अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-८-महाराष्ट्र बोर्ड
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.
(अ) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण .....
(i) कमी राष्ट्रीय उत्पन्न
(ii) प्रचंड लोकसंख्या
(iii) मोठे कुटुंब
(iv) अन्नधान्य कमतरता
(ii) प्रचंड लोकसंख्या
(आ) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ............. व्यवसायावर अवलंबून आहे.
(i) प्राथमिक
(ii) द्वितीयक
(iii) तृतीयक
(iv) चतुर्थक
(iii) तृतीयक
(इ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ............. प्रकारची आहे.
(i) अविकसित
(iii) विकसित
(ii) विकसनशील
(iv) अतिविकसित
(ii) विकसनशील
प्रश्न २. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे?
- ब्राझीलच्या पश्चिम भागात अॅमेझॉन नदीचे खोरे आहे. येथे सदाहरित वने आणि दुर्गम भूप्रदेश असल्यामुळे खनिज शोधणे आणि त्याचा वापर करणे कठीण आहे.
- याशिवाय, लोकसंख्या विरळ आणि वाहतूक सुविधा अपुरी असल्यामुळे या भागात खाणकाम व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही.
(आ) भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते?
(अ) साम्य :
- भारत व ब्राझील दोन्ही देशांमध्ये किनारपट्टीवर मासेमारी परंपरेने चालत आलेली आहे.
- दोन्ही देशांमध्ये खाऱ्या पाण्यातील मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आहे.
(ब) फरक :
| बाब | भारत | ब्राझील |
| गोड्या पाण्यातील मासेमारी | नद्या, तळी, सरोवरे यांमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित | नद्यांचे वेग, घनदाट जंगले यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित नाही |
| सागरी प्रवाह | सागरी प्रवाह एकत्र येत नाहीत, तरीही मासेमारी व्यवसाय विकसित | उष्ण व सागरी प्रवाहांचा संगम → अधिक प्लवक → जास्त मासे → मासेमारी व्यवसाय विकसित |
| मुख्य कारणे | किनाऱ्याच्या लांबीसह हवामान, परंपरा व तंत्रज्ञानामुळे व्यवसाय वाढलेला | प्रवाहांमुळे भरपूर मासे उपलब्ध होत असल्याने व्यवसाय भरभराटीला |
प्रश्न ३. कारणे सांगा.
(अ) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
- ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस किमी आहे. याउलट भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे ३२,८७,२६३ चौरस किमी आहे.
- ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे २० कोटी आहे. याउलट, भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे.
- म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
(आ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे सार्वजनिक (शासकीय) व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असलेली अर्थव्यवस्था.
- भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत वरीलप्रमाणे मिश्र अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे.
- दोघंही सार्वजनिक सेवांमध्ये शासनाचे नियंत्रण राखतात, तर काही सेवा क्षेत्रांमध्ये खासगी सहभागासही प्रोत्साहन दिले जाते.
- भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उदयोग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
- भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे.
अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
प्रश्न_४. पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा

(१) लोकसंख्येचे क्षेत्रानुसार वितरण
| क्षेत्र | भारत | ब्राझील |
| प्राथमिक (Agriculture, Forestry, Fishing) | ४८.८% | १०% |
| द्वितीयक (Industry, Manufacturing) | २४.३% | १९% |
| तृतीयक (Services) | २६.९% | ७१% |
(२) राष्ट्रीय उत्पादनातील क्षेत्रांचा वाटा
| क्षेत्र | भारत | ब्राझील |
| प्राथमिक | १७% | ५.५% |
| द्वितीयक | २६% | २७.५% |
| तृतीयक | ५७% | ६७% |
निष्कर्ष :
- भारताची अर्थव्यवस्था मुख्यतः प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून आहे (जास्त लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात कार्यरत).
- ब्राझीलची अर्थव्यवस्था मुख्यतः तृतीयक क्षेत्रावर आधारित आहे (जास्त लोकसंख्या व उत्पन्न सेवा क्षेत्रातून).
Click on below links to get PDF from store
PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-८-अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - नोट्स
PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-८-अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71
Main Page : – महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल– – All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : प्रकरण-७ : मानवी वस्ती – Online Solutions
Next Chapter : प्रकरण- ९ : पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन – Online Solutions
