्राज्य (तुर्कस्तान), बल्गेरिया.

प्रमुख परिणाम:

  • जीवित वित्तहानी : पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली.
  • राष्ट्रसंघाची स्थापना: युद्धाची भीषणता पाहता, असे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 'राष्ट्रसंघ' या संघटनेची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवणे आणि युद्ध टाळणे ही त्याची मुख्य जबाबदारी होती.
  • साम्राज्यांचा अस्त: युरोपमधील पूर्वीची साम्राज्ये कोसळली आणि त्यातून नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली.
  • स्वातंत्र्य चळवळी: युरोपीय राष्ट्रांच्या आफ्रिका आणि आशिया खंडातील वसाहतींमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या.
  • हुकूमशाहीचा उदय: राष्ट्रसंघाला युद्ध रोखण्यात यश आले नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये हुकूमशाही राजवटी अस्तित्वात आल्या, ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली.

 

माहितीसाठी :

पहिल्या महायुद्धानंतर युरोपात झालेले बदल :

(१) पहिल्या महायुद्धानंतर युरोपातील चार साम्राज्ये नष्ट झाली - (i) रशियन (ii) ऑस्ट्रो-हंगेरियन (iii) बाल्कन प्रदेशातील तुर्की (ऑटोमन) साम्राज्य व (iv) जर्मन साम्राज्य.

(२) या महायुद्धानंतर युरोपात पुढील नवीन राष्ट्रांचा उदय झाला - पोलंड, फिनलंड, लॅट्विया, लिथुएनिया, एस्टोनिया, हंगेरी, युगोस्लाव्हिया, झेकोस्लाव्हिया, रुमानिया, बल्गेरिया.

 

दुसरे महायुद्ध (१९३९ - १९४५) :

दुसरे महायुद्ध पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक संहारक ठरले. यामध्ये अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा, विशेषतः अणुबॉम्बचा वापर करण्यात आला.

सहभागी राष्ट्रे:

  • मित्र राष्ट्रे: ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका.
  • अक्ष राष्ट्रे: जर्मनी, जपान, इटली.

प्रमुख परिणाम:

  • अणुबॉम्बचा वापर: अमेरिकेने युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा (६ ऑगस्ट १९४५) व नागासाकी (९ ऑगस्ट १९४५) या शहरांवर अणुबॉम्ब टाकले.
  • प्रगत तंत्रज्ञानाने तयार झालेल्या शस्त्रांनी हे युद्ध झाल्याने पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत या युद्धात प्रचंड प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली.
  • जगातील सर्वच राष्ट्रांना या युद्धाची झळ लागून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले.
  • शीतयुद्धाची सुरुवात: युद्धात मित्र असणारे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन युद्ध संपताच एकमेकांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली आणि १९४५ ते १९९१ हा दीर्घकाळ शीतयुद्धाने व्यापला.

शीतयुद्ध: (१९४५ - १९९१) :

  • प्रत्यक्ष युद्ध नसले तरी युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन 'शीतयुद्ध' या संज्ञेद्वारे केले जाते.
  • हा संघर्ष अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा आणि विचारप्रणालीतील भेद यांमुळे सुरू झाला.

वैचारिक भिन्नता:

  • अमेरिका: भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राष्ट्र.
  • सोव्हिएत युनियन: समाजवादाचा व एकपक्षीय हुकूमशाहीचा पुरस्कार करणारे राष्ट्र.

शीतयुद्धाचे परिणाम :

(i) लष्करी संघटनांची निर्मिती:

  • शीतयुद्धाच्या काळात भांडवलशाही आणि साम्यवादी देशांनी आपापल्या बाजूच्या लष्करी संघटना तयार केल्या.
  • नाटो (NATO) – अमेरिकेच्या नेतृत्वाखाली बेल्जियम, ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगाल, ग्रीस इत्यादी १३ देशांनी १९४९ साली “नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन” ही लष्करी संघटना स्थापन केली. नंतर त्यात आणखी १४ देश सामील झाले.
  • वॉर्सा करार (Warsaw Pact) – सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली साम्यवादी देशांनी १९५५ साली “वॉर्सा करार” ही लष्करी संघटना स्थापन केली.

(ii) जगाचे द्विध्रुवीकरण:

  • जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटांत सामील झाले. राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे 'द्विध्रुवीकरण' होय. यामुळे तणावाचे क्षेत्र अधिक व्यापक झाले.

(iv) शस्त्रस्पर्धा:

  • दोन्ही महासत्तांनी एकमेकांना मागे टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे तयार करायला सुरुवात केली.
  • प्रगत तंत्रज्ञानामुळे अधिक धोकादायक आणि संहारक अस्त्रे बनवली गेली.
  • या शस्त्रस्पर्धेमुळे जगातील शांतता धोक्यात येईल, हे महासत्तांना लक्षात आले.
  • म्हणून शीतयुद्धाच्या काळात शस्त्रास्त्र नियंत्रण आणि निःशस्त्रीकरणासाठी प्रयत्न केले गेले.

(v) प्रादेशिक संघटनांची निर्मिती:

  • महासत्तांच्या स्पर्धेतून अलिप्त राहून आर्थिक विकास साधण्यासाठी विकसनशील राष्ट्रांनी प्रादेशिक पातळ्यांवर संघटना स्थापन केल्या.
  • उदा. युरोपीय आर्थिक संघ आणि सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी आग्नेय आशियाई देशांची संघटना 'आसियान' (ASEAN).
माहितीसाठी :

·        सर्व देश एका महासत्तेवर अवलंबून असतील तर ते 'एकध्रुवीकरण',

·        दोन महासत्तांत विभागले असतील तर ते 'द्विध्रुवीकरण'

·        अनेक महासत्तांत विभागले असतील तर त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेस 'बहुध्रुवीकरण' असे म्हणतात.

अलिप्ततावाद: एक तिसरा पर्याय :

शीतयुद्ध काळात जगाचे द्विध्रुवीकरण होत असताना, काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या गटांपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले, त्याला 'अलिप्ततावाद' म्हणतात.

स्थापना आणि नेतृत्व:

  • १९६१ मध्ये या चळवळीची सुरुवात झाली.
  • भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. अहमद सुकार्नो आणि घानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे न्क्रूमा यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू झाली.

मूल्ये आणि भूमिका:

  • या चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला.
  • आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास प्रोत्साहन दिले.
  • मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर ही चळवळ आधारलेली आहे.
  • गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या आणि एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची (NIEO) मागणी केली.
  • अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले.
  • निःशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन यांबाबत आग्रह धरला.
  • आर्थिक व सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले.
  • आंतरराष्ट्रीय राजकारणात अविकसित राष्ट्रांना सन्मानाने उभे राहण्याचा विश्वास दिला.

शीतयुद्धाची अखेर आणि नवीन जागतिक व्यवस्था :

१९८० च्या दशकाच्या अखेरीस शीतयुद्धाचा अंत झाला, ज्यामुळे जागतिक राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडले.

शीतयुद्ध समाप्तीची कारणे :

  1. सोव्हिएत युनियनची धोरणे: सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी 'पेरेस्त्रोइका' (पुनर्रचना) आणि 'ग्लासनोस्त' (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. यामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले आणि आर्थिक व राजकीय क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले.
  2. आर्थिक खुलेपणा: सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील राज्याचे नियंत्रण शिथिल झाले.
  3. लोकशाहीकरणाला चालना: पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
  4. सोव्हिएत युनियनचे विघटन: १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली.

शीतयुद्धानंतरचे जग: प्रमुख बदल

क्र. बदलाचे स्वरूप तपशील
१. एकध्रुवीय जागतिक व्यवस्था जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली.
२. व्यापार आणि आर्थिक संबंध राष्ट्रांमध्ये व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला.
३. स्पर्धक राष्ट्र’ संकल्पना पूर्वीच्या 'शत्रुराष्ट्र' या कल्पनेऐवजी 'स्पर्धक राष्ट्र' ही संकल्पना पुढे आली.
४. संयुक्त राष्ट्रांची जबाबदारी जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत.
५. नवीन जागतिक समस्या पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.

जागतिकीकरण :

शीतयुद्धानंतर व्यापार, आर्थिक संबंध, माहिती-तंत्रज्ञान आणि विचार-कल्पनांच्या देवाणघेवाणीला आलेला खुलेपणा या सर्व प्रक्रिया 'जागतिकीकरण' म्हणून ओळखल्या जातात.

  • अर्थ: देशांच्या सीमांना पूर्वीइतके महत्त्व राहिले नाही आणि भांडवल, श्रम, बाजारपेठा व माहितीचे जगभर सुलभ संचरण होऊ लागले.
  • परिणाम: जागतिकीकरणामुळे विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला आणि आर्थिक एकीकरण झाले. तथापि, त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही.
महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या कालखंडावर आधारित कालरेषा (Timeline) :

महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या कालखंडावर आधारित कालरेषा (Timeline) :

कालावधी / सन

घटना

१९१४ ते १९१८ पहिले महायुद्ध
१९१७ रशियात साम्यवादी क्रांती झाली
१९२० आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून राष्ट्संघाची स्थापना झाली
१९३९ ते १९४५ दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी हे पहिले महायुद्धापेक्षा अधिक संहारक व व्यापक होते
१९४५ ६ ऑगस्ट - अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला.

९ ऑगस्ट -अमेरिकेने जपानमधील नागासाकी या शहरावर अणुबॉम्ब टाकला.

१९४५ राष्ट्रासंघाला यश न मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली.
१९४५ ते १९९१ हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे परस्परांचे स्पर्धक बनले.
डिसेंबर १९४८ संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकार जाहीरनाम्याचा स्वीकार केला.
सन १९६१ अलिप्ततावादी चळवळीची सुरुवात झाली. ही चळवळ पंडित जवाहरलाल नेहरू, मार्शल टिटो, गमाल अब्दुल नासेर, डॉ. अहमद सुकानदो आणि क्वामे न्क्रुमा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली.
१९६७ आग्नेय आशियाई देशांनी (सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी) ‘आसियान’ (ASEAN) संघटनेची स्थापना केली.
१९८५ सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईका’ (पुनर्रचना) आणि ‘ग्लासनोस्त’ (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली.
१९९१ शीतयुद्धाचा संपूर्ण काळ संपला. सोव्हिएत रशियाचे विघटन झाले, ज्यामुळे जागतिक राजकारणात मोठे बदल झाले.
नोव्हेंबर १९९३ 'मास्त्रीक्ट ट्रीटी' मुळे युरोपीय आर्थिक संघाची स्थापना झाली.
२००२ युरोपीय देशांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.

[collapse]
महत्त्वपूर्ण संज्ञा आणि संकल्पना :

महत्त्वपूर्ण संज्ञा आणि संकल्पना :

संज्ञा व्याख्या
आंतरराष्ट्रीय व्यवस्था जगातील सर्व स्वतंत्र आणि सार्वभौम देशांची मिळून तयार होणारी व्यवस्था, ज्यात राष्ट्रे एकमेकांवर अवलंबून असतात आणि त्यांच्यात परस्पर व्यवहार चालतात.
परस्परावलंबन जगातील सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी एकमेकांवर अवलंबून असण्याची स्थिती. कितीही मोठे किंवा विकसित राष्ट्र असले तरी ते सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही.
परराष्ट्र धोरण प्रत्येक राष्ट्राने आपल्या अंतर्गत व्यवहारांप्रमाणेच इतर राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत, याविषयी ठरवलेले निश्चित धोरण.
राष्ट्रसंघ पहिल्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आणि भविष्यातील युद्धे टाळण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना.
शीतयुद्ध दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमध्ये प्रत्यक्ष युद्ध न होता, युद्धाला पूरक असलेली तणावपूर्ण परिस्थिती, सत्तास्पर्धा व विचारप्रणालीतील संघर्ष (१९४५-१९९१).
द्विध्रुवीकरण शीतयुद्धाच्या काळात जगातील बहुतेक देशांची अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांच्या गटांमध्ये झालेली विभागणी.
नाटो (NATO) (North Atlantic Treaty Organization) शीतयुद्ध काळात अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली तयार झालेली लष्करी संघटना.
वॉर्सा करार शीतयुद्ध काळात सोव्हिएत रशियाच्या प्रभुत्वाखाली तयार झालेली लष्करी संघटना, जी नाटोला प्रत्युत्तर म्हणून होती.
अलिप्ततावाद शीतयुद्धाच्या काळात दोन्ही महासत्तांच्या गटांमध्ये सामील न होता, त्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारलेली एक चळवळ.
वसाहतवाद एका देशाने दुसऱ्या देशाच्या भूप्रदेशातील काही भागावर ताबा मिळवून तेथे आपले राज्य प्रस्थापित करणे आणि स्थानिक लोकांचे शोषण करणे.
साम्राज्यवाद प्रबळ राष्ट्राने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर इतर दुर्बळ राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे आणि अनेक वसाहती स्थापन करणे.
पेरेस्त्रोईका व ग्लासनोस्त सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी अमलात आणलेली धोरणे; 'पेरेस्त्रोईका' म्हणजे पुनर्रचना आणि 'ग्लासनोस्त' म्हणजे खुलेपणा.
जागतिकीकरण शीतयुद्धानंतर व्यापार, भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहिती यांचा जगभर मुक्त संचार होण्याची प्रक्रिया, ज्यामुळे देशांच्या सीमारेषांचे महत्त्व कमी झाले.

[collapse]
PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-१ : महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी- नोट्स

PDF : इयत्ता नववी- राज्यशास्त्र-पाठ-१ : महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी- स्वाध्याय प्रश्नोत्तरे


 PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (10 PDF) Rs. 48

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (10 PDF) Rs. 44

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- इतिहास-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (20 PDF) Rs. 74

Offer  for  इयत्ता नववी- राज्यशास्त्र PDF Set :

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स (6 PDF) Rs. 30

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (6 PDF) Rs. 27

महाराष्ट्र बोर्ड- इयत्ता- इयत्ता नववी- राज्यशास्त्र-मराठी माध्यम सर्व धड्यांची नोट्स+स्वाध्याय प्रश्नोत्तरे (12 PDF) Rs. 48

Offer  for इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स (16 PDF)-Rs.63

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (16 PDF)-Rs.58

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र- सर्व १६ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (32 PDF)-Rs.113

Offer  for इयत्ता-९ वी- समाजशास्त्र PDF Set :

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल - सर्व २८ धड्यांची नोट्स (28 PDF)-Rs.103

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची स्वध्याय प्रश्नोत्तरे (28 PDF)-Rs.98

इयत्ता-९ वी- इतिहास व राज्यशास्त्र + भूगोल- सर्व २८ धड्यांची नोट्स वस्वध्याय प्रश्नोत्तरे (56 PDF)-Rs.182

Useful Links

Main Page : – Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium  – All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : धडा २ : भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल online Notes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *