Solutions-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-हवामान-Maharashtra Board

हवामान

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-महाराष्ट्र बोर्ड

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.

बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युका, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर्ते , पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, अॅमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रांडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.

प्रदेश भारत ब्राझील
जास्त पावसाचे    
मध्यम पावसाचे    
कमी पावसाचे    

(टीप : हा प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत शोधा.)

उत्तर :

प्रदेश भारत ब्राझील
जास्त पावसाचे पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा, पूर्व महाराष्ट्र अॅमेझोनास, रिओ ग्राँडे दो सुल.
मध्यम पावसाचे पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश सांता कॅटरिना, पोरोइमा.
कमी पावसाचे बिहार, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात टेकॅन्टीस, पर्नाब्युको, अलाग्वास, पराईबा, रिओ ग्राँडे दो नॉर्ते.

प्रश्न . चूक की बरोबर ते लिहा.

() ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.

उत्तर :

बरोबर

() ब्राझील भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ॠतू असतात.

उत्तर :

चूक

() भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.

उत्तर :

बरोबर

() ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

उत्तर :

चूक

प्रश्न . भौगोलिक कारणे लिहा.

() ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.

उत्तर :

  • दक्षिण महासागराकडून येणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या अजस्र कड्यांमुळे व उच्चभूमीमुळे अडवले जातात.
  • हे वारे उंच भागावर गेल्यावर थंड हवामानामुळे त्यामध्ये सांद्रीभवन होते, त्यामुळे उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूस पावसाचे प्रमाण जास्त असते.
  • विरुद्ध बाजूस वाऱ्यांमध्ये बाष्प कमी असल्यामुळे तिथे पर्जन्य होत नाही. त्यामुळे ईशान्य ब्राझीलमध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो आणि पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहते.

() ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

उत्तर :

  • भौगोलिक स्थान : ब्राझील हा देश उष्ण कटिबंधात स्थित आहे, शीत कटिबंधात नाही. त्यामुळे तेथे तापमान तुलनेने जास्त असते.
  • पर्वतीय रचना : ब्राझीलमध्ये अतिउंच पर्वतरांगा नाहीत, ज्या हिमवर्षावासाठी आवश्यक असतात. पर्वतरांगांचे उंची कमी असल्याने हवामान थंड राहात नाही.
  • हवामानाचे स्वरूप : शीत कटिबंधातील देशांप्रमाणे येथे घ्रुवीय वारे येत नाहीत, जे बर्फवृष्टीस कारणीभूत ठरतात.

 () भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.

उत्तर :

  • विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते. अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागांवर पडतो.
  • विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते. उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. शिवाय उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो.
  • परंतु, भारताचा भूभाग विषुववृत्ताजवळ नाही, तर तो उष्ण कटिबंधात येतो. त्यामुळे इथे विषुववृत्तीय प्रदेशांइतके तीव्र अभिसरण स्थिती निर्माण होत नाही.

() ब्राझीलमध्ये उष्णकटि बंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

उत्तर :

  • ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.
  • या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

() मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्ष भरात खूप मोठा बदल होत नाही.

उत्तर :

मॅनॉस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे. या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. परिणामी, मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही. म्हणून, मॅनॉस शहराच्या तापमान-कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.

() ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.

उत्तर :

  • भारतात प्रामुख्याने नैऋरत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैर्ऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात.
  • भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात.
  • ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.

प्रश्न_. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

() दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.

उत्तर :

दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत :

  • भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. उदा., दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान २५ से ते ३० से असते. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान ५ से ते १० से असते.
  • भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते. उदा., दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४१० मिमी असते. याउलट, उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५० मिमी असते.

() भारताच्या हवामानातील हिंदी महासागर हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.

उत्तर :

  • भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो.
  • हिंदी महासागर व हिमालयाचा प्रभाव: या दोन्ही घटकांचा भारतीय हवामान व पर्जन्यावर मोठा प्रभाव असतो.
  • पंजाब व राजस्थानमधील उष्ण हवामानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाब तयार होतो.
  • हिंदी महासागरावर अधिक दाब असतो, त्यामुळे तेथून नैऋत्य दिशेने बाष्पयुक्त वारे भारतात येतात.
  • हिमालय पर्वतरांगांमुळे उत्तर दिशेने येणारे अतिथंड वारे अडवले जातात.
  • नैऋत्य मोसमी वारे हिमालयातील शिवालिक व हिमाचल रांगांवर आदळून प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस घडवतात.
  • हे वारे हिमालयावरून वळून पुन्हा ईशान्य दिशेने हिंदी महासागराकडे परत जातात – ईशान्य मोसमी वारे.
  • ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे भारताच्या द्वीपकल्पीय भागात (तामिळनाडू, आंध्रप्रदेश) परतीचा पाऊस पडतो.

() ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.

उत्तर :

ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात.

  • विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. याउलट, ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
  • ब्राझीलमधील उत्तरेकडील अॅमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५ से ते २८ से आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
  • ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी २००० मिमी, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.
  • ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते.
  • अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
  • ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.
  • ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश 'पर्जन्यछायेचा प्रदेश' किंवा 'अवर्षण चतुष्कोन' म्हणून ओळखला जातो.

() भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.

उत्तर :

भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :

भारतमधील हवामान ब्राझीलमधील हवामान
भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.

PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below links to get PDF from store

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-हवामान- नोट्स

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-४-हवामान  - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *