Notes-Marathi Medium-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-९ : पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन-Maharashtra Board

पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन

इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-९-महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :

  • भारत देशांतील पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
  • ब्राझील देशांतील पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन

भारत व ब्राझील – पर्यटन व्यवसायाचा तुलनात्मक अभ्यास :

  • आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या – भारतात ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे.
  • पर्यटन क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी – भारतात तुलनेने जास्त लोकसंख्या पर्यटन क्षेत्रात गुंतलेली आहे.
  • पर्यटन क्षेत्राचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान – ब्राझीलमध्ये भारताच्या तुलनेत पर्यटनाचा राष्ट्रीय उत्पन्नात अधिक वाटा आहे.

भारतात पर्यटकांची संख्या व पर्यटन क्षेत्रात गुंतलेली लोकसंख्या ब्राझीलपेक्षा जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये पर्यटनाचे राष्ट्रीय उत्पन्नात योगदान भारतापेक्षा अधिक आहे.

पर्यटन व्यवसाय :

ब्राझीलमधील पर्यटन व्यवसाय :

(१) वैशिष्ट्ये :

  • पर्यटन हा महत्त्वाचा व्यवसाय
  • पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.

(२) प्रमुख आकर्षणे :

  • पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अॅमेझॉन नदीखोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने.
  • ब्राझीलचा कार्निव्हल हा सण जगप्रसिद्ध आहे. कार्निव्हल मधील सांबा नृत्य व संगीत यांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक ब्राझीलला भेट देतात.

(३) पर्यटनासाठी प्रसिद्ध शहरे :

  • ब्राझीलिया, रिओ दी जनेरिओ, सावो पावलो इत्यादी.
  • ब्राझीलमधील रिओ दी जनेरिओ शहरात कॉरकॉवडो हा मोठा डोंगर आहे. या डोंगरावर ख्रिस्त द रिडीमीर हा ३८ मीटर उंचीचा भव्य पुतळा आहे. हा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून तेथे जातात.

भारतातील पर्यटन व्यवसाय :

भारतातील पर्यटन व्यवसायाची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

(१) वैशिष्ट्ये :

  • पर्यटन हा महत्त्वाचा व्यवसाय.
  • २०१० पासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत सातत्यपूर्ण लक्षणीय वाढ.
  • ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेटी देणे, वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवणे, व्यवसाय करणे इत्यादी हेतूंनी आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येणे.
  • पर्यावरणपूरक पर्यटनास देशात चालना.

(२) प्रमुख आकर्षणे :

  • ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, मंदिरे, लेणी, स्वच्छ सागरी किनारे, प्राण्यांची व पक्ष्यांची अभयारण्ये व राष्ट्रीय उदयाने, थंड हवेची ठिकाणे इत्यादी.

वाहतुकीचे मार्ग :

वाहतूक मार्गाचे चार प्रमुख प्रकार : जलमार्ग, रस्ते मार्ग, लोहमार्ग व हवाई मार्ग हे आहेत.

  • वाहतूक मार्गांचा वापर करून वस्तूंचे एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. यामुळे लोकांची हालचाल (गतिशीलता) सुलभ होते.
  • वाहतूक मार्गांमुळे शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका अशा अनेक व्यवसायांना चालना मिळते.
  • वाहतुकीच्या सुविधा वाढल्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारास प्रोत्साहन मिळते. त्यातून रोजगारनिर्मिती होते व देशाचे उत्पन्न वाढते.
  • जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे. त्यामुळे खर्च कमी येतो. जलवाहतुकीत वाहतूक क्षमता जास्त असते, म्हणजेच अधिक प्रमाणात वस्तू एकाच वेळी वाहता येतात.
  • आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे कमी खर्चात वस्तूंची आयात-निर्यात करणे शक्य होते.

ब्राझीलमधील वाहतुकीचे मार्ग :

(१) जलमार्ग :

  • अ‍ॅमेझॉन नदीच्या मुखापासून ते पेरूतील इक्वीटॉस या ठिकाणापर्यंत व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक केली जाते. हा जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वांत लांब पल्ला मानला जातो.
  • पॅराना नदी ही दक्षिणवाहिनी असून, ती जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे.
  • ब्राझीलच्या किनारी भागांमध्येही जलवाहतूक होते.
  • परंतु, ब्राझीलमधील बहुतेक नद्यांमध्ये विसर्गाचा वेग अधिक आहे. तसेच, नद्यांच्या खोर्‍यांमध्ये उंचसखल व दुर्गम भूभाग असल्यामुळे ब्राझीलमध्ये अंतर्गत जलवाहतुकीचा विकास मर्यादित राहिला आहे.

 (२) रस्ते मार्ग :

  • देशातील वाहतूक मार्गांमध्ये रस्ते मार्गांचा निम्म्याहून अधिक वाटा.
  • पूर्व भागात रस्ते मार्गांचे दाट जाळे.
  • पश्चिमेकडील व उत्तरेकडील अॅमेझॉन नदीखोऱ्याच्या दुर्गम भागात रस्ते मार्गांचा मर्यादित विकास.

(३) लोहमार्ग :

  • लोहमा्गांचा मर्यादित विकास.
  • लोहमार्ग वाहतूक स्वस्त दरात उपलब्ध.
  • लोहमागांचा ठरावीक शहरांदरम्यान मर्यादित वापर.

(४) हवाई मार्ग :

  • हवाई मार्गांचा मर्यादित वापर.

भारतातील वाहतुकीचे मार्ग :

भारतातील वाहतुकीच्या मार्गांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

(१) जलमार्ग :

  • भारतात नद्या, कालवे, खाड्या, जलसाठे इत्यादींचा अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर केला जातो.
  • देशाचा मुख्य भूभाग आणि अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील बेटांदरम्यान वाहतुकीसाठीही जलमार्गांचा वापर केला जातो.
  • देशाच्या एकूण वाहतूक मार्गांत अंतर्गत जलमार्गांचा केवळ १ टक्का वाटा आहे.
  • देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे ९५ टक्के व्यापार सागरी मार्गे केला जातो.

(२) रस्ते मार्ग :

  • भारतात अंतर्गत वाहतुकीसाठी रस्ते मार्गांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
  • भारतातील सुमारे ८५ टक्के प्रवासी वाहतूक रस्ते मार्गांनी होते.
  • देशातील सुमारे ७० टक्के मालवाहतूकही रस्ते मार्गाने होते.
  • भारतात उत्तर-दक्षिण महामार्ग, पूर्व-पश्चिम महामार्ग, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व इतर रस्ते यांचे दाट जाळे पसरलेले आहे.

(३) लोहमार्ग :

भारतामध्ये भूआकार, लोकसंख्या वितरण व आर्थिक गरजांनुसार लोहमार्गांचे जाळे असमानपणे विकसित झाले आहे.

लोहमार्गांचे महत्त्व :

  • लोहमार्ग हे देशाच्या आर्थिक, सामाजिक व औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.
  • प्रवासी व मालवाहतुकीसाठी रेल्वे हा सर्वाधिक वापरला जाणारा व विश्वासार्ह पर्याय आहे.

भारतातील लोहमार्गांचे वितरण :

  • दाट जाळे असलेले भाग : उत्तर भारतातील गंगा-सिंधू मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे अतिशय दाट आहे. याचे कारण म्हणजे सखल भूभाग, सुपीक जमीन आणि लोकसंख्येचे दाट वितरण.
  • विरळ जाळे असलेले भाग : भारताचा मध्य भाग, ईशान्य भारतातील डोंगराळ राज्ये आणि राजस्थानसारखा वाळवंटी प्रदेश याठिकाणी लोहमार्गांचे जाळे विरळ आहे. यामागील कारणे म्हणजे उंचसखल भूप्रदेश, दुर्गम भाग व लोकसंख्येची विरळता.

(४) हवाई मार्ग :

  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचा पुरेसा विकास.
  • अंतर्गत हवाई मार्गांचाही वाढता वापर.

प्रमाणवेळ व संदेशवहन :

प्रमाणवेळेची उपयोगिता :

  • ज्या देशाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार मोठा असतो, त्या देशात वेळेतील फरक जाणवतो. अशा वेळी एकसंध वेळ राखण्यासाठी प्रमाणवेळ अत्यंत उपयुक्त ठरते.
  • प्रमाणवेळेमुळे देशातील सर्व भागांसाठी एकसमान स्थानिक वेळ निश्चित करता येते, ज्यामुळे वेळेतील गोंधळ टाळता येतो.
  • प्रमाणवेळेचा उपयोग करून रेल्वे व हवाई वाहतुकीचे वेळापत्रक सुसंगत व अचूक ठेवता येते, जे प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीचे ठरते. देशभरातील बँका, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, इस्पितळे इत्यादी संस्थांमध्ये एकसंध वेळेनुसार कामकाज चालते, त्यामुळे कार्यक्षमता वाढते व सुसूत्रता राखता येते.

संदेशवहन उपयोगिता :

  • माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे संदेशवहन केले जाते.
  • आधुनिक संदेशवहन हे तुलनेने कमी खर्चीक व अधिक परिणामकारक असते.

ब्राझीलची प्रमाणवेळ व ब्राझीलमधील संदेशवहन :

(अ) ब्राझीलची प्रमाणवेळ :

  • ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळेच्या (GMT) अनुक्रमे २, ३, ४ आणि ५ तासांनी मागे आहेत.
  • (GMT-03) ही ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ मानली जाते. ती ग्रीनिच वेळेच्या तीन तास मागे आहे.

(ब) ब्राझीलमधील संदेशवहन :

ब्राझीलमध्ये संदेशवहन सेवा भौगोलिक अडचणी असूनही आधुनिक आणि गतिमान असून, देशाचे तंत्रज्ञान व संपर्कक्षमता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

संदेशवहन सेवा :

  • ब्राझीलमध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी, संगणक व इंटरनेट यांसारख्या सेवा अत्यंत विकसित व कार्यक्षम स्वरूपात उपलब्ध आहेत.
  • सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते, त्यामुळे देश डिजिटलदृष्ट्या प्रगत आहे.

क्षेत्रानुसार सेवा वितरण :

  • दक्षिण व मध्य ब्राझील : येथे लोकसंख्येचे दाट वितरण असल्यामुळे अत्याधुनिक दूरसंचार सुविधा उपलब्ध आहेत.
  • उत्तर ब्राझील : घनदाट वने व विरळ लोकवस्ती यांमुळे या भागात दूरसंचार सेवा मर्यादित स्वरूपात विकसित झाल्या आहेत.

अडथळ्यांवर मात :

  • ब्राझीलने विस्तीर्ण आकार, घनदाट अरण्ये आणि अ‍ॅमेझॉन खोऱ्यातील कमी लोकसंख्या या अडथळ्यांवर मात करत संचार सेवा विस्तारल्या आहेत.

अवकाश क्षेत्रातील प्रगती :

  • ब्राझीलने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रह सोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
  • पूर्वी ब्राझील संयुक्त संस्थांवर (USA) अवलंबून होता. आता भारत, चीन, रशिया आणि युक्रेन यांच्याशी सहकार्य करत आहे.

भारताची प्रमाणवेळ व भारतातील संदेशवहन :

(अ) भारताची प्रमाणवेळ :

  • भारतीय प्रमाणवेळेसाठी (IST) ८२°३०' पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे.
  • भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे.

(ब) भारतातील संदेशवहन :

  • संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वाढता प्रभाव हे माहिती तंत्रज्ञान व संदेशवहन युगाचे वैशिष्ट्य आहे.
  • यामुळे दूरसंचार उद्योग हे भारतातील अतिवेगाने वाढणारे क्षेत्र ठरले आहे.
  • भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन व इंटरनेट वापरणारा देश आहे.
  • स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञानाचा वापर करून भारत संदेशवहन क्षेत्रात प्रगतीपथावर आहे.
PDF of this Chapter
Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below links to get PDF from store

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-९ : पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - नोट्स

PDF : महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-९ : पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन  - स्वाध्याय प्रश्नोत्तरे


PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43

PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71

Useful Links

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *